केंद्र शासनाच्या नवीन योजना |
Govt new scheme 2024
Launched new scheme government
Pm new scheme launched
All pm new scheme
Pm scheme for government
नमस्कार, Govt new scheme 2024 शासनामार्फत नेहमीच विविध योजना सुरू केल्या जात असतात. त्यातच 2024 मध्ये मोदी सरकार ही तिसऱ्या वेळेस सत्तेवर आले आणि त्यांनी आपला घोषणानुसार अनेक नवीन योजनांना सुरुवात केलेल्या आहेत. त्यामध्ये महिला, युवक, शेतकरी यांच्यासाठी या विविध योजनांचा अवलंब केलेला आहे.
यामध्ये विमा सखी योजना, वन नेशन वन सबस्क्रिप्शन यासारख्या योजनांचा समावेश आहे. मोदी सरकारने महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबवण्यावर भर दिला आहे. तर 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या विविध योजना आपण थोडक्यात पाहूयात, त्यासाठी आलेख शेवटपर्यंत वाचा.
विमा सखी योजना |
एलआयसी ने विमा सखी योजना सुरू केलेलीआहे. योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत दोन लाख महिला विमा एजंट म्हणून काम करतील. 18 ते 70 वर्षे वय असलेल्या दहावी पास महिलांना विमा सखी बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे.
लाडक्या बहींनीसाठी आनंदाची बातमी | डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार 2 दिवसात जमा |
देशातील महिलांना वित्तीय साक्षरता आणि विभाजक वृत्ती वाढवण्यासाठी तीन वर्षासाठी खास प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य मिळणार आहे, ते म्हणजे पहिल्या वर्षी 7 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये या प्रमाणात. त्याशिवाय त्यांना कमिशनचा सवलत मिळणार आहे, त्यासोबत एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. Govt new scheme 2024
अधिक माहितीसाठी https://licindia.in/test2 वर अर्ज करू शकता.
वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना |
मोदी सरकारने देशातील युवकांसाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश देशभरातील शैक्षणिक आणि संशोधन लेखन, तसेच पत्रिका सहज उपलब्ध करणे आहे. या योजनेसाठी 2025, 2026 आणि 2027 हे तीन वर्षासाठी सुमारे 6000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
या योजनेमुळे भारतातील विद्यार्थ्यांना आणि शाळांना, उच्च शिक्षण संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात अधिक उत्तम साधने उपलब्ध करून देता येतील. या योजनेचा फायदा देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना मिळेल आणि त्यांना सूचना आणि पुस्तकालय याने नेटवर्कद्वारे एका राष्ट्रीय सबस्क्रिप्शन उपलब्ध होईल.
आता घरबसल्या पॅन कार्ड 2.0 साठी करू शकता ऑनलाइन अर्ज | जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया |
पैन 2.0 योजना |
सरकारने 635 कोटी रुपयांचे पेन 2.0 योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश त्यांना सरकारी डिजिटल सिस्टीम मध्ये सामान्य ओळख म्हणून वापरणे आहे, त्यामुळे आयकर दाता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
अधिक माहितीसाठी पैन 2.0 योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाwww. Online services.nsdl.com वर क्लिक करून अर्ज करू शकता.
पीएम विद्या लक्ष्मी योजना |
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम येथे लक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येऊ नये हा आहे. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी लागणारे सर्व खर्च पूर्ण करण्यासाठी, बँक आणि वित्तीय संस्थाकडून कोणत्याही जामिनाशिवाय कर्ज घेऊ शकेल.
राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संस्थांना, केंद्र सरकार चालवलेल्या संस्थांना देखील समाविष्ट केले गेले आहे.
पीएम इंटर शिप योजना |
पीएम इंटरशिप योजनेअंतर्गत 21 ते 24 वयोगटातील तरुणांना अर्ज करता येणार आहे. ही योजना कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर सुरू केली आहे. या योजनेत निवड झालेल्या तरुणांना बारा महिन्यासाठी पाच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य आणि एका वेळेस सहा हजार रुपये अनुदान मिळेल.
या योजनेसाठी एका वर्षात 1.25 लाख नोकरीच्या संधी दिल्या जातील आणि त्यावर 800 कोटी रुपये खर्च होईल. अधिक माहितीसाठी पी एम इंटरशिप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून अर्ज करू शकता. Govt new scheme 2024
लाडक्या बहिणींना धनलाभ देणारी आणखीन एक संधी | पी एम विमा सखी योजना | मिळणार प्रती महा 7000 रु. | असा करा अर्ज |
कौशल्य ऋण योजना |
सरकारने कौशल्य ऋण योजना सुधारित केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार 7.5 लाख रुपये पर्यंत कर्ज देणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. पूर्वी योजनेत कर्जाची मर्यादा तीन लाख रुपये पर्यंत होती, ती आत्ता साडेसात लाख रुपये पर्यंत वाढवली गेली आहे.
या योजनेत पूर्वी फक्त प्रमुख बँकांचा समावेश केला गेला होता. परंतु आता क्षेत्रीय ग्रामीण बँक, एनबीएफसी सुद्धा योजनेत सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी कौशल अरुण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पी एम सोलारघर योजना |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सोलार घर योजना सुरू केली. या योजनेत घरामध्ये सौर पॅनल बसवण्यासाठी कुटुंबना आर्थिक मदत दिली जाईल. सौर पॅनलच्या किमतीवर 40% पर्यंत सबसिडी दिली जाईल. अधिक माहितीसाठी पीएम सोलापूर योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून अर्ज करा.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |
केंद्रीय मंडळांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनांच्या विस्तार करण्यात मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत ७० वर्षां व त्यापेक्षा वयस्कर सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवता येईल. त्यामुळे संपूर्ण सहा कोटी जेष्ठ नागरिकांसह 4.5 कोटी कुटुंबाला प्रत्येक कुटुंब पाच लाख रुपये पर्यंत मोफत आरोग्य विमा मिळेल.
माहितीसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून अर्ज करू शकता.