Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजना मराठी |
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील जनतेचा विकास करणे, हे ध्येय ठेवून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना देशपातळीवर अथवा राज्यपातळीवर राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांचा विकास करणे, हे या योजनांचे मुख्य उद्दिष्ट असते.
या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक व मागास दृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील सर्व नागरिकांचा समावेश केलेला असतो. त्याचबरोबर राज्यातील नवजात बालकापासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांना या योजना अंतर्गत समाविष्ट करून, त्यांना विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी प्रयत्न केले जातात.
या योजनांमध्ये समाजातील प्रत्येक वयोमानातील नागरिक समाविष्ट असतो. तसेच प्रत्येक कुटुंबासाठी या योजनेतून विचार केला जातो. त्यामध्ये विधवा, महिला, असाह्य वृद्ध नागरिक, नवजात बालके, कामगार, शेतकरी तसेच कष्टकरी वर्ग या सर्वांचा समावेश केलेला असतो. त्यांच्यासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. आरोग्य, शिक्षण यासारख्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील दरिद्री पणा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याचप्रमाणे आपल्या देशातील महिलांना आर्थिक दृश्य सक्षम व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एका योजनेची सुरुवात केली. ती योजना म्हणजे ” लखपती दिदी योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून देशातील नऊ कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे.
आपला देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी जाहीर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना केल्याचे घोषणा केले. त्याचवेळी त्यांनी लखपती दिली योजनेची घोषणा करून, त्या योजनेचा विस्तार ही करणार असल्याचे सांगितले.
लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन, बचत गटामार्फत त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून बचत गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व महिलांना केंद्र सरकार कर्जही उपलब्ध करून देते. या कर्जाची रक्कम ही माझी 5 लाख रुपये पर्यंत असते.
त्यामुळे या योजनेमुळे महिला लखपती होण्यास मदत होते. तसेच महिला स्वावलंबी होऊन स्वतःचा आर्थिक विकास करून घेतात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना बचत गटामार्फत एलईडी बल व ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग आधीची प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे महिलांच्या रोजगार यांना संधी मिळतात.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखाच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण लखपती दीदी योजना या योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या परिवारात व आसपासच्या परिसरात ज्या कोणी महिला बचत गटाशी संबंधित असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | लखपती दीदी योजना |
योजनेची सुरुवात | पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
लाभ | 1 ते 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज |
उद्देश | महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे देखील वाचा –
New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |
Good News | तार कुंपण योजना महाराष्ट्र | Tar Kumpan Yojana Marathi 2024 | सरकार देत आहे 90 % अनुदान |
Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |
Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |
New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |
नक्की काय आहे ? लखपती दीदी योजना मराठी |
गेल्यावर्षी 2023 च्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना उद्योगासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, याला प्रतिनिधी योजनेची घोषणा केली.
ही लखपती दीदी योजना ही देशातील महिलांसाठी बचत गटाची संबंधित असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन, त्यांना आर्थिक दृश्य सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना स्वतःच्या लघुउद्योग, रोजगार उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून 1 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
या लखपती दीदी योजनेमुळे देशातील आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील. तसेच अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बचत गटासोबत जोडले गेलेल्या महिलांना लखपती म्हटले आहे. त्यांनी एक फेब्रुवारी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणा सांगितले. 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अगोदर 2 कोटी महिला या लखपती ठरल्या आहेत. पण आता ते तीन कोटी करण्याची नियोजन आहे.
लखपती दीदी योजना मराठी ची उद्दिष्ट्ये |
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, लखपती दीदी योजनेची सुरुवात केली.
- केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या या लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना 1 ते 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारेल.
- देशातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून त्यांना स्वावलंबी बनवणे, हा या लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व महिला स्वतःचा लघु उद्योग सुरू करून, आपला सामाजिक व आर्थिक विकास करत आहेत.
- या लखपती दीदी योजनेमुळे देशात बचत गटामार्फत सुरू झालेल्या लघु उद्योगामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने, इतरही महिला या योजनेचा या योजनेमुळे स्वावलंबी होत आहेत.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी, तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातून वाढ करण्याच्या, उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरना ला चालना मिळेल.
लखपती दीदी योजना मराठी ची वैशिष्ट्ये |
- देशातील ग्रामीण भागातील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, केंद्र सरकारमार्फत लखपती दिदी योजनेची सुरुवात करण्यात आली.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वतःचा व्यवसाय, लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकारमार्फत एक ते पाच लाख रुपयांची कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाते, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- केंद्र सरकार मार्फत लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून देशातील उद्योजक होण्याची स्वप्न असणाऱ्या सर्व महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य पुरविले जाते.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून लघुउद्योगांसाठी सहज उपलब्ध होणारी सूक्ष्म खर्च सुविधा उपलब्ध केली गेली आहे.
- देशातील महिलांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा ही लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून प्रदान केली आहे, हे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.
- केंद्र सरकार मार्फत आत्तापर्यंत एक कोटी महिलांना लखपती बनवले आहे, त्याचप्रमाणे आता देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याची लक्ष या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आले आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावून बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनतील.
- लखपती दीदीचे योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील महिलांना प्रशिक्षणाबरोबर विविध सशक्तिकरण कार्यक्रम व कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
- देशातील महिलांना एलईडी बल्ब, प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती यासारख्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून, त्यांना लघुउद्योजक होण्यास प्रोत्साहन दिले जाते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजनेचे फायदे |
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बचत आणि गुंतवणूक या गोष्टींची माहिती मिळेल व त्याचबरोबर त्यांना यांची सवय होईल.
- या योजनेअंतर्गत महिलांना विमा संरक्षण दिले जाते, त्यामुळे त्या आत्मनिर्भर बनतील.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- या योजनेअंतर्गत उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण व सूक्षम पद्धतीने दिले जाणारे कर्ज, त्यामुळे ते लघुउद्योजकांना ते सोयीचे ठरेल.
- लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल, त्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल.
- देशातील महिला सक्षमीकरण साठी या योजनेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानाची स्थिती सुधारेल.
- सध्या देशातील ९ करोड महिला या 83 लाख बचत गटाच्या माध्यमातून लखपती योजनेचा लाभ घेत आहेत.
- तसेच येणाऱ्या काळामध्ये दोन कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा संकल्प केलेला आहे.
- या योजनेमुळे महिलांच्या अंगी असणार्या सुप्त गुणांना वाव मिळेल व ते आपला उद्योग व्यवसाय वाढीसाठी त्याचा उपयोग करतील.
- या लखपती दीदी योजनेमुळे महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या लखपती दीदी योजनेमुळे बचत गटांना प्रोत्साहन मिळेल व आपोआपच महिला साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
- देशातील ग्रामीण भागातील महिला या साक्षर व सुशिक्षित होतील.
- या योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या साक्षर होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजनेचे लाभार्थी |
देशातील बचत गटाशी संबंधित असणाऱ्या, सर्व जाती धर्मातील, तसेच 18 ते 50 वयोगटातील सर्व महिला या लखपती दीदी योजनेसाठी लाभार्थी आहेत.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ |
केंद्र सरकार मार्फत देशात सुरू करण्यात आलेल्या लखपती दीदी योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी, आपल्या आवश्यकतेनुसार महिलांना एक ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- देशातील लखपती दीदी योजनेचा लाभ घेणारी अर्जदार महिला ही भारत देशाची मूळ रहिवासी असावी.
- या लखपती दीदी योजनेच्या अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा कमी असावे.
- या योजनेतील अर्जदार महिलेचे लाभ घेण्यासाठी, त्या महिलेचे वय 18 वर्षे ते 50 वर्ष च्या दरम्यान असावे.
- या योजनेत अंतर्गत लाभ घेण्यासाठी फक्त देशातील महिलाच अर्ज करू शकतील.
- पुरुषांना या योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही.
- लखपती दीदी योजनेचा लाभ महिला बचत गटाशी संबंधित असणाऱ्या महिलांना दिला जाईल.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | लखपती दीदी योजना आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- अर्जदार महिलेचे पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- जन्माचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला लखपती दीदी योजनेच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- त्यानंतर मुखपृष्ठा वरती home page open होईल.
- नंतर तिथे दिलेल्या applay for lakhpati didi yojana लखपती दीदी योजना या पर्यायावर click करावे लागेल.
- नंतर तुमच्यासमोर लखपती दीदी योजनेचा अर्ज open होईल.
- तो अर्ज आपल्याला काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित भरावा लागेल.
- त्यानंतर अर्जात विचारलेली कागदपत्रे आपणाला अर्जासोबत स्कॅन करून apload करावी लागतील.
- त्यानंतर खाली submit ऑप्शन दिसेल, त्यावर click करावे आणि आपला अर्ज submit करावा.
- त्यानंतर भरलेल्या अर्जाची print करून ती प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा.
- अशाप्रकारे तुमचे लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- सर्वात प्रथम आपणाला लखपती दीदी योजने साठी अर्ज करण्यासाठी, जवळच्या जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभागात जावे लागेल.
- तिथून आपणाला लखपती दीदी योजनेचा अर्ज मिळेल.
- तो अर्ज व्यवस्थित वाचून योग्य व अचूक रित्या भरावा.
- नंतर त्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज आपल्याला कार्यालयात जमा करावा लागेल.
- जमा केलेल्या अर्जाची पोचपावती घ्या.
- अशाप्रकारे तुमची ऑफलाइन चे प्रोसेस पूर्ण होईल.
1 thought on “Good News | लखपती दीदी योजना मराठी | Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | मिळणार 5 लाख बिनव्याजी कर्ज |”