Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र |
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, राज्य शासना कडून राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. शासनाकडून राबविल्या जाणार्या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून राबवल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून, त्यांच्या जीवनमान दर्जा उंचावणे. या उद्देशाने राज्य शासनाकडून योजना राबवल्या जातात.
त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील साठ वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांना देशातील व आपल्या राज्यातील तीर्थक्षेत्रांचे तीर्थ दर्शन करता यावे, या उद्देशाने एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना “ होय.
आपल्या राज्यात सर्व धर्माचे, पंथाचे नागरिक वास्तव्य करतात. हे सर्व नागरिकांना साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाकडून आनंदाची बातमी दिलेली आहे. त्यानं देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचे मोफत यात्रा करण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याचे जाहीर करण्यात आली. त्यानंतरच्या सदर निर्णय हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतलेला आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भारतातील एकूण 73 व महाराष्ट्राचे एकूण 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जवळपास देशातील, राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे.
देशातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या तीर्थ क्षेत्रात जावून, त्यांना जाऊन मन शांती करावी व त्यांना अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्यासाठी चे सुवर्णसंधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून सुरू केली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब असणाऱ्या साठ वर्षावरील ज्येष्ठांना आपले दैनंदिन कर्तव्य करताना देव – देवतांचे, भगवंताचे नामस्मरण, चिंतन करता यावे, हा या योजनेचा उद्देश आहे.
देशातील हिंदू धर्मातील चार धाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचे मोठे स्थळे आहेत. त्या तीर्थस्थळांना आयुष्यात एकदा तरी भेट देण्याचे बहुतेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थिती मुळे, सोबत कोणी नसल्याने अनेक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांचे ही स्वप्न अपूर्ण राहते. हीच गोष्ट विचारत घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांनी देशातील मोठ्या तीर्थ्स्थाली जावून त्यांना जाऊन मनशांती करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत निश्चित केलेले तीर्थक्षेत्रापैकी एका ठिकाणी पात्र व्यक्तीला या योजने अंतर्गत एक वेळेस जाता येईल. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा ही प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष जेवण, भोजन, निवास इत्यादींचा समावेश असेल.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार इतके असावे. तसेच लाभार्थी नागरिक महाराष्ट्राच्या राज्याचा मूळ रहिवाशी असावा व त्याचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतच आलो आहोत. त्याचप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मुख्यमंत्र्याचे दर्शन योजनेसाठी पात्रता काय आहेत ? नियम कोणते ? अटी कोणत्या ? तसेच आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ? या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच हा लेख तुमच्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांनाही आपल्या आयुष्यातील या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे नागरिक |
लाभ | मोफत तीर्थ क्षेत्र दर्शन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |
New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |
Good News | लखपती दीदी योजना मराठी | Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | मिळणार 5 लाख बिनव्याजी कर्ज |
New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |
Good News | तार कुंपण योजना महाराष्ट्र | Tar Kumpan Yojana Marathi 2024 | सरकार देत आहे 90 % अनुदान |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यात एकदा तरी तिथे त्याला जाऊन येण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थ योजना ची सुरुवात करण्यात आली.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकाच्या मनशांती होईल व त्यांना समाधान मिळेल.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्तर्त्या वयात देवदर्शन करण्याचे सुख देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
- या योजनेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील साठ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी राज्य सरकारकडून प्रतिव्यक्ती प्रवास खर्च, भोजन व निवास यासाठी कमाल मर्यादा 30 हजार रुपये इतके दिले जाणार आहे.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन तसेच ऑफलाईन हे अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विनाकारण त्रास होणार नाही.
- या योजनेअंतर्गत तेथे योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येत नाही.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ राज्यातील दोन लाख 50 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जाईल.
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे लाभार्थी |
महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेली साठ वर्ष पूर्ण केलेले व त्यापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आहेत
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | या योजनेसाठी पात्रता |
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांची वय 60 वर्ष पूर्ण व त्यापेक्षा जास्त असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे, अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेणारा अर्जदार जेष्ठ नागरिकावर शहाजी व मानसिक दृष्ट्या निरोगी असावा.
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | या योजनेच्या तरतुदी |
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पती-पत्नीचे वय 75 पेक्षा जास्त असेल, तर त्यांना त्यांच्यासोबत एक सहाय्यक म्हणून नेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
- या योजनेच्या लाभार्थी पती-पत्नी तसेच त्यांच्या सहाय्यकाने प्रवासा संबंधी सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्यासोबत प्रवासाला एक सहाय्यक देण्याचे परवानगी देण्यात आली आहे, परंतु हे त्याला पूर्वी अर्जात नमूद करावे लागेल.
- जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे वय 75 पेक्षा जास्त असेल व त्याच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल, तरीही त्यांना सोबत सहाय्यक प्रवासी नेण्यासाठी परवानगी आहे.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील सहाय्यक प्रवास घेण्याची सुविधा तेव्हाच आहे, जेव्हा अर्जदाराचे वय 75 पेक्षा जास्त आहे व त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
Mukhyamntri Teerth Darshan Yojana | या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे |
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे जिल्हा
सिद्धिविनायक मंदिर | मुंबई |
विश्व विपश्यना पॅगोडा गोराई | मुंबई |
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ क्यॅवेल | मुंबई |
सेंट अँड्र्यू चर्च मुंबई | मुंबई |
माउंट मेरी चर्च वांद्रे | मुंबई |
चैत्यभूमी दादर | मुंबई |
महालक्ष्मी मंदिर | मुंबई |
वाळकेश्वर मंदिर मलबार हिल | मुंबई |
मुंबादेवी मंदिर | मुंबई |
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च, सीपझ औद्योगिक क्षेत्र अंधेरी | मुंबई |
सेंट जॉन द बॅटरी चर्च मरोळ | मुंबई |
गोदीजी पार्श्वंत मंदिर | मुंबई |
नेसेट एलियाहू सिनेगॉग मस्जिद भंडार | मुंबई |
मॅगेन डेव्हिड सिनेमा ग भायखळा | मुंबई |
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च | ठाणे |
अग्यारी / अग्निमंदिर | ठाणे |
मयुरेश्वर मंदिर मोरगाव | पुणे |
चिंतामणी मंदिर थेऊर | पुणे |
चिंतामणी मंदिर थेऊर | पुणे |
महागणपती मंदिर रांजणगाव | पुणे |
खंडोबा मंदिर जेजुरी | पुणे |
संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू | पुणे |
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड | पुणे |
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी | पुणे |
शिखर शिंगणापूर | सातारा |
संत चोखामेळा समाधी पंढरपूर | सोलापूर |
संत सावता माळी समाधी मंदिर अरण ता. माढा | सोलापूर |
विठोबा मंदिर पंढरपूर | सोलापूर |
महालक्ष्मी मंदिर | कोल्हापूर |
ज्योतिबा मंदिर | कोल्हापूर |
जैन मंदिर कुंभोज | कोल्हापूर |
संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती | छत्रपती संभाजी नगर |
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ | छत्रपती संभाजी नगर |
जैन स्मारके एलोरा लेणी | छत्रपती संभाजी नगर |
तुळजाभवानी मंदिर तुळजापूर | धाराशिव |
श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधार | नांदेड |
खंडोबा मंदिर मालेगाव | नांदेड |
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड | नांदेड |
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड | नांदेड |
रेणुका देवी मंदिर माहूर | नांदेड |
मुक्तिधाम | नाशिक |
संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर जवळ | नाशिक |
विघ्नेश्वर मंदिर ओझर | नाशिक |
त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्रंबकेश्वर | नाशिक |
जैन मंदिरे मांगी तुंगी | नाशिक |
गजपंथ | नाशिक |
सप्तशृंगी मंदिर वनी | नाशिक |
काळाराम मंदिर | नाशिक |
बल्लाळेश्वर मंदिर पाली | रायगड |
संत गजानन महाराज मंदिर शेगाव | बुलढाणा |
एकविरा देवी कारला | पुणे |
दत्त मंदिर औदुंबर | सांगली |
केदारेश्वर मंदिर | बीड |
वैजनाथ मंदिर परळी | बीड |
अष्टदशभूज रामटेक | नागपूर |
दीक्षाभूमी | नागपूर |
संत साईबाबा मंदिर शिर्डी | अहमदनगर |
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक | अहमदनगर |
शनी मंदिर शनिशिंगणापूर | अहमदनगर |
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी | अहमदनगर |
गणपतीपुळे | रत्नागिरी |
मारलेश्वर मंदिर | रत्नागिरी |
पावस | रत्नागिरी |
महाकाली देवी | चंद्रपूर |
श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर | सातारा |
चिंतामणी कळंब | यवतमाळ |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र
अंतर्गत भारतातील तीर्थक्षेत्रे |
भारतातील तीर्थक्षेत्र | राज्य |
वैष्णोदेवी मंदिर कटरा | जम्मू आणि काश्मीर |
अमरनाथ गुहा मंदिर | जम्मू आणि काश्मीर |
सुवर्ण मंदिर अमृतसर | पंजाब |
अक्षरधाम मंदिर दिल्ली | दिल्ली |
श्री दिगंबर जैनलाल मंदिर | दिल्ली |
श्री लक्ष्मी नारायण मंदिर | दिल्ली |
बद्रीनाथ मंदिर चमोली उत्तर | उत्तराखंड |
गंगोत्री मंदिर उत्तरकाशी | उत्तराखंड |
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश | उत्तराखंड |
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश | उत्तराखंड |
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश | उत्तराखंड |
यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी | उत्तराखंड |
वैद्यनाथ धाम देवघर | झारखंड |
काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी | उत्तर प्रदेश |
इस्कॉन मंदिर वृंदावन | उत्तर प्रदेश |
श्रीराम मंदिर अयोध्या | उत्तर प्रदेश |
सूर्य मंदिर कोणार्क | ओरिसा |
श्री जगन्नाथ मंदिर पुरी | ओरिसा |
लिंगराज मंदिर भुवनेश्वर | ओरिसा |
मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर | ओरिसा |
कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी | आसाम |
महाबोधी मंदिर गया | बिहार |
रणकपुर मंदिर पाली | राजस्थान |
अजमेर दर्गा | राजस्थान |
द्वारकाधीश मंदिर द्वारका | गुजरात |
राजस्थान सोमनाथ मंदिर वेरावल | गुजरात |
नागेश्वर मंदिर द्वारका | गुजरात |
सांची तूप सांची | मध्य प्रदेश |
खजुराहो मंदिर खजुराहो | मध्य प्रदेश |
महाकाली मंदिर उज्जैन | मध्य प्रदेश |
ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडोबा | मध्य प्रदेश |
श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम | कर्नाटक |
गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ | कर्नाटक |
विरुपाक्ष मंदिर हम्पी | कर्नाटक |
चेन्नई केशव मंदिर बेलूर | कर्नाटक |
अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू | कर्नाटक |
महाबळेश्वर मंदिर गोकर्ण | कर्नाटक |
भूतनाथ मंदिर बदामी | कर्नाटक |
मुर्डेश्वर मंदिर मुर्डेश्वर | कर्नाटक |
आय हॉल दुर्गा मंदिर आय होल | कर्नाटक |
श्रीकृष्ण मंदिर उडुपी | कर्नाटक |
वीर नारायण मंदिर बेलावडी | कर्नाटक |
तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला | आंध्र प्रदेश |
मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यम | आंध्र प्रदेश |
बृहदिशवर मंदिर तंजावर | तमिळनाडू |
मीनाक्षी मंदिर मदुराई | तमिळनाडू |
रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम | तमिळनाडू |
कांचीपुरम मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
रंगनाथ स्वामी मंदिर स्त्रीची | तमिळनाडू |
सारंगपाणी मंदिर कुंभकर्ण | तमिळनाडू |
अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्ना मलाई | तमिळनाडू |
मुरुगण मंदिर तिरूचेंदूर | तमिळनाडू |
किनारा मंदिर महाबलीपुरम | तमिळनाडू |
कैलास नाथ मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
एकंबलेश्वर मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम | केरळ |
गुरुवायूर मंदिर गुरुवायूर | केरळ |
वडकनाथ मंदिर त्रिशूल | केरळ |
पार्थसारथी मंदिर अरण मुला | केरळ |
शबरीमाला मंदिर पथनामथीट्टा | केरळ |
अट्टूकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम | केरळ |
श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर | केरळ |
तिरूमिल्ली मंदिर वायनाड | केरळ |
वेकोम महादेव मंदिर वर्कला | केरळ |
तिरवल्ला मंदिर तिरुमल्ला | केरळ |
शिवगिरी मंदिर वर्कल्ला | केरळ |
श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह | झारखंड |
शत्रुंजय हिल गुजरात गिरनार | गुजरात |
देवगड उत्तर प्रदेश पावापुरी | बिहार |
रणकपुर राजस्थान भीलवाडा टेम्पल | राजस्थान |
उदयगिरी | मध्य प्रदेश |
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | या योजनेसाठी अपात्रता |
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्या बाहेर वास्तव्यास असणारे नागरिक अपात्र आहेत.
- राज्यातील ज्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकार दाता आहे, अशा कुटुंबातील नागरिक या योजनेसाठी अपात्र आहेत.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तो या योजनेसाठी अपात्र आहे.
- जे नागरिक सेवानिवृत्तीनंतरचे निवृत्तीवेतन घेत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- ज्या कुटुंबातील सदस्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत असल्यास त्यांना मुख्यमंत्री तीर्थ योजनेंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- ज्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार / खासदार, विद्यमान आहेत. अशांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवासासाठी लाभार्थी व्यक्ती शारीरिक व मानसिक दृश्य सक्षम असणे गरजेचे आहे, जर त्या ज्येष्ठ नागरिकास एखाद्या व्यंग असेल किंवा आजार असेल, तर त्याला या योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आले आहे.
- ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे चार चाकी वाहन आहे अशा नागरिकांना या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
- अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास ते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अपात्र असतील.
- एखादा अर्जदार मागील वर्षांमध्ये प्रवासासाठी लॉटरीमध्ये निवडला गेला होता, परंतु त्याचा प्रवास झालेला नाही असे नागरिक देखील अर्ज करण्यासाठी अपात्र आहेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- ज्येष्ठ नागरिकाचे आधार कार्ड
- योजनेचा अर्ज
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर
- हमीपत्र
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया |
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अर्ज ऑनलाईन पद्धती करावा लागेल.
- या योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे तसेच सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येतो.
- ज्या नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार नाही, त्यांनी हा अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
मात्र या योजनेची घोषणा नुकतीच झाल्याने अजून या योजनेचे पोर्टल किंवा मोबाईल ॲप उपलब्ध नसल्यामुळे या योजनेचा अर्ज आत्ताच करता येणार नाही. तेव्हा तुम्ही योजनेचे पोर्टल किंवा मोबाईल ज्यावेळेस सरकारकडून करण्यात येईल. तेव्हा आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अपडेट करून त्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत रहा, धन्यवाद.
Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनाचा GR CLICK HERE
1 thought on “New | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र | Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | जेष्ठांना तीर्थक्षत्राची मोफत यात्रा |”