E – Pik Pahani Last Date 2024 | ई – पिक पाहणीची हि आहे, शेवटची तारीख | लवकरात लवकर मोबाईल वरून करून घ्या, ई – पिक पाहणी |

           E – Pik Pahani Last Date 2024 | ई – पिक पाहणी |

 E - Pik pahani last date
Pik pahani Maharashtra
Online E - pik pahani Marathi
E pik Pahani Nondani Maharashtra
E pik Pahani last date 2024

E – Pik pahani last date
Pik pahani Maharashtra
Online E – pik pahani Marathi
E pik Pahani Nondani Maharashtra
E pik Pahani last date 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेती संबंधित तसेच पिक विम्याचा लाभ मिळवायचा असेल, तर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. ई – पीक पाहणी करण्यासाठी शासनाकडून एक नवीन पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे.

त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई – पिक पाहणी करून घ्या आणि आपल्या शेतीचा पिक पेरा लावून घ्या. सरकारकडून यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेले आहे. E – Pik pahani last date

ई – पीक पाहणी ही ऑनलाईन पद्धतीने, शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ई – पिक पाहणी ॲप मधून आपल्या सातबारावर करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी तरी शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी न करण्याची चूक करू नये.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या माध्यमातून सातबारावर नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कापूस – सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणातले अनुदान वितरित करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना पात्र असून देखील अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे ई – पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ज्या शेतकऱ्याने अजूनही आपली ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी अंतिम तारखेच्या आत आपली ई -पिक पाहणी पूर्ण करून घ्यावी, यासाठी शासनाकडून मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

E – Pik Pahani | ई – पिक पाहणीची गरज काय ?

शेतकरी बांधवांना शेती करता अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या समस्या मधून मार्ग काढण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी  शासनाकडून देखील बऱ्याच उपाय योजना केल्या जातात.

याच प्रकारे राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना आपल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी तसेच पिक विमा हवा असल्यास त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची ई – पीक पाहणी करून घेणे अतिशय बंधनकारक आहे. E – Pik pahani last date

ई – पिक पाहणीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे, तसेच पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई मिळवणे शक्य होणार आहे.

पिक पाहणीची विशेषता म्हणजे, ई – पिक पाहणी मध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सहज लावता येणार आहे.

ई – पीक पाहणी मुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा किती पेरा झाला आहे, त्याचे अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

ई – पिक पाहणी कशी करावी ?

मित्रांनो, तुम्हाला ई – पीक पाहणी करण्यासाठी तलाठ्याकडे किंवा इतर कुठेही जाण्याची गरज नाही. कारण आपल्याजवळ असणाऱ्या अँड्रॉइड मोबाईल वरूनच 50 पीक पेरा नोंदणी करता येणार आहे. E – Pik pahani last date
खरीप हंगाम 2024 साठी पिक पाहणी नोंदणीसाठी पिक पाहण्याचे अपडेट व्हर्जन ॲप google प्ले स्टोअर वर उपलब्ध करण्यात आले आहे. तिथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता व स्टेप बाय स्टेप माहिती भरून आपली ई – पिक पाहणीची नोंदणी पूर्ण करू शकता.

E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |

E – Pik Pahani Last Date |

शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून शासनाने खरीप हंगामातील पीक पाहणी नोंदणी सुरू केली होती. पाहणी करण्याचे अंतिम मुदती 31 ऑगस्ट 2024 देण्यात आलेली होती.
परंतु काही दिवसापासून सर्वर डाऊन असल्याने बऱ्याच शेतकरी ई – पिक पाहणी पासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे शासनाकडून पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवून देण्यात आलेले आहे.

तसेच संपूर्ण वर्षातील पिकांची नोंद करायचे असल्यास, शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षांमध्ये कधीही नोंद करता येणार आहे. परंतु खरीप हंगामातील 2024 मधील ई – पिक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत असणार आहे. E – Pik pahani last date

 

Nuksan Bharpai 2024 | 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार | शासनाकडून निधी मंजूर | पात्र शेतकऱ्यांची यादी आली |

1 thought on “E – Pik Pahani Last Date 2024 | ई – पिक पाहणीची हि आहे, शेवटची तारीख | लवकरात लवकर मोबाईल वरून करून घ्या, ई – पिक पाहणी |”

Leave a Comment