Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र |
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या राज्यातील गोर- गरीब जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील गोरगरीब लोकांना काहीसा दिलासा देण्याचे काम या योजना करत असतात.
या योजना प्रतिवर्षी सरकार आपला अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकरी वर्ग, युवा वर्ग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वांना केंद्रबिंदू मानून राबवीत असते.
त्याचप्रमाणे यावर्षीची पावसाळी अधिवेशन 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषण करताना, त्यांनी राज्यातील मजूर, विद्यार्थी, तरुण, महिला व मागासवर्ग, आदिवासी या सर्व घटकांच्या कल्याणासाठीच्या योजनांची घोषणा केली.
कृषी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, आरोग्य, पर्यटन आणि अल्पसंख्याक या प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला चालना व बळकटी देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे राज्यातील गरजू व गोरगरीब जनता वाढत्या महागाईमुळे बेहाल झालेली आहे. या लोकांसाठी अजित पवार यांनी ” मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना “ या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबांना, पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ पात्र कुटुंबांना 2024 जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून मिळणार आहे. असेही सांगण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी या योजनेची अमलबजावणी लवकर सुरु करण्यात येणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आले असल्याने, या अंतिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणांचा पाऊस पडलेला आहे. या अंतर्गत त्यांनी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा केली.
गेल्यावर्षीच्या वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झालेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातच राज्यात वाढलेल्या पेट्रोल – डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या विक्रमी किमती, यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मोफत तीन सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काहीसा दिलासा देणारी ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना मोफत तीन सिलेंडरचा लाभ देण्यात येईल. असे अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील आर्थिक ताण थोडासा कमी होईल.
त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी दहा हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. तसेच नवीन रुग्नेवाहिकांची ही खरेदी केली जाईल, त्याचबरोबर बचत गटात च्या निधीत वाढ करून यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे शासनाचा विचार असल्याचे जाहीर केले.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखाद्वारे घेतच असतो. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? नियम , पात्रता, अर्ज करण्याची पद्धत. या सर्वांची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्याही परिसरातील नागरिकांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना या मोफत सिलेंडर योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
योजनेची सुरुवात | मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील सर्व स्त्रिया |
लाभ | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |
उद्देश | गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे देखील वाचा –
Good News | लखपती दीदी योजना मराठी | Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | मिळणार 5 लाख बिनव्याजी कर्ज |
New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |
Good News | तार कुंपण योजना महाराष्ट्र | Tar Kumpan Yojana Marathi 2024 | सरकार देत आहे 90 % अनुदान |
Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |
Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील महागाईने बेहाल झालेल्या गरीब, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून दिला जातो.
- या योजनेअंतर्गत स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून दिल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होवून, त्यांना निरोगी आयुष्य जगण्यास सहाय्य करणे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
- या योजनेमुळे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांचा वापर कमी झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन राहणार आहे.
- या योजनेअंतर्गत सिलेंडर मोफत मिळाल्याने महिलांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण कमी होऊन, त्यांच्या आरोग्या आरोग्याचे प्रश्न मिटतील.
- या योजनेमुळे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे महिलांचे कष्ट कमी होण्यास मदत होईल.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्य सरकारच्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेची घोषणा केली.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना, पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी मोफत तीन एलपीजी गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
- राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 52 लाख हून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
- राज्यातील गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या मागास दारिद्र्यरेषेखालील लोकांना अन्नसुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली.
- राज्यातील ज्या कुटुंबांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अशा कुटुंबांनाच दरवर्षी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत चा लाभ दिला जाणार आहे.
- याज्यातील गोरगरीब जनतेला परवडणाऱ्या आणि उपलब्ध अन्नाची सुनिश्चित उपयोग करण्याच्या उद्देशाने दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूरना योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ 2024 च्या जुलै किंवा ऑगस्ट पासून मिळण्यास सुरुवात होईल.
- महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया जुलैपासून सुरू होईल, त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
अर्थसंकल्प 2024 : महिलांसाठीच्या इतर योजना |
- 2023 -24 पासून सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेसाठी मुलींना तिच्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्या -टप्प्याने 1 लाख रुपये मिळणार.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत 21 – 65 वयोगटातील पत्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार. त्यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले.
- 2024 – 25 पासून वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र तसेच कृषी व इतर पदवी व पद्विउत्तर अभ्यासक्रमासाठी पत्र मुलीना मोफत शिक्षणाची सोय.
- राज्यातील 17 शास्रातील महिलांना पिंक ई रिक्षा खरेदीसाठी अर्थ सहाय्य डील जाणार आहे, त्या अंतर्गत दहा हजार महिलांना लाभ दिला जाणार आहे.
- बचत गटाचा निधी हा पंधरा हजार रुपयांवरून 30,000/-रुपये करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सात लाख नवीन बचत गटांची स्थापना केली जाईल.
- तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना ” उमेद मार्ट ” आणि ” इ कॉमर्स ” या ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे राज्यातील पंधरा लाख महिला या लखपती झाल्या आहेत, तर या अर्थसंकल्पामध्ये 25 लाख महिलांना लखपती करण्याचे निश्चित केले आहे.
- महिला उद्योजकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ” सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- ” आई योजने ” अंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख कर्जावरील व्याज परत दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यात 10 हजार रोजगार निर्मिती होईल.
- राज्यातील महिलांची तसेच गरोदर माता व बालकांचे मोफत ने – आन सुविधा करण्यासाठी तीन हजार 324 नवीन रुग्चीण वाहिकांची खरेदी करणार असल्याची माहिती घोषणा यावेळी करण्यात आली.
- एक मे 2024 नंतर जन्माला आलेला मुलांच्या नावाची नोंद त्याचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने शासकीय दस्तऐवजांमध्ये करण्याचे बंधनकारक करण्यात आले.
- ” शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह ” या योजनेअंतर्गत मुलीला देण्यात येणारे दहा हजार रुपये यांचे अनुदान वाढवून 25 हजार रुपये करण्यात आले.
- तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी जल जीवन मिशन कार्यक्रमातून एक कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांची नळ जोडणी पूर्ण करण्यात येणार आहे.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे |
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
- एखाद्या कुटुंबाला तीन पेक्षा अधिक सिलेंडर घ्यावे लागत असतील, तर जादाचे सिलेंडरची त्यांना स्वखर्चाने सिलेंडर खरेदी करावे लागते.
- राज्यात सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे नागरिकांच्या खिशावर पडणारा आर्थिक ताण कमी होणार आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे राज्यातील 52 लाख कुटुंबांना लाभ दिला जाईल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळाल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवता येतील.
- यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याची घोषणा केली आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्त्रियांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
- स्त्रियांचा त्रास कमी झाल्याने स्त्रिया अभिमानाने फिरतील.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची नियम व आटी |
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी महिलांनाच लाभ दिला जाईल.
- राज्याबाहेरील वास्तव्यास असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळवणाऱ्या महिलांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळवलेल्या महिलांनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेच्या अर्जदार महिलेचे वय 21 ते 60 असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी महिलेने सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
- या योजनेच्या अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादा पेक्षा जास्त नसावे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभ मिळणारे सदस्य हे ईडब्ल्यूएस, एससी किंवा एसटी या प्रवर्गातील असतील, तर जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्जदार महिला ही अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला अर्जासोबत जोडावा.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य संख्या ही पाच असावी.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता |
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असावी.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य संख्या किमान पाच असाने आवश्यक आहे.
- ज्या महिलांना माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- पात्र लाभार्थी व्यक्तीला राज्य सरकारकडून तीन गॅस सिलेंडर विनामूल्य दिले जातात.
- अर्जदार व्यक्तीला सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडावी लागते.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावावर gas कनेक्शन असावे.
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- एलपीजी गॅस कनेक्शन
- मतदान ओळखपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- ईमेल आयडी
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज
Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प 2024 मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचे सुरुवात नक्कीच केलेली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल.
- योजनेसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची पोर्टल अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
- अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, जुलै महिन्यात या योजनेसाठी ची अर्ज करण्याची पद्धत सुरू होईल.
- योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस सुरू झाली कि, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अपडेट देण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख वाचा. ही विनंती.
1 thought on “New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |”