भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
Bhausaheb fundkar falbag lagvad scheme
Bhausaheb fundkar falbag lagvad scheme Maharashtra
Falbag lagvad anudan Yojana
100 % anudan Yojana for government
Bhausaheb fundkar falbag lagvad anudan Yojana
नमस्कार, Bhausaheb fundkar falbag lagvad scheme राज्यशासनामार्फात राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजनांच्या माध्यमातून आर्थिक साह्य केले जाते. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून राज्यत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यात सन 2018 च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, पीक रचनेत बदल करणे, तसेच प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या उत्पन्नात वाढ करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 100 % अनुदान दिले जाते. हे अनुदान 3 वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येते. राज्यातील जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभ देते.
या योजनेचा लाभ कोकण विभागासाठी कमाल आहे तर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल सहा हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती व पशुधन या बरोबरीत फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी मिळणार 10 लाख रु. कर्ज |
तसेच फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल यांचे तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? अर्ज कसा करायचा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकर्याने फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसवणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.
- शेतकऱ्याचा स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. Bhausaheb fundkar falbag lagvad scheme
- सर्व प्रवर्गातील ज्या शेतकऱ्यांना कुटुंबाची उपजीविका केवळ शेतावर अवलंबून आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- शेत जमीन जर सामायिक क्षेत्र असेल, तर इतर खातेदारांची संमतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या हिस्स्याच्या मर्यादित लाभ घेता येईल.
- परंपरागत व निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
- इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असेल, तर ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादित शेतकऱ्यास लाभ घेता येतो.
100 दिवसात राज्यात सुरु होणार महालक्ष्मी योजना | प्रत्येक महिलेला मिळणार दर महा 3000/- रुपयांचा लाभ |
आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- हमीपत्र
- सामायिक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमती पत्र
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- योजनेचा अर्ज
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- ईमेल आयडी
Bhausaheb fundkar falbag lagvad scheme
अर्ज करण्याची पद्धत |
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी प्रथम अर्जदाराला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल.
- त्यानंतर ‘ शेतकरी योजना ‘ यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज नोंदणी यावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढे असणार्या अर्जावर तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी, पत्त्यासह तुमची आवश्यक वैयक्तिक माहिती अचूक भरा.
- त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर तुमच्या खात्यात लॉगिन करा आणि प्रोफाइल 100% पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक तपशील, पत्ता तपशील आणि जमिनीची माहिती तपशील प्रविष्ट करून फॉर्म पूर्ण करा. Bhausaheb fundkar falbag lagvad scheme