Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र |

don mulinsathi yojana maharashtra 2024
maha shasan yojana
girls scheme
mazi kanya bhagyashri yojana
lek ladki yojana

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र कडून राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून राबवल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून त्यांच्या जीवनमान दर्जा उंचावणे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून योजना राबवल्या जातात.
राज्य शासनाकडून राज्यातील गरीब जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या  लागण्या जाणाऱ्या योजनां मागे निरनिराळी वेगवेगळे हेतू असतात ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासन स्तरावरून नेहमीच प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते व त्यासाठीच अनुदान दिले जाते.
त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून राज्यातील गोरगरीब, मध्यमवर्गीय, दारिद्र्याची खालील, अनुसूचित जाती – जमातीतील, शेतकरी, कामगार व  कष्टकरी वर्गातील नागरिकांच्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या फक्त दोन मुली असणाऱ्या साठी काही योजना राबवल्या जातात. त्यासाठी योजनेचे नाव म्हणजे ” दोन मुलींसाठी योजना “ होय.
राज्यातील ज्या गरीब घरातील कुटुंबामध्ये ज्या पालकांना दोन मुली झाल्या आहेत. त्यांच्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि लग्न यासाठी अनुदान स्वरूपात, शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावन तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास या योजनांच्या माध्यमातून करण्याचा उद्देश असतो. तसेच त्या कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुली व मुलांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. मुलींची समाजातील संख्या वाढावी, तसेच स्त्रीभ्रूणहत्या कमी व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाकडून मुलींसाठी विविध योजना राबवल्या जातात.

त्यामध्ये राज्य व केंद्र शासनामार्फत प्रामुख्याने माझी कन्या भाग्यश्री योजना, बालसंगोपन योजना, किशोरी शक्ती योजना तसेच लेक  लाडकी योजना. या योजनांचा समावेश होतो.
या योजनांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. त्यामुळे पालकांवर पडणाऱ्या मुलींच्या शिक्षणाचा आर्थिक ताण कमी होऊन, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, तसेच त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये व मुलींची प्रगती होऊन समाजाची प्रगती व्हावी. या उद्देशाने या योजनांची सुरुवात करण्यात आली आहे.

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, आपला राज्यात राज्य व केंद्र शासनाकडून नेहमीच विविध योजना राबवल्या जात असतात. त्या योजनांच्या माध्यमातून समाजातील दारिद्र्य नष्ट करून नागरिकांना सुविधा पूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.lek ladki yojana marathi
तसेच तुमच्या कुटुंबात किंवा आसपासच्या परिसरात या पालकांना दोन मुली आहेत. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलींच्या भविष्यासाठी या योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहेत ? वयाची अट कोणती आहे ? कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत ? या सर्वांची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

योजनेचे नावदोन मुलींसाठी योजना
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील सर्व मुली
लाभशिक्षण व आरोग्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे पण वाचा –

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | Good News | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी | पहा सर्व माहिती |

New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?

New | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र | Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | जेष्ठांना तीर्थक्षत्राची मोफत यात्रा |

New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |

New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | दोन मुलींसाठी शासनाच्या विविध योजना |

माझी कन्या भाग्यश्री योजना :

आपल्या राज्यातील मुलींचे आरोग्य, शिक्षण यामध्ये सुधारणा करून त्यांना उज्वल भविष्य प्रदान करण्यासाठी तसेच बालिका भ्रूणहत्या कमी करणे, मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच मुलींबद्दल समाजामध्ये सकारात्मक विचार दृष्टी निर्माण करणे व बालविवाह टाळणे, मुलांन इतका मुलीचा जन्मदर वाढवून, मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे, तसेच मुलींना शारीरिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दिनांक 1 जानेवारी 2014 पासून राज्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात केली.
राज्यातील बहुतांशी कुटुंबे दारिद्र्याच्या खालील जीवन जगत आहेत. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरत असतात. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे त्यांना फारशी जमत नाही व त्या समाजामध्ये मुलींना कायम स्वरूपी कमी लेखले जाते. मुलांपेक्षा मुलींना कमी महत्व दिले जाते. त्यामुळे भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते व बालविवाह सुरू होतो. तसेच मुलींना कायमस्वरूपी शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. या सर्व विचारांना बदलण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने माजी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज click here 

बाल संगोपन योजना महाराष्ट्र :

महाराष्ट्र शासनाने राज्यात बालसंगोपन योजनेची सुरुवात 2005 साली करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील 0  ते 18 वयोगटातील अनाथ, बेघर, निराश्रीत बालके, अन्य प्रकारे आपत्तीत असलेले बालकांचे. यांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन करता यावे, या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली. राज्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे गृहभेटी देण्यासाठी व इतर सनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसताना सुद्धा त्यांच्या मार्फत हजारो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेमुळे राज्यातील अनाथ, बेघर, निराश्रीत, शारीरिक व्यंग व अपंग असलेल्या बालकांच्या संगोपना साठी मासिक अनुदान दिले जाते. जेणेकरून या मुलांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. तसेच या योजनेमुळे राज्यातील बेघर, निराश्रीत बालके आर्थिक सहाय्य मिळाल्याने, इतर व्यसनाच्या आहारी जात नाहीत. तसेच बेकायदेशीर कृत्य करण्याची त्यांना गरज पडत नाही.

किशोरी शक्ती योजना :

किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील, खेड्यातील तसेच आदिवासी क्षेत्रातील, किशोरवयीन मुलींना अंगणवाडी सेविकाच्या मदतीने पोषण, आरोग्य विषयक दर्जा, शारीरिक स्वच्छता तसेच लैंगिक शिक्षण – प्रशिक्षण इत्यादी विषयावर संपूर्ण माहिती दिली जाते. राज्यातील किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनवून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली.
राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात. त्यामुळे अशा कुटुंबातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या मुलींचे आरोग्य, शिक्षण तसेच योग्य सकस आहार देण्यास असमर्थ असतात. अशा कुटुंबासाठी या योजना अंतर्गत विचार केले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उज्वल भविष्य प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र किशोर शक्ती योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

 

सुकन्या समृद्धी योजना :

22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना ची सुरुवात केंद्र सरकारने केली. या योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीचे योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेची   सुरुवात खास करून मुलींसाठी करण्यात आली आहे. ही बचत योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी. या योजना अंतर्गत केली जाणारी बचत महत्त्वाची असणार आहे.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत दरवर्षी कमी कमीत कमी अडीचशे रुपये व अधिक अधिक दीड लाख गुंतवणूक करून या योजनेत सहभागी होता येते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम व्याज सकट मुलीच्या आई-वडिलांना परत दिली जाते.

 

लेक लाडकी योजना :

आपल्या राज्यातील समाजात मुलीला आजही कमी लेखले जाते. मुलींना मुलापेक्षा कमी महत्त्व दिले जाते आणि त्यामुळे समाजात मुलींचे बाल हत्या, बालविवाह केले जातात. मुलींना शिक्षणात कमी महत्व दिले जाते. अशा मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते. या सर्व समस्यांचा विचार करून मुलींसाठी समाजामधील नकारात्मक विचारसरणी बंद करून सकारात्मक विचार करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडके योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. lek ladki yojana onlain form
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींचे सक्षमीकरण करून त्यांना शिक्षणासाठी सतत सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना लाभ दिला जातो. ज्या घरात मुलगी जन्माला येते. त्यांना प्रथम पाच हजार रुपये दिले जातात. नंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम वाढवत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जातात.

लेक लाडकी योजना शासन निर्णय click here 

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | दोन मुलीन साठीची योजना महाराष्ट्र चे फायदे |

  • महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मुलींसाठीच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी या योजना  महत्वपूर्ण ठरणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून समाजात मुलींचे केले जाणारे गर्भपात, बालविवाह आणि स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या गोष्टींना आळा बसेल.
  • दोन मुलींसाठीच्या योजनेमुळे मुलीच्या पालकांना मुली या ओझे वाटणार नाहीत व त्यांनी याबद्दल कुटुंबात, समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल.
  • या योजना अंतर्गत केलेली बचती 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नकार्यासाठी वापरता येईल.
  • केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अत्यंत कमी म्हणजे अडीचशे रुपये पासून गुंतवणूक करता येते.
  • या योजनेमुळे सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल. lek ladki yojana maharashtra
  • समाजातील मुलींच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास या केंद्र व राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना महत्त्वपूर्ण ठरतील.

 

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पालकाचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पालकांचा रहिवासी दाखला
  • अर्ज करणाऱ्या पालकाचे कायदेशीर पालक असल्याचा पुरावा
  • पालकांचा मूळ रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  • महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनामार्फत मुलिंनसाठी सुरु करण्यात आलेल्या माझी कन्या bhagyqshri योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि किशोरी शक्ती योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.
  • या योजना च्या अधिकृत website वर जावून आपणाला अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज करण्याची प्रोसेस सबंधित योजनेच्या साईट वर पहा.

 

 

2 thoughts on “Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |”

Leave a Comment