गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | Gai Gotha Anudan Yojana 2024 | Good News | ऑनलाईन अर्ज सुरु |

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र |

Gai gotha Anudan yojana2024 panchayat samiti gotha anudan yojana gay gotha yojana marathi mofat gay mhais gotha yojana maharashtra shasan yojana

Gai Gotha Anudan Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत राज्यातील जनतेसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात असते. या योजना या राज्य शासनाकडून अनुदान तत्वावर राबवल्या जात असतात. कधी कधी 50 टक्के अनुदान, तर कधी पूर्ण म्हणजे 100 टक्के अनुदान तत्वावर या योजना राबवल्या जात असतात.
राज्य शासनाचा या योजना सुरू करण्यामागे एकच उद्देश असतो. तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास, अनुसूचित जाती जमाती, बांधकाम कामगार व शेतकरी अशा सर्वांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे. तसेच त्यांना आपापल्या क्षेत्रात प्रगती करण्यास सहकार्य करणे हाच असतो.
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक लोक पारंपारिक पद्धतीने शेती करताना दिसून येतात. या शेतकरी वर्गाकडे शेतीबरोबरच जोडधंदा मधून गाई, म्हशी, शेळ्या व कोंबड्या या पाळल्या जातात. यांच्यासाठी शेतकऱ्याकडे पक्क्या स्वरूपाचा निवारण नसतो. त्यामुळे होणारा पाऊस, ऊन, वारा यांच्यापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला अनेक अडचणी निर्माण होतात.
या सर्वातून जनावराचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहतील. अशी नैसर्गिक संकटे वारंवार येताच राहतात. यातून काही वेळा ही जनावरे दगावतात सुद्धा त्यातून शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली. ती योजना म्हणजे ” गाय गोठा अनुदान योजन “ हि योजना होय. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना व पशुपालकांना पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये गाय म्हैस गोठा, शेली पालन शेड, कुक्कुटपालन शेड या सर्वांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
तसेच ग्रामीण भागातील बहुतांश लोक रोजगार उपलब्ध न झाल्याने शहरात स्थलांतर करतात. त्यांचे ते स्थलांतर थांबवण्यासाठी व गावातच, खेड्यातच रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत एकत्रितपणातून दिला जाणारा रोजगार या योजनेची जोडला जाणार आहे. यातून या लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.

Gai Gotha Anudan Yojana 2024 | वाचकांना विनंती |

मित्रानो, राज्य शासन प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे योजना राबवत असते. त्या योजनांची माहिती आपण रोजच पाहत असतो. त्याचप्रमाणे आज आपण शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या गाय गोठा अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचवा. तशेच या योजनेचा लाभ घ्या. त्याचबरोबर तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी, पशुपालक आहेत. त्यांनाही या योजनेबद्दल माहिती सांगा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या हा लेख जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्यामुळे समाजातील लोकांनाही या योजनेचा फायदा होईल, ही विनंती.

योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग
उद्देशशेतकर्यांना पक्का गोठा बांधण्यास साह्य करणे
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभपक्का गोठा बांधण्यास अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन / ऑनलाईन

 

हे देखील वाचा –

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |

Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | Good News | रोजगार हमी योजना माहिती मराठी |ऑनलाईन नोंदणी |

निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | Good News | निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | ऑनलाईन नोंदणी सुरु |

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजनेचा उद्देश |

  • राज्यातील शेतकऱ्याला स्वतंत्र व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • शेतकऱ्याकडे असणाऱ्या गायी, म्हशी, कोंबड्या या सर्वांचे ऊन, वारा व पाऊस यांच्यापासून रक्षण करण्यासाठी राज्य शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आर्थिक विकासास हातभार लावणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • शेतकर्याकडे असणारी जनावरे अशी त्याची उत्पन्नाची साधने भक्कम करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून गावाचा व शेतकऱ्याचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
  •  राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात झाली.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पशुपालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |

  •  गाय गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पक्का गोठा तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • गाय गोठा अनुदान योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
  • गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत ची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा केली जाते.
  •  गाय गोठा अनुदान योजना हि शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते.
  • गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करून त्यांना समृद्ध बनवणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा योजने अंतर्गत मिळणारे अनुदान |

राज्यातील ग्रामीण भागात जनावरांसाठी पक्के गोठ्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे शेन व मलमूत्र यामुळे जनावरे चार व्यवस्थित खात नाहीत, त्यामुळे तो वाया जातो. तसेच घाणीचे साम्राज्य पसरून जनावरांना अनेक आजार होतात. त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होते. हे सर्व टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत मिळणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे.

  • 2 ते 6 गुरांसाठी पक्का गोठा बांधला जातो त्यासाठी मिळणारे अनुदान 771 88/- रुपये होय.
  • 6 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान दिले जाते.
  • 12 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजे 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते.
  • लांबी 7.7 मी आणि रुंदी 3.5 असलेली 26.95 चौ . मी जमीन पुरेशी आहे.
  • 200 लिटर क्षमतेची जनावरांना पिण्याच्या पाण्याची बांधण्यात येते.
  • गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग केलेले असणे गरजेचे आहे.
  • तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या निकषानुसार, या कामाचा लाभ मिळवण्यासाठी पत्र लाभार्थ्याकडे स्वताची जमीन व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजनेचे लाभार्थी |

 महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी व पशुपालक गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्र आहेत.

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजनेचे फायदे |

  •  गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी ही शेड उभा करण्याकरता अनुदान देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत कुक्कुटपालनासाठी ही अनुदान देण्यात येते.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • गाय गोठा अनुदान योजना मुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचा तसेच गावाचा आर्थिक व सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात होईल.
  • गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत गोटा बांधल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडेल.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय व म्हैशीसाठी गोटा बांधण्यासाठी, शेळी पालन करण्यासाठी शेड बांधण्यासाठी तसेच कुकूटपालनाचे शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
  • या योजनेच्या आर्थिक सहाय्यामुळे  राज्यातील शेतकऱ्यांना कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार तरुण पशुपालन क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  • या योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्याबरोबर स्त्रियांनाही या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन, वारा व पाऊस यापासून रक्षण होईल.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | या योजनेसाठी आवश्यक पात्रता |

गाय गोठा अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी व पशुपालक पात्र आहेत.

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान योजनेचे नियम व आटी |

  •  गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशांनाच दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी स्वतंत्रपणे अर्ज करणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या जमिनीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
  • गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडच्या पशूंचे स्वतंत्रपणे टॅगिंग करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांनी या अगोदर जर केंद्र व राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत गाय गोटा बांधलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना दिला जाईल.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. रहिवासी दाखला
  5. जनावरांचे जीपीएस टायपिंग केल्याचे प्रमाणपत्र
  6. सातबारा उतारा
  7. ज्या जागेत शेड बांधणार आहोत त्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र
  8. शेतकऱ्याकडे पशुधन अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र
  9. ग्रामपंचायत शिफारस पत्र
  10. अर्जदाराकडे रोजगार हमी योजनेचे प्रमाणपत्र
  11.  जॉब कार्ड
  12.  जात प्रमाणपत्र
  13. या आधी शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वंय घोषपत्र

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | अर्ज रद्द होण्याची करणे |

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराकडे पूर्वीचा पक्का कोटा उपलब्ध असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराने एकाच वेळेस दोन अर्ज भरल्यास एक अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार राज्याबाहेरील रहिवाशी असल्यास अर्ज रद्द होतो.
  • अर्जदाराकडे पशु उपलब्ध नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराकडे स्वतःचे मालकीची जमीन नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराने या आदि केंद्र व राज्य शासनाच्या गाय गोटा अनुदान योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठानुदन योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम आपणाला नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
  • तिथून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व आवश्यक ती योग्य माहिती भरावी.
  • तसेच अर्जात आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा व पोचपावती घ्यावी.
  • अशाप्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Gai Gotha Anudan Yojana 2024 |

गाय गोठा अनुदान योजना form Click Here

गाय गोठा अनुदान योजना शासन निर्णय Click Here

1 thought on “गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | Gai Gotha Anudan Yojana 2024 | Good News | ऑनलाईन अर्ज सुरु |”

Leave a Comment