Biogas anudan Yojana 2024 | बायोगॅस अनुदान योजना |
Biogas anudan Yojana
नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या संस्था, दूध उत्पादक संस्था इत्यादी. संस्थांना बायोगॅस प्रकल्प दिले जातात. त्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन आणि त्याच्या खताचे योग्य व्यवस्थापन व्हावे व त्यांच्या शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत जास्तीत जास्त उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवला जात आहे. आणि या प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक 2 ते 4 घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या अनुदानाची मर्यादा 14,500 हजार रुपया पर्यंत आहे. Biogas anudan Yojana
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना, गोठ्यामध्ये शेणा पासून इंधन तयार करता येते. त्याचबरोबर गॅस सिलेंडर होणाऱ्या खर्चावर ही बचत करता येते व शेतीसाठी लागणारा सेंद्रिय खत ही मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे.
या बायोगॅस योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्हींच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. आणि या योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने आपल्या कृषी ऑफिस पंचायत समिती मध्ये अर्ज सादर करता येऊ शकतात.
Biogas anudan Yojana | बायोगॅस योजनेची वैशिष्ट्ये |
प्रकल्पाची उद्दिष्टे – शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन व शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत उपलब्ध करून देणे.
अनुदानाची मर्यादा – दोन ते चार घनमीटर पर्यंतच्या बायोगॅस प्रकल्पासाठी 14,500 रुपये
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्जाची अंतिम तारीख – 14 ऑगस्ट 2024
Biogas anudan Yojana |या योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील ग्रामीण भागातील शेतकर्यांना, लोकांना सेंद्रिय खत वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- जैविक इंधन वापर वाढवून पर्यावरणाचा धोका कमी करून, विजेवरील भार कमी करने.
- राज्यतील शेतकर्यांना बायोगॅस उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे.
- ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान स्तर उंचावणे. Biogas anudan Yojana
- बायोगॅस अनुदान योजनेतून, जोडणीतून परिसराची स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखने.
बायोगॅस अनुदान योजनेचे फायदे |
- बायोगॅस योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे व त्यासोबत शेतकऱ्यांची आर्थिक बचत ही होणार आहे.
- बायोगॅस मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरातील दैनंदिन वापरातील गॅस उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर वरील खर्चातील बचत होणार आहे.
- तसेच यातून मिळणाऱ्या सेंद्रिय खतामुळे त्यांच्या शेतीची गुणवत्ता वाढणार आहे.
- त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळणार आहे.
- बायोगॅस मुळे त्यांना दुसऱ्या इंधनावर अवलंबून राहण्याची गरज पुरणार नाही, तसेच शेतकरी बायोगॅस पासून त्यांना लागणारी वीज ही तयार करू शकतात.
- त्यामुळे त्यांचा विजेवरील पैशाची ही बचत होणार आहे. Biogas anudan Yojana
- या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्ज सादर करावा. तसेच ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पंचायत समितीमध्ये अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.
हे हि वाचा –
Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला
Document List For Biogas Anudan Yojana |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशनकार्ड
- उत्त्पनाच दाखला
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- इमेल आयडी
बायोगॅस अनुदान कसे मिळवायचे ?
बायोगॅस अनुदान योजनेसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी सर्व बाबतीत यशस्वी बांधकाम आणि प्रकल्प सुरू केल्यानंतर सरकारी कर्मचारी त्या बांधकामाची पडताळणी करतील व सर्व काही सुरळीत असल्यास केंद्रीय व राज्य शासनाची आर्थिक मदत लाभार्थीच्या आधारला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. Biogas anudan Yojana
Apply for Biogas Anudan Yojana 2024 |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : बायोगॅस अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्जही करता येणार आहेत.
Biogas anudan Yojana योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज भरताना आपली आवश्यक ती माहिती भरून ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्ज करावा लागेल.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया : इच्छुक शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागेल. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
Biogas Anudan Yojana | बायोगॅस अनुदान योजना अधिकृत website CLICK HERE