Mukhyamntri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वायोश्री योजना |
cVayoshri Yojana Maharashtra
Mukhymantri Vayoshri Yojana ln Marathi
How to apply Mukhyamantri vaioshree Yojana
Vayu Shri Yojana Maharashtra
Mukhyamntri Vayoshri Yojana
नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र शासनाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे. ही वयोवृद्धांसाठी एक चांगली योजना आहे. आपल्या घरात जर कोणी 65 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध असेल, तर त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत हि योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविली जाणार आहे. या योजनेत वयोवृद्धांसाठी वर्षाला 3000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे आपल्या घरातील ज्येष्ठांच्या डायरेक्ट बँक अकाउंट वर जमा होणार असल्या कारणामुळे त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू, दवाखाना या गोष्टींसाठी उपयोग होईल.
या योजनेमुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहता येणार नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्र शासन एक ऑनलाईन एप्लीकेशन देखील सुरू करणार आहेत. हि योजना मुख्यमंत्री कार्यालय यांच्या देखरेखी खाली होणार असल्याची माहिती मिळत आहे. योजना जिल्हाधिकारी पालिका आयुक्त मार्फत राबवली जाणार आहे.
या योजनेचा लाभ कुणाला मिळणार ? त्यासाठी पात्रता काय ? निकष कोणते असणार आहेत ? आवश्यक कागदपत्रे कोणती , अर्ज कसा करायचा ? या बद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.Mukhyamntri Vayoshri Yojana
गणेश उत्सव परवाना | Ganeshotsav Mandal Parmission 2024 | तुमच्या गणेशोत्सव मंडळाला परवानगी हवीय ? मग असा करा अर्ज |
Mukhyamntri Vayoshri Yojana | पात्रता निकष |
- या योजनेची अर्जदार व्यक्ती हि 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्ष पूर्ण केलेला असावी.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असावे व जे बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
- अर्जदार व्यक्तीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 30 टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारी रक्कम अर्जदार व्यक्तीने मनशक्ती केंद्र किंवा आपल्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले असल्याचे पावती 30 दिवसाच्या अधिकृत पोर्टलवर जमा करणे गरजेचे आहे.Mukhyamntri Vayoshri Yojana
- या योजनेच्या अर्जदार व्यक्ती इतर कोणतीही राज्य व केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेणारी नसावी.
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभागात 64 जागांची भरती | दहावी, ITI पास उमेदवारांना संधी |
मुख्यमंत्री वयश्री योजना आवश्यक कागदपत्रे |
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज 2 फोटो
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
- स्वंय घोषणापत्र Mukhyamntri Vayoshri Yojana
- शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे
How To Apply For Mukhyamntri Vayoshri Yojana 2024 |
- वयश्री योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
- त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर वर जायचे आहे व प्ले स्टोअर वर ALIMCO Mitra असे टाईप करायचे आहे.
- आता एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, त्यात आपल्याला आपले सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायचे आहे. जसे की, आपले नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा.
- आत्ता आपल्याला रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचे आहे.
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- खाली कॅपचे असेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. Mukhyamntri Vayoshri Yojana
- अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, आता आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- अतिशय सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
1 thought on “मुख्यमंत्री वायोश्री योजना | Mukhyamntri Vayoshri Yojana | 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती |”