Free LPG Gas Cylinder Scheme |
Free LPG Gas Cylinder Scheme |
LPG Gas Cylinder scheme
pm ujjvala yojana
mukhyamntri annpurna yojana
annpurna yojana e – kyc
नमस्कार, Free LPG Gas Cylinder Scheme | महायुती सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींसाठी वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पांमध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्या योजनेच्या नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय.
या योजनेसाठी चा नवीन GR नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानुसार या योजनेसाठीचे पात्रता काय ? अटी शर्ती कोणत्या असणार ? लाभ कोणाला मिळणार ? किती रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होणार ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल गिफ्ट | Ladki Bahin Yojana Mobile Gift | कोणाला मिळणार लाभ ? पात्रता काय असणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
फ्री गॅस सिलेंडर साठी पात्रता |
- राज्यातील ज्या महिलांनी पीएम उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली आहे, त्या महिलांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
- तसेच ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेत आहेत, त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
अन्नपूर्णा योजनेचे नियम व आटी |
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
- एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन हे जर पुरुषाच्या नावे असेल, तर ते लगेच महिलेच्या नावावर ट्रान्सफर केल्यास, त्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
- जर आपल्या घरातील पुरुषाच्या नावावर एलपीजी सिलेंडर असेल, तर ते महिलेच्या नावावर करायचे असल्यास ? एलपीजी गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन, तेथे फॉर्म भरून घरातील एलपीजी सिलेंडर हा महिलेच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. Free LPG Gas Cylinder Scheme |
- एलपीजी सिलेंडर महिलेच्या नावावर ट्रान्सफर केल्यास त्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
- तसेच राज्यातील महिलांनी एलपीजी सिलेंडरची केवायसी केलेली असणे आवश्यक आहे, जर केलेली नसल्यास तात्काळ आपल्या गॅस वितरकाकडे जाऊन ही केवायसी करून घ्यावी.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 % वाढ | Anganwadi Workers News | तसेच लाडकि बहिण योजनेचा इन्सेंटिव्ह ही दिला जाणार |
अन्नपूर्णा योजनेची लाभ प्रक्रिया |
- राज्य शासनामार्फत नुकताच नवीन Gr जाहीर करण्यात आलेला असून, या योजनेअंतर्गत प्रथम आपणाला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करतो व त्याची संपूर्ण रक्कम देतो, त्याचप्रमाणे आपल्याला प्रक्रिया करायचे आहे.
- तसेच आपण संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला एलपीजी गॅस सिलेंडरवर जेवढी रक्कम अदा केली आहे, तेवढी रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- तसेच राज्यातील ज्या महिलांनी पीएम उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक टाकी मागे सबसिडी मिळत आहे, त्यांना ती सबसिडी व उर्वरित गॅसची रक्कम देण्यात येणार आहे. Free LPG Gas Cylinder Scheme |
लाभ किती मिळणार ?
- आपल्याकडे जर उज्वला योजनेअंतर्गत मिळालेला गॅस कनेक्शन असेल, तर आपल्याला 830 रुपये इतकी रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे.
- आणि ज्या महिलांना उज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नसेल, त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 530 इतकी रक्कम जमा होणार आहे.
1 thought on “वर्षाला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत | लगेच भरा हा फॉर्म | Free LPG Gas Cylinder Scheme | अर्ज प्रक्रिया झाली सुरू |”