Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | विध्यार्थी अपघात विमा योजना महाराष्ट्र |
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात हे आपण पाहिलेच आहे. राज्यातील गरीब कष्टकरी, शेतकरी वर्ग आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात. त्यावेळेस ते इतरांकडून कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यातूनच त्यांची परिस्थिती आणखीनच खालावली जाते.
अशा परिस्थितीत या कुटुंबांमध्ये मुलांचे पालन पोषण करण्याचे क्षमता सुद्धा राहत नाही. तसेच त्यांच्या शिक्षणाचा भारी ते उचलू शकत नाही. त्यासाठी राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी वेळोवेळी करण्यात येत असते. या योजना राबवण्यामागे प्रत्येक विद्यार्थी हा पुढे जाऊन देशाचा सक्षम नागरिक निर्माण व्हावा, या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो.
या योजना ह्या लहान नवजत बाळापासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत कार्यान्वित आहेत. लहान बाळांसाठी पौष्टिक आहाराची योजना ते उच्च शिक्षण घेणाऱ्यांची स्कॉलरशिप योजना अशा स्वरूपाची योजना राबविल्या जात असतात.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनामार्फत विध्यार्थ्याच्या भविष्यातही एक योजना राबविली जात आहे.
ती योजना म्हणजे ” राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना “ ही शासनामार्फत सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील गरीब व शेतकरी कुटुंबातील पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास आर्थिक साह्य करण्याचे उद्देशाने सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील कुटुंबातील राज्यातील गरीब कुटुंबातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राजीव गांधी अपघात विमा योजानेची सुरुवात 26 ऑक्टोबर 2012 पासून करण्यात आली. राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे शालेय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या स्थितीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.तसेच या शालेय विध्यार्थ्यांना सुरक्षा कवच प्रधान व्हावे, म्हणून या योजेची सुरुवात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
राज्यात हि योजना पूर्वी विमा कंपनी मार्फत विध्यार्थी सुरक्षा योजना म्हणून राबविण्यात येत होती. या विमा हप्त्याची रक्कम शासनाकडून दिली जात होती. पण कंपनीचा या बाबतचा हलगर्जी पणा लक्षात घेवून हि योजना विमा कंपन्या मार्फत बंद करून, तीच योजना सानुग्रह अनुदान योजना या नावाने राबविण्यास सुरुवात केली.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | वाचकांना विनंती |
मित्रानो, राज्य शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती आपण घेतच असतो. त्याचप्रमाणे आज हि आपण शासनाच्या एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. ती म्हणजे राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना होय. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे.त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या घरात किंवा परिसरात जर कोणी अपघात ग्रस्त विध्यार्थी असेल तर तुम्ही त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. त्यामुळे त्यांना हि या योजनेचा लाभ घेता येईल. हि विनंती.
योजनेचे नाव | राजीव गांधी अपघात विमा योजना |
योजनेचा विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
योजनेचे लाभार्थी | इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतचे विध्यार्थी |
लाभ | विध्यार्थ्याला आर्थिक सहाय्य |
योजनेचा उद्देश | विध्यार्थ्याला विमा संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे पण वाचा –
Khavati Anudan Yojana Maharashtra | New | खावटी अनुदान योजना 2024 | नव्या स्वरुपात |
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | Good News | मोफत शिलाई मशीनसाठी नाव नोंदणी सुरु | लगेच करा अर्ज |
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | अपघात विमा योजनेचा उद्दिष्टे
- राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याला आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना आर्थिक सहाय्य करणे हाय योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेमार्फत या शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सुरक्षित करण्याच्या विचाराने सुरुवात विचार सुरुवात करण्यात आली.
- मुलांचा अपघात झाल्यास पालकांचे होणारे आर्थिक नुकसान व त्यामुळे कोलमडणारे त्यांचे कुटुंब व्यवस्थापन सुस्थितीत ठेवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या वाढत्या महागाईच्या काळामध्ये मुलांमध्ये होणाऱ्या वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्याचा विचार केला.
- मुलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुलांचे भविष्य उज्जवल बनविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | विध्यार्थी अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये |
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना महाराष्ट्र राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली विमा योजना आहे.
- या योजनेमार्फत इयत्ता पहिली ते बारावीचे शालेय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने लागू करण्यात आली आहे.
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या मुला व मुलींचा दोन्ही यांचाही समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माची आट ठेवण्यात आलेली नाही.
- या योजनेअंतर्गत भरण्यात येणारे विम्याचे हप्ते राज्य सरकार देणार असल्यामुळे पालकांना विम्याची रक्कम भरण्याची गरज पडणार नाही.
- या योजना अंतर्गत आर्थिक साह्य लाभल्यामुळे पालकावर आर्थिक ताण पडणार नाही.
- तसेच अपघातादरम्यान कोणाकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही व कर्ज हि काढण्याची गरज पडणार नाही.
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजने ची रक्कम अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येते.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | या योजने अंतर्गत समाविष्ट नसलेली अपघाताची करणे |
- एखाद्या शालेय विद्यार्थ्यांचा नैसर्गिक त्या मृत्यू झाल्यास
- जाणीवपूर्वक स्वतःला इजा करून घेतल्यास
- आत्महत्येचा प्रयत्न केल्यास
- मोटर शर्यतीत भाग घेतल्यानंतर झालेल्या इजा
- गुन्हा करण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेले दुखापत किंवा अपघात
- अमली पदार्थाच्या [ ड्रग्सच्या ] प्रभावाखाली असताना झालेला अपघात
- रोडवरती स्टंटबाजी करताना झालेला अपघात
- कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये स्टंटबाजी करताना झालेले दुखापती
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | विध्यार्थी अपघात विमा योजनेची पात्रता |
- विद्यार्थ्या महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- तो विद्यार्थी इयत्ता पहिली ते बारावी या वर्गामध्ये शिक्षण घेणार असावा.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान |
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत विध्यार्थ्याचा अपघात झाल्यास, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास तसेच एखादी शस्त्रक्रिया करावी लागल्यास मिळणारे अनुदान पुढीलप्रमाणे :
- विध्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अनुदानाची रक्कम – 1.50 लाख रुपये
- अपघात मुले कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजे ( 2 अवयव किंवा 1 अवयव व 2 डोळे किंवा 1 डोळा निकामी ) मिळणारी अनुदानाची रक्कम – 1 लाख रुपये
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजे ( 1 अवयव किंवा 1 डोळा निकामी झाल्यास ) मिळणारी अनुदानाची रक्कम – 75000 /-रुपये
- विध्यार्थ्यास अपघात मुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास मिळणारी अनुदानाची रक्कम – दवाखान्याचा खर्च किंवा 1 लाख रुपये
- विध्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास मिळणारी अनुदानाची रक्कम – 1.50 लाख रुपये
- विध्यार्थी अन्य कारणाने म्हणजेच क्रीडाप्रकारामुळे, एखादी जड वस्तू उचलताना, आगीमुळे व विजेचा धक्का लागून अपघात झाल्यास मिळणारी अनुदान रक्कम – 1.50 लाख रुपये
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | अर्जा ( प्रस्तवा ) सोबत सदर करावयाची कागदपत्रे |
- प्रथम खबरदारी अहवाल
- स्थळ पंचनामा
- इन्व्हेस्ट पंचनामा
- मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत मृत्यू दाखला (सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
- शास्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | या योजनेचे लाभार्थी व लाभार्थी अनुक्रमे |
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व मुले व मुली या योजनेसाठी योजनेतील लाभासाठी पात्र आहेत किंवा लाभ घेवू शकतात.
- या योजनेचा लाभ शालेय शिक्षण घेणारे इयत्ता 1 ली व 12 वी पर्यंतचे सर्व विध्यार्थी घेवू शकतात.
विध्यार्थ्याचे निधन झाल्यास प्राधान्य अनुक्रमे :
- अपघातामुळे विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास अनुदानाची रक्कम घेण्यास प्रथम प्राधान्य विद्यार्थ्यांच्या आईला असेल.
- जर त्या विद्यार्थ्याच्या आई हयात नसेल तर त्याच्या वडिलांकडे अनुदानाची रक्कम दिली जाईल.
- जर त्या अपघात ग्रस्त विद्यार्थ्यांचे आई-वडील दोघेही हयात नसतील तर त्याचा 18 वर्षावरील मोठा भाऊ किंवा अविवाहित बहीण अनुदानाची रक्कम घेऊ शकतात.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | अपघात विमा योजनेचे फायदे |
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.
- या योजनेमुळे दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेण्यासाठी पुढे येतील.
- या योजनेतील आर्थिक साह्यामुळे पालकांवर येणारा आर्थिक ताण तणाव कमी होणार आहेत.
- राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेमुळे एखाद्या कारणाने विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याला मोफत उपचार मिळेल.
- या योजनेमुळे पालकांना मुलांचा अपघात झाल्याच्या दरम्यान कोणाकडे पैशासाठी अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा उपचारावे अभावी मृत्यू होणार नाही.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | विध्यार्थी अपघात विमा योजनेची आटी व नियम |
- राजीव गांधी सानुगृह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही.
- या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शालेय शिक्षण घेणारा असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर विद्यार्थ्याचे आईचे वडील यापैकी एक जरी पालक सरकारी नोकरी करीत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- एखाद्या विद्यार्थ्याने जर अर्धवट शिक्षण सोडलेले असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जन्माचा दाखला
- रहिवासी दाखला
- शाळेचा दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
- बँक तपशील
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | अर्ज रद्द होण्याची करणे |
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- विद्यार्थी हा 12 वीच्या पुढील उच्च शिक्षण घेत असल्यास अर्ज रद्द लेला जातो.
- अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द होतो.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | विमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपल्याला जिल्हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जावून विद्यार्थी अपघात विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यप्रकारे भरावी.
- त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
- नंतर अर्जाची पोचपावती घ्यावी.
Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra |
राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णय Download Here
राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना अर्ज Download Here
1 thought on “NEW | Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | राजीव गांधी विध्यार्थी अपघात विमा योजना 2024 |”