राजे यशवंतराव होळकर ‘ महामेष अनुदान योजना ‘ |
नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना असेल किंवा राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असेल, या योजनेअंतर्गत शेळी – मेंढी वाटप योजना असेल, जागा खरेदीसाठी अनुदान असेल, कुक्कुटपालनासाठी अनुदान असेल, चराई अनुदान असेल अशा प्रकारच्या 18 योजना या मंडळातर्फे या योजनेअंतर्गत राबवल्या जातात.
या 18 योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत. या योजनेसाठी 26 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Mahamesh Scheme 2024 | महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात | शेळ्या, मेंढ्या व कुकुट पालन आणि जागा खरेदीसाठी ही अनुदान | वाचा सविस्तर माहिती |
महामेष अनुदान योजना |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ लिमिटेड महाराष्ट्र शासनातर्फे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये तुम्ही पाहू शकता राजेशवंतराव होळकर महाबळेशी योजना असेल, मेंढ्यांसाठी चराई अनुदान असेल, मेंढी शेळी पालनासाठी, जागा खरेदीसाठी अनुदान असेल कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान असेल.
या चार प्रकारांमध्ये 18 प्रकारच्या योजना असणार आहेत. यासाठी ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. यात ज्या काही सूचना आहेत, या तुम्ही पूर्णपणे एकदम व्यवस्थित वाचून घ्या. कोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत ? त्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहेत.
26 सप्टेंबर 2024 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाची जी काही पावती आहे, ती काढण्याची सुविधा ही 26 सप्टेंबर नंतर असणार आहे. त्यामुळे आता फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे.
तुम्ही महामेष मोबाईल ॲप्लिकेशन ने सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वेबसाईट वरती सुद्धा फॉर्म भरू शकता, तसेच योजना संबंधित जे काही कागदपत्रे असतील डाऊनलोड करण्यासाठी तिथे नमुने असतील ते दिलेत, शासन निर्णय असेल, मार्गदर्शक सूचना असतील कागदपत्रे लागतात ते सुद्धा देण्यात आलेले आहेत.
Ayushman Bharat Scheme | आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |
Apply Online Mahamesh Yojana 2024 |
- प्रथम तुम्हाला महामेश्च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- महत्त्वाच्या सात प्रकारच्या सूचना आहेत, एकदा संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे नवीन अर्जदार नोंदणी करायची
- आपण नवीन आहात, तर नवीन अर्ज नोंदी वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर त्याचा प्रकार निवडायचा आहे, वैयक्तिक अर्जदार आहे का ? अजून बचत गटाचा अर्जदार आहे का? हा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे.
- अर्जदार हा भटक्या जमाती म्हणजेच एनटीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे, रेशन कार्ड नुसार नमूद करण्याची सर्व सदस्यांची नावे अचूक भरायची आहेत.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे, 18 पेक्षा जास्त वय हे साठ वर्षापर्यंत अर्ज करू शकतात.
- आधार कार्ड सोबत एकच व्यक्ती इथे नोंदणी करू शकतो.
- अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे, तुमच्याकडे निवड प्रक्रिया एसएमएस द्वारे तुम्हाला कळविण्यात येणार आहे.
- माहिती भरण्यासाठी तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे, ते नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे, आडनाव टाकायचा आहे.
- त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला आधार कार्ड नंबर एकदम व्यवस्थित टाकून घ्या पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकून घ्या.
- नंतर अर्जदाराची जन्मतारीख विचारली आहे, आधार कार्ड नुसार जन्मतारीखची असेल ती इथे सिलेक्ट करा त्यानंतर वय ऑटोमॅटिकली किती आहे ते दाखवलं जाईल.
- नंतर पुरुष, स्त्री इतर जे काही असेल, ते इथे सिलेक्ट करा.
- त्यानंतर मोबाईल नंबर विचारला जाईल, तर अर्जदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे.
- त्यानंतर खाली इमेल आयडी विचारला ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून दया.
- त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का ? अपंग असेल तर होय करा.
- तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय ? जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, त्यानंतर तुमचे गाव निवडा.
- त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल, तरी ते एनटीसी आहे, म्हणजे भज क अर्ज करू शकतात. ती सिलेक्ट करा.
- नंतर रेशन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे, बारा अंकी नंबर इथे टाकायचा आहे आणि जर 12 अंकी नंबर नसेल, तर रेशन कार्डचा सिरीयल नंबर सुद्धा टाकू शकता.
- त्यानंतर विवाहित आहात का? विवाहित असेल तर होय, नसेल तर नाही.
- विवाहित असेल तर किती अपत्य आहे ? किती मुलं, मुली आहेत ? ते संख्या टाका.
- त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे, बँकेचा खाते नंबर म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- आयएफसी क्रमांक टाकायचा आहे, नंतर शाखा म्हणजे ब्रांच कोणती आहे ? कुठली आहे आणि पिनकोड इथे टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय कौटुंबिक माहिती भरायचे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड नुसार भरायची आहेत.
- आपल्या स्वतःचं नाव इथे टाकायचं नाही, स्वतःचं नाव सोडून बाकी सर्व बाकी सर्व सदस्यांची नावे इथे तुम्हाला भरायची आहेत.
- नंतर शेवटी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
- शेवटी submit या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज submit करायचा आहे.
अशापाकारे राजे यशवंतराव होळकर महामेश अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
the form is not submited