New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |

Table of Contents

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 |

pink e- rickshaw yojana maharashtra
pink riksha yojana avshyak kagadpatre
pink e- rickshaw yojana marathi
maharashtra shasan yojana

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील शासन हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत असते. आपल्या देशात सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून योजनांची अमलबजावणी केली जाते. या योजना राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या विचार करून आखलेल्या असतात, राबवलेल्या असतात.
केंद्र व राज्य शासनाकडून या योजनांना अनुदान देण्यात येते. त्यातून या सर्व सामान्य नागरिकांना जनतेला आर्थिक सहाय्य झाल्याने त्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो.
राज्यातील महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्याचे खालील, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती – जमाती, लहान बालके, बांधकाम कामगार, शेतकरी या सर्वांसाठी योजनांची सुरुवात केलेली असते.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर या सर्व सामान्य नागरिकांना आपले जीवन जगण्यासाठी हातभार लावणे हा योजनांचा महत्त्वाचा उद्देश असतो.
महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी 28 जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यामधील महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने एका योजनेची घोषणा केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे ” महाराष्ट्र पिंक ई -रिक्षा योजना “ होय.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या पिंक ई – रिक्षा या महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील दहा शहरांमधील महिलांना लाभ दिला जाणार आहे. राज्यात सुरू करण्यात आलेली गुलाबी रिक्षा ही योजना फक्त महिलांसाठी राबविण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या कुटुंबातील महिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. ज्यामुळे त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते, तसेच मुला मुलींचे पालन पोषण करून, त्यांचे शिक्षण पूर्ण करतील. या उद्देशाने शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
पिंक ई – रिक्षा योजनेचा लाभ महाराष्ट्र्र राज्यातील प्रमुख 10 शहरांमध्ये दिला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षासाठी 5 हजार पिंक रिक्षा दिले जाणार आहेत. तसेच राज्यातील गरीब व गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20 टक्के सबसिडी देण्यात येते. तर 70 टक्के कर्जही बँक उपलब्ध करून देते. अशा प्रकारे 90 टक्के अनुदान मिळते व उरलेला दहा टक्के खर्च हा स्वतःच्या महिलेला करावा लागतो.
महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या हितासाठी व सक्षमी करण्यासाठी हे पिंक इ रिक्षा या योजनेची सुरुवात केली. तसेच राज्यातील शाश्वत वाहतुकीच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल अशी हि योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वतःच्या कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून महिलांना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे महिला रिक्षा खरेदी करू शकतात.
पिंक ई -रिक्षा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना मदत करणे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल, महिला स्वावलंबी बनतील, तसेच त्यांना आपल्या दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
त्याचबरोबर पिंक रिक्षाच्या माध्यमातून महिलांना सोयीचा रोजगारही उपलब्ध होईल. तसेच सुरक्षित प्रवासासाठी ही योजना महत्वपूर्ण असणार आहे.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य व केंद्र शासनामार्फत आपला राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखांच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण योजनेची म्हणजेच महाराष्ट्र पिंक ई -रिक्षा योजनेची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
त्याचबरोबर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?  पात्रता काय ? नियम अटी कोणत्या ? या सर्वांची माहिती आज आपण आपले लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात ज्या कोणी गरीब गरजू महिला असतील. त्यांनाही या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांनाही लाभ घेता येईल व स्वावलंबी बनता येईल, ही विनंती.

योजनेचे नाव पिंक ई – रिक्षा योजना, महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
विभागमहिला व बाल कल्याण विकास विभाग
लाभार्थीराज्यातील सर्व महिला
लाभमोफत पिंक रिक्षा देणे
उद्देशमहिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे

 

हे देखील वाचा –

New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |

Good News | लखपती दीदी योजना मराठी | Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | मिळणार 5 लाख बिनव्याजी कर्ज |

New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |

Good News | तार कुंपण योजना महाराष्ट्र | Tar Kumpan Yojana Marathi 2024 | सरकार देत आहे 90 % अनुदान |

Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील महिलांना पिंक ई – रिक्षा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • महिला व मुलींचे सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
  • पिंक ई – रिक्षा योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, या उद्देशाने राज्य शासनाकडून पिंक ई -रिक्षा योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • पिंक ई- रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला व मुलींचे सशक्तीकरणास चालना देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवून आत्मनिर्भर बनवणे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या गरजा पूर्ण करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक साह्य लाभल्याने महिलांना आपल्या दैनंदिन गरजेसाठी पैशासाठी कोणाकडे हात पसरावे लागणार नाही.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेची वैशिष्ट्ये |

  • राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणारी पिंक इ रिक्षा योजना राज्यातील दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
  • पिंक ई- रिक्षा योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
  • पिंक ई-रिक्षा या योजनेअंतर्गत मिळणारी रिक्षा महिला स्वतः चालवतील.
  • पिंक ई- रिक्षा योजना अंतर्गत रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.
  • तसेच या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या दहा टक्के रक्कम स्वतः अर्जदार महिलेला भरावी लागते.
  • उर्वरित 70 टक्के रक्कम बँकेतून कर्ज, लोन म्हणून काढू शकतो.
  • पिंक ई- रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनतील.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन ठेवण्यात येणार आहे.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेचे स्वरूप |

  • राज्य शासनाकडून प्राप्त झालेले रिक्षाच्या किंमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल. त्यामध्ये जीएसटी, नोंदणी, रोड टॅक्स इत्यादी.
  • तसेच राज्यातील नागरी सहकारी संस्था, जिल्हा राष्ट्रीय प्रथम तसेच खाजगी बँका इत्यादी कडून रिक्षा किमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
  • राज्य शासनाकडून पिंक ई – रिक्षा खरेदी करण्यासाठी 20 टक्के अनुदान दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गचा दहा टक्के आर्थिक भार हा लाभार्थी महिलांवर मुलीवर असेल.
  • या योजने अंतर्गत मिळणाऱ्या  ७० टक्के खर्चाच्या परत फेडीचा कालावधी पाच वर्ष असणार आहे.
  • पिंक ई- रिक्षा योजने अंतर्गत मिळणारी रिक्षा स्वत अर्जदार महिलेला चालवायची आहे.

 

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेचे फायदे |

  • पिंक ई- रिक्षा योजनेच्या माध्यमातून रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत 90 टक्के आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्याने महिलांवर आर्थिक ताण येणार नाही.
  • पिंक ई- रिक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ७० टक्के बँक कर्ज परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना त्रास होणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी पिंक ई- रिक्षा ही स्वतः महिला चालवणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील प्रमुख 10 शहरांमध्ये पिंक ई- रिक्षा योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यात शाश्वत वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
  • पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना रोजगाराची साधन उपलब्ध होईल.
  • पिंक ई- रिक्षा योजनेमुळे राज्यातील महिला स्वावलंबी व सक्षम बनतील.
  • या योजनेमुळे राज्यातील नागरिकांचा, समाजाचा महिला कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.
  • पिंक ई- रिक्षा योजनेमुळे राज्यातील मुली स्वताच्या पायावर उभ्या राहतील.
  • या योजनेमुळे महिला अत्म्संन्मानाने जगतील.
  • पिंक ई- रिक्षा योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व सशक्त बनतील.
  • आपल्या दैनंदिन गरजांसाठी या योजनेमुळे महिलांना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या गरजांबरोबर कुटुंबाचा व मुलांचा पालन पोषण करण्यासाठी समर्थ होतील.
  • पिंक ई-रिक्षा योजनेमुळे शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये सुरक्षितता निर्माण होईल.
  • पिंक ई- रिक्षा योजनेमुळे राज्यातील महिलांसाठी रोजगाराचे एक नवीन क्षेत्र निर्माण होईल.
  • राज्यातील पिंक ई- रिक्षा योजनेमध्ये बेरोजगार महिलांच्या हाताला रोजगार मिळेल.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेसाठी पात्रता |

  1. महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांना पिंक इ रिक्षा योजना अंतर्गत लाभ दिला जाईल.
  2. पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ राज्यातील फक्त महिलांनाच दिला जाईल, पुरुषांना नाही.
  3. पिंक ई- रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे.
  4. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वय वर्षाच्या दरम्यान असावे.
  5. लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास या योजनेचे लाभ दिला जात नाही.
  6. पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेकडे वाहनचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
  7. राज्यातील विधवा, घटस्फोटीत, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, बालसुधारकारागृह तून आलेले मुली या सर्वांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  8. राज्यातील प्रमुख 10 शहरांमध्ये वास्तवास असणार्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजना सुरु करण्यात आलेली शहरे |

  1. मुंबई शहर
  2. मुंबई उपनगर
  3. नवी मुंबई
  4. नागपूर
  5. पुणे
  6. पनवेल
  7. पिंपरी चिंचवड
  8. छत्रपती संभाजी नगर
  9. नाशिक
  10. ठाणे

 

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • योजनेचा ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्याचे मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • वाहन चालक परवाना
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • लाभार्थी महिला रिक्षा चालवणार असल्याचे हमीपत्र
  • या योजनेअंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करण्याची हमीपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर

 

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

मित्रानो, महाराष्ट्र राज्याचा पावसाळी अधिवेशनाचा, महायुती सरकारचा अंतरिम अर्थ संकल्प नुकताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सदर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यामंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना तसेच पिंक ई – रिक्षा योजना अशा अनेक योजनांची घोषणा केली.

त्यातील पिंक ई- रिक्षा योजनेसाठी अर्ज प्रोसेस करण्यासाठी अद्यप तरी कोणतेही ओंलैन पोर्टल चालू झालेले नाही. त्यामुळे तात्पुर ते आपण थांबावे लागेल. ज्यावेळेस ऑनलाइन पोर्टल सुरू होईल, त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट सहित आपल्याला ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे आणि त्यासाठीची अपडेट आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून देत राहू, त्यासाठी तुम्ही हि या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र |

पिंक ई- रिक्षा योजना शासन निर्णय click here 

1 thought on “New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |”

Leave a Comment