Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 | विहीर अनुदान योजना |
Vihir Anudan Yojana maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रानो, भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. पण शेती क्षेत्रात शेतकऱ्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना नेहमीच करावा लागतो. त्यतील मुख्य म्हणजे पाण्याची टंचाई. दर वर्षी शेतकर्यासमोर पाण्यचा प्रश्न आ वासून उभा राहतो. आणि हा प्रश्न जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला विहिरीची गरज आहे. त्यामुळे विहिरीसाठी लागते ते म्हणजे आर्थिक भांडवल, जे शेतकर्याकडे नसते.
हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने ” मागेल त्याला विहीर अनुदान योजना ” सुरु केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले जाते. या योजने मार्फत अल्फ भूधारक शेतकर, मागास, अनुसूचित जाती, जमातीतील लोक तसेच दुर्गम व डोंगराळ भागातील लोकांना या योजनेतून विहिरी दिल्या जातात.
त्यामुळे मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे स्वरूप |
Vihir Anudan Yojana अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत यशस्वी ठरेल, यात शंका नाही.
योजनेचे नाव | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र |
लाभ | 4 लाख रुपये |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन ( अधिकृत website ) |
हे देखील वाचा – New | Saur krushi Pump Yojana Maharashtra | 2024|Good News | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
Good News | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024 | New | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र |
Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 | या योजनेचा उद्देश
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता करून देणे या हेतूने या योजनेची सुरुवात झाली.
- या योजनेमार्फत गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास साधने.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून उच्च जीवनशैली प्राप्त करून देणे.
- शेतकऱ्यांच्या विकासास आर्थिक पाठबळ मिळवून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य संपवून आर्थिक विकास साधने.
- या योजनेतून विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
- या योजनेतून राज्यातील शेतकर्याची पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 | या योजनेची वौशिष्ट |
- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग योजना 2024 अंतर्गत “मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची” सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करून शेतीकडे आकर्षित करण्यासाठी हे एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहे.
- या योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहे.
- शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही. अशी अर्ज प्रक्रिया केली आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवता येणार आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
Vihir Anudan Yojana Maharashtra | या योजनेचे लाभार्थी |
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी
- अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
- भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागास वर्गातील शेतकरी
- स्त्री कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी व्यक्ती
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी व्यक्ती
- दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी व्यक्ती
- परंपरागत वननिवासी व्यक्ती
- सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- अल्पभूधारक शेतकरी
- विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
Vihir Anudan Yojana Maharashtra | या अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा |
- या योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येते.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेमुळे पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
- या योजनेमुळे शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
- त्यामुळे शेतकर्याचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
Vihir Anudan Yojana Maharashtra | विहीर योजनेचे नियम |
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच विहिर अनुदान योजनेसाठी पत्र असतील.
- राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे. त्यशिवाय लाभ मिळणार नाहि.
- शेतकऱ्याच्या शेतात विहीर असु नये.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असावा.
- अर्जदाराने व्यक्तीने यापूर्वी विहीर, शेततळे अथवा सामुदायिक शेततळे या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
- लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
- लाभार्थी व्यक्तीच्या 7/12 वर विहीर नोंदणी नसवी.
- लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
Vihir Anudan Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- लाभार्थ्याचे रेशन कार्ड
- लाभार्थ्याचा रहिवाशी दाखला
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- अर्जदाराचा ई-मेल आयडी
- रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो