Lakhpati Didi Scheme | लखपती दीदी योजना |
lakhpati didi scheme
pm modi s lakhpati didi scheme
lakhpati didi yojana
online apply for lakhpati didi yojana
lakhpati didi yojana maharashtra
नमस्कार, राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून लाडकी बहिण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना 1500 हजार रुपये दिले जात आहेत. हि योजना राज्यात राज्य शासनाच्या वतीने चालवली जात आहे.
त्याच प्रमाणे केंद्र शासनाने अशीच एक योजना सर्व प्रधान मध्य प्रदेश मध्ये राबविली होती. सध्या एकूण 7 राज्यात महिलांना आर्थिक सहाय्य करणारी हि योजना राबविली जात आहे. lakhpati didi scheme
एकीकडे लाडकी बहीण योजनेला rajyat लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
काय आहे ? लखपती दीदी योजना, कोणाला लाभ मिळणार ? त्यासाठी आवश्यक पात्रता कोणती, आट कोणती असणार ? योजनेचे स्वरूप काय ? या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लखपती दीदी योजनेचा उद्देश |
केंद्र शासनामार्फत देशात अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरनावर भर दिला जात आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक दृष्ट्या प्रगती व्हावी. यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून लखपती दीदी योजना राबविली जात आहे.
गेल्या वर्षी केंद्र शासनामार्फत या योजनेची सुरुवात केली. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. lakhpati didi scheme
शेतकऱ्यांसाठी केंद्राची ‘ कृषी सप्तसूत्री ‘ | 7 Major schemes for Agriculture | Good News | या मोठ्या योजनांचा होणार समावेश |
Lakhpati Didi Scheme | मिळणार 5 लाख रुपये |
देशातील बचत गटाशी सबंधित असणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली. या योजनेतून स्वंय रोजगार सुरु करून महिलांनी स्वताच्या आर्थिक उत्पनात वाढ करावी, हा या योजनेचा उद्देश आहे. lakhpati didi scheme
या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाते. तसेच लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वताचा लघु उद्योग सुरु करता यावा, यासाठी बिनव्याजी एक लाख रुपया पासून ते पाच लाख रुपया पर्यंत कर्ज दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील 3 कोटी महिलांना जोडण्याचे निश्चित केले आहे.
Lakhpati Didi Scheme | पात्रतेच्या आटी |
- लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आटी आहेत, त्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ती महिला त्या राज्याची मूळ रहिवाशी असावी.
- ती महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत नसावेत.
- महिलेचे आर्थिक वार्षिक उत्पन हे 3 लाख रुपयांच्या आत असावे.
- तसेच अर्जदार महिला हि बचत गटातील सदस्य असावी. lakhpati didi scheme
नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज कसा करावा ? Apply For Indian Passport 2024 | खर्च किती ? आवश्यक कागदपत्रे | संपूर्ण माहिती |
लखपती दीदी योजना | अर्ज कसा करावा ?
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची व नियमांची पूर्तता होत असेल, तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
2 thoughts on “Lakhpati Didi Scheme | महिलांनो, मिळणार बिन व्याजी 5 लाख रुपये | काय आहे ? लखपती दीदी योजना | संपूर्ण माहिती |”