पी एम विमा सखी योजना |
PM vima sakhi Yojana
LIC vima sakhi Yojana
Pm vima sakhi scheme
Pm scheme for ladies
Vima scheme for government
नमस्कार, PM vima sakhi Yojana LIC अंतर्गत देशातील महिलांसाठी विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक धनलाभ होणार आहे. त्या अंतर्गत 7000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 9 डिसेंबरला या योजनेच्या शुभारंभ केला. या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना. भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून 1 वर्षाच्या आत 1 लाख विमा सखींना पॅनल मध्ये समाविष्ट करणे, या योजनेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील महिलांना विमा योजना राबवून त्यांना स्वतःला उभ राहण्यासाठी आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी, ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील एलआयसी विमा सखी योजनेमुळे फक्त ग्रामीण भागातच नाही, तर दुर्गम भागातील महिलांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
सामाजिक कल्याणाची, जोडी व्यवसायाशी घालून एलआयसीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी मिळणारे 51 हजार रुपये|
विमा सखी योजनेची वैशिष्ट्ये |
- विमा सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशन व्यतिरिक्त सुरुवातीच्या तीन वर्षासाठी निश्चित स्टायपेंड दिला जाणार आहे.
- महिलांचे अंदाजे मानसिक उत्पन्न 7000 हजार रुपयांपासून सुरू होईल.
- पहिल्या वर्षात प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये मिळतील.
- दुसऱ्या वर्षी मासिक पगार 6000 हजार रुपये होईल.
- तिसऱ्या वर्षी रक्कम 5000 हजार रुपयांपर्यंत येईल.
- ज्या महिला विक्रीचा टार्गेट पूर्ण करतील किंवा त्यापेक्षा जास्त करतील, त्यांना अतिरिक्त कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
- या योजनेत काम करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र असून एलआयसी कडून एजन्ट प्रशिक्षण हे दिल जाणार आहे, नाव नोंदणी करून महिलांना पहिल्या तीन वर्षासाठी विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक साक्षरता सहाय्य मिळणार आहे.
- पदवीधर झालेल्या विमा सखीना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल, तसेच कंपनीत विकास अधिकारी पदासाठी त्यांचे निवडणूक होऊ शकते. PM vima sakhi Yojana
आता घरबसल्या पॅन कार्ड 2.0 साठी करू शकता ऑनलाइन अर्ज | जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया |
विमा सखी योजनेसाठी पात्रता |
- विमा सखी योजनेसाठी 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरते.
- यासाठी किमान पात्रता 10 वी उत्तीर्ण असून, ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- सध्या काम करत असलेले एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेअंतर्गत अपात्र केला जाईल.
PM Vima Sakhi Yojana | असा करा ऑनलाईन अर्ज |
- LIC च्या अधिकृत वेबसाईट किंवा https://licindia.in/test2 येथे क्लिक करून या योजनेसाठी अर्ज भरता येईल.
- लिंक ओपन झाल्यावर सर्वात शेवटी क्लिक for vima sakhi yojana वर क्लिक करा.
- या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता या डिटेल्स भरा.
- तुम्ही जर एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनार यांच्याशी संबंधित असाल, तर त्यांची देखील माहिती द्या.
- शेवटी कॅपच्या कोड भरून सबमिट बटणावर क्लिक करा.