Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र |
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 |
नमस्कार मित्रानो, शासनाकडून राज्यात विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात असते. या योजना कल्याणकारी व लोक हिताच्या असतात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, अनुसूचित जाती- जमाती, भटक्या विमुक्त जाती व विमुक्त जमाती तसेच आदिवासी लोक या सर्वांचा विकास करण्याच्या उद्देशाने या योजनांच्या अंमलबजावणी केली जाते.
या योजना शासनाकडून अनुदान स्वरूपात राबवण्यात येत असतात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून स्वतंत्र निधीची व्यवस्था केली जाते. आणि त्या वेगवेगळ्या विभाग मार्फत राबविल्या जातात. कारण प्रत्येक घटकाच्या गरजा या वेगवेगळ्या असू शकतात.
त्याचप्रमाणे दारिद्र रेषेखालील कुटुंबातील कुटुंब प्रमुख असणार्या कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाकडून एका महत्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना होय. “
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील दृष्ट्या मागास दारिद्र्यरेषेखाली कुटुंबामधील स्त्री अथवा पुरुष यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करते. तसेच या कुटुंब प्रमुखच्या मुर्त्युने त्या कुटुंबाची उपासमार होऊ नये. तसेच त्याचा उदरनिर्वाह करण्यामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने योजनेची सुरुवात केली.
राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवण्यात येते. या योजनेत 18 ते 60 वयोगटातील स्त्री-पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 20,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाण्यास मदत होते. तसेच त्यांचे जीवन सुखकर होते.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, शासनाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण व कल्याणकरी योजनांची रोजच आपण माहिती पाहत असतो. त्या सर्व योजनाचा लाभ ही आपण घ्यावा ची इच्छा असते. त्याचप्रमाणे आज आपण शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना होय.
त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवरात किंवा आसपासच्या परिसरात जर कोणीत्या कुटुंबात कर्त्या पुरुष किंवा स्त्रीचा मृत्यू झालेला असेल आणि ते कुटुंबाचं दारिद्र्यारेषेखाली आपले जीवन जगत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास सांगा, ही विनंती.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 |
योजनेचे नाव | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | दारिद्रेशेखालील कुटुंबे |
लाभ | 20000/- रुपयांची आर्थिक मदत |
उद्देश | दारिद्र रेषेखालील कुटुंबांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |
New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |
महिला सन्मान योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Samman Yojana In Marathi 2024 | ST प्रवासात 50 % सूट |
कन्यादान योजना महाराष्ट्र | Good News |Kanyadan Yojana Maharashtra 2024 | मुलीच्या लग्नाची चिंता सोडा | सरकार देत आहे मदत |
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील दारिद्र्यरेषेखाली म्हणजे ( BPL ) कुटुंबातील कमावत्या स्त्री किंवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात केली.
- राज्यात दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये, तसेच कोणाकडे कर्जही घेण्याची गरज पडू नये,हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेमुळे राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या परिवारांना स्वावलंबी बनवणे व त्यांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून दारिद्र रेषेखालील लोक आत्मानिर्भर होण्यास समर्थ होतील.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आली.
- राज्यातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे.
- महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाच्या अर्ज प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली आहे.
- राष्ट्रीय कुटुंब योजना च्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 20000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- या योजने अंतर्गत 18 ते 59 वर्ष दरम्यानच्या व्यक्तींना च्या कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे.
Rashtriya Kutumb Labh Yojana | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य |
महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र अंतर्गत कुटुंबातील कमवत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला वीस हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येते.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी |
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्रचे लाभार्थी हे राज्यातील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील व्यक्ती आहेत.
Rashtriya Kutumb Labh Yojana | खालील कारणांसाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत लाभ दिला जाणार नाही |
राष्ट्रीय कुटुंब योजना अंतर्गत घरातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात येते, पण जर त्या व्यक्तीचा मृत्यू हा स्वतःहून ओढवून आणलेला असल्यास दिले जाणारे आर्थिक सहाय्य नाकारले जाते. ती कारणे कोणकोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे :
- आत्महत्या करणे
- स्वतःहून आत्महत्येचा प्रयत्न करणे
- अमली पदार्थाच्या अतिसेवनाने झालेला मृत्यू
- स्वतःला जाणीवपूर्वक इजा करून घेणे
- शर्यतीत भाग घेणे कायद्याचे उल्लंघन करताना होणारा अपघात
- डिलिव्हरी मधील मृत्यू
- सैन्य दलातील मृत्यू
- वारसांकडून किंवा कौटुंबिक वादातून झालेला खून
- अचानक उद्भवलेली युद्ध
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्राचे फायदे |
- राज्यतील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला, कुटुंबाला मदत म्हणून शासनाकडून 20,000/-रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेमुळे कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कोणाकडून कर्ज काढावे लागू नये तसेच पैशासाठी कोणाकडे हात पसरावे लागू नयेत.
- राज्यातील राष्ट्रीय कुटुंब योजना मुळे आर्थिकदृष्ट्या मागास व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास होणार आहे.
- या योजनेमुळे हे लोक सशक्त व आत्मनिर्भर जीवन जगू शकतील.
- या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही तसेच या मुलांना या योजनेमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची ही वेळ येणार नाही.
- अशा कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या खर्च या योजनांमधून भागवला जाणार आहे.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी.
- या योजनेसाठी अर्ज करण्यात आलेल्या मृत पावलेल्या व्यक्तीचे वय 18 ते 59 दरम्यान असावे.
- तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील मृत व्यक्ती ही घरातील कमावती व्यक्ती असावी.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे नियम व आटी |
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच दिला जाईल.
- या योजनेचा लाभ राज्याबाहेरील कोणत्याही नागरिकांना दिला जाणार नाही.
- राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारी कुटुंबे फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे 21 हजारापेक्षा कमी असावे.
- जर एखाद्या व्यक्तीने घरातली कर्त्या स्त्री किंवा पुरुषाने स्वतःहून आत्महत्या केलेली असेल, तर त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- तसेच त्या व्यक्तीने कायद्याची उल्लंघन करताना चुकून त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्याही परिवाराला या योजनेअंतर्गत प्रत्येक सहाय्य मिळणार नाही.
- या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील व्यक्तींना लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी दारिद्र्याशी खाली कुटुंबातील व्यक्तीच्या नातेवाईक त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या तीन वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.
- मुर्त्युच्या तीन वर्षानंतर अर्ज केला असेल, तर त्या अर्जाचा या योजनेअंतर्गत विचार केला जाणार नाही.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीचे मृत्यूचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- अर्जदार व्यक्तीने अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती भरल्यास तो अर्ज केला जातो.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे जर 21 हजारांपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
- मृत पावलेल्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्याचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत |
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली आहे.
- प्रथम आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन राष्ट्रीय कुटुंब योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्या अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक व योग्य भरावी.
- त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्याप्रत जोडाव्यात.
- नंतर तू अर्ज कार्यालयात जमा करावा.
- या कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
- नंतर ते अधिकारी अर्जाची छाननी करून लाभाचे वितरण करते.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र |
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र अधिकृत website Click Here
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र फॉर्म Click Here
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र शासन निर्णय PDF Click Here
1 thought on “Good News | Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र | 20,000/- रुपयांची आर्थिक मदत |”