PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र |
PM Vishwakarma Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी राबवल्या जातात. त्या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजना राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जात असतात.
देशातील सर्व आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती – जमाती, कष्टकरी बांधव, शेतकरी, बांधकाम कामगार, आरोग्य सेविका, ज्येष्ठ नागरिक व महिला या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते, त्यातून त्यांचा विकास करून त्यांना एक स्त्री पूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न होत असतो.
शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना नेहमीच राबवल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे साह्य दिले जाते. त्याचप्रमाणे या आर्थिक चालू वर्षात भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव म्हणजे ” पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना “ किंवा ” विश्वकर्मा श्रम सन्मान योजना “ होय. या समाजाच्या विश्वकर्मा यांच्या नावावरून या योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे.
भारताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. त्यामुळे त्यांनी विविध घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेचे घोषणा केली. या ही योजना शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत या समाजातील 140 जातींचा समावेश योजनेअंतर्गत केला आहे.
15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून हि योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून कारागीर आणि शिल्पकारांची कौशल क्षमता वाढवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यास त्यांना आर्थिक सहाय्य करणे,हा उद्देश आहे.
आपल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी केंद्र शासनाकडून तेराशे ते पंधराशे कोटी रुपये पर्यंतचे गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रशिक्षण, तंत्रज्ञानाने आणि आर्थिक सहाय्य इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केला आहे.
पीएम विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ही देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. कारण महाराष्ट्र मध्ये विविध जाती धर्माचे लोक, अनेक प्रकारचे कारागीर राहतात. त्यामध्ये लोहार, चांभार, कुंभार, शिंपी व धोबी इत्यादी सर्व कारागीर क्षेत्रांचा यामध्ये समावेश केला गेला आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तींना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. त्याचबरोबर 500 रुपये रक्कम दिली जाते. तसेच या नागरिकांना आपल्या कामाचे विविध प्रकारचे अवजारे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये एवढी रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना दिले जाणारे प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत दिले जाते.
तसेच देशातील कारागिरांना हस्तोद्योग व्यावसायिकांना आपला स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून 5 % व्याजदराने 3 लाख रुपये एवढी रक्कम ही दिली जाते. देण्यात येणारी ही रक्कम 2 हप्त्यांमध्ये विभागून दिली जाते पहिला त्यामध्ये एक लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते तर दुसऱ्या दोन लाख रुपये कर्ज दिले जाते.
देशातील पारंपारिक व्यवसाय बंद पडू नयेत, त्यामुळे तसेच देशात बेकारीचा, रोजगाराचा प्रश्न निर्माण उपलब्ध होऊ नये, यासाठी शासनामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यातून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच आपल्याकडे असणारा पारंपारिक कला वारसा जिवंत ठेवता येईल, यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
PM Vishwakarma Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत आपल्या देशात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आपण आपल्या रोजच्या लेखातून घेतच असतो. त्याचप्रमाणे आज आपण केंद्र शासनामार्फत राज्यातील विश्वकर्मा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विश्वकर्मा श्रम कौशल्य योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणी, परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी या समाजातील लोक राहत असतील,जसे कि लोहार, सोनार, कुंभार इत्यादींना. विविध क्षेत्रातील लोकांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा होईल, ही विनंती.
योजनेचे नाव | पी एम विश्वकर्मा योजना |
योजनेची सुरुवात | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
लाभार्थी | विश्वकर्मा समाजातील नागरिक |
लाभ | मोफत प्रशिक्षण व लघुउद्योगासाठी कर्ज |
उद्देश | विश्वकर्मा समाजातील नागरिकांचा विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
Good News | तार कुंपण योजना महाराष्ट्र | Tar Kumpan Yojana Marathi 2024 | सरकार देत आहे 90 % अनुदान |
Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |
Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |
New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |
New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |
पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- आपल्या देशात विविध प्रकारच्या जाती – जमातीचे लोक राहतात, अशा मागास, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी केंद्र शासनामार्फत पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील वंचित घटकातील तरुणांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- विश्वकर्म योजनेच्या माध्यमातून राज्यातील, देशातील नागरिक विविध योजना अंतर्गत लाभ घेऊ शकतील व आपले प्रशिक्षण पूर्ण करून आपला विकास घडवून आणतील.
- राज्यातील बहुतांश कलाकार, कारागीर लोक हे आर्थिक दृष्ट्या मागास जीवन जगत असतात, त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्यांच्या जीवनमानावर याचा परिणाम होतो, हे सर्व टाळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पी एम विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली.
- बहुतांश या समाजातील लोक हे गरीब असल्याने त्यांना एखादे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, पण ते पैसे नसल्याने ते हुशार कारागिरी तयार होत नाहीत.
- राज्यातील या बेरोजगार अशा तरुणांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन, त्यांना देशासाठी होणाऱ्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्याचे महत्त्वाचे ठरले.
- या पी एम विश्वकर्म योजनेच्या माध्यमातून या कारागीर समाजातील तरुणांना मोफत प्रशिक्षण देवून, त्यांना स्वताचा लघुउद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विश्वकर्मा समाजासाठी पी एम विश्वकर्मा या योजनेची सुरुवात केली.
या विश्वकर्मा समाजातील लोकांना कशाप्रकारे कामाचे चिकाटी व सवय आहे, या योजनेच्या माध्यमातून दिसून येते. - विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ठेवली गेली आहे, त्यामुळे तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- तसेच या योजनेमुळे राज्यातील विश्वकर्मा समाजातील कारागिरांना आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होईल.
- पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची राशी ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाते.
- पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत राज्यातील तरुणांना मोफत प्रशिक्षणा बरोबर आर्थिक सहय्य्य हि दिले जाते, हे या योजनेचे मोठे वैशिष्ट्ये आहे.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजनेचे फायदे |
- पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील विश्वकर्मा समाजातील सर्व नागरिकांना लाभ दिला जातो.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील लोहार, चांभार, सुतार, शिंपी आणि माळी अशा एकूण 140 जातींना याचा लाभ होणार आहे.
- या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्जही मिळवून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शिल्पकार यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल, त्यामुळे त्यांची स्वताची एक नवी ओळख निर्माण होण्यास या योजनेमुळे मदत होईल.
- पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत विश्वकर्मा समाजातील लोकांना आर्थिक स्वरूपात मदत देऊन प्रशिक्षण दिले जाते.
- या योजनेअंतर्गत विश्वकर्मा समाजातील तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते, तसेच या योजनेमुळे राज्यात रोजगारी च्या संधी वाढतील.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेकारीचे प्रमाण कमी होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल.
- पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या मागास, आर्थिक दृष्टात दुर्बल घटकातील विश्वकर्मा समाजातील लोकांच्या व्यवसायात वाढ झाल्याने, ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या समाजातील लोकांचे जीवनमानाचा दर्जा उंचावे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शिल्पकार, कुशल कारागीर हे या योजनेची जोडली जातील.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत लाभार्थी समाज |
- लोहार
- चांभार
- टेलर
- शिल्पकार
- कारपेंटर
- सोनार
- न्हावी
- धोबी
- शेती अवजार निर्मिती
- माळी
- झाडू चटया बनवणारे
- मूर्तिकार
- हार बनवणारे
- मच्छीमार
- खेळणी बनवणारे
अशाप्रकारे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 140 जातींचा समवेश या योजने अंतर्गत करण्यात आला आहे.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले की विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील 140 विश्वकर्मा समाजातील नागरिकांना पूर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना टूलकीट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे लघुउद्योग व्यावसायिकांना 5% व्याज दराने तीन लाख रुपये पर्यंत कर्ज ही उपलब्ध करून दिले जाते.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत प्रशिक्षण स्टायपेंड |
- पी एम विश्वकर्मा योजनेचा प्रत्येक लाभार्थी प्रशिक्षण घेण्यास पात्र असेल, तर त्याला स्टायपेंड रुपये 500 दररोज बेसिक चालू असताना, ही प्रशिक्षण दिले जाते.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे रुपये पाचशे ही रक्कम प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजनेचे नियम व आटी |
- पी एम विश्वकर्मा योजनेचा अर्जदार हा भारत देशाचा मूळ नागरिक असावा.
- पी एम विश्वकर्मा योजनेतील अर्जदाराचे वय हे 18 पेक्षा जास्त व 50 वर्षापेक्षा कमी असाले पाहिजे.
- महाराष्ट्र शासनच्या या योजनेचा लाभ फक्त विश्वकर्मा समाजाच्या 140 जातींपैकीच नागरिक घेऊ शकतात.
- पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ पात्र व्यक्तीच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीने एखादे प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल, तर त्यास या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- या योजनेचा अर्जदार हा व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य हे कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत असतील. तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- पी एम विश्वकर्मा या योजनेतील अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असले पाहिजे.
- देशातील पारंपारिक व्यवसायाशी निगडित असणारी लोकच या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असतील.
PM Vishwakarma Yojana 2024 | पी एम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- एखाद्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
PM Vishwakarma Yojana 2024 | या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर तुम्हाला अर्ज करा, असे चिन्ह दिसेल त्यावर आपणाला click करावयाचे आहे.
- नंतर आपण जर या वेबसाईटवर नवीन असेल तर username, आयडी व password टाकून login करावे.
- त्यानंतर आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर टाकून अकाउंट व्हेरिफाय करावे.
- त्यानंतर एक new page open होईल, त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसून येईल.
- त्यामध्ये तुमची आवश्यक सर्व माहिती भरा.
- त्यानंतर या आजा सोबत जोडाव्याच्या आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन apload करावेत.
- त्यासाठी apload या ऑप्शन वर click करावे.
- त्यानंतर तुम्ही जर एखाद्या कोर्स साठी प्रमाणपत्र मिळवलेले असेल, तर तेही तुम्हाला डाऊनलोड करता येईल.
- यानंतर तुम्हाला एक डिजिटल आयडी येईल.
- पुढे तुम्हाला लॉगिन करून तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करावे.
- त्यानंतर उर्वरित सर्व माहिती योग्य व अचूक भरून अर्ज submit करावा.
PM Vishwakarma Yojana 2024 |
पी एम विश्वकर्मा योजना शासन अधिकृत website click here
1 thought on “New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |”