TET Exam Time Table 2024 | टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले | शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा | जाणून घ्या सविस्तर |

        TET Exam Time Table 2024 | टीईटी परीक्षेचे वेळापत्रक |

 

Maha tet 2024 text exam 2024 maharashtra tet tet exam date

नमस्कार मित्रांनो, राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील अन्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातील परिपत्रके जाहीर करण्यात आलेले आहेत.

या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे. परीक्षा परिषदेकडून ते जाहीर करण्यात आलेल्या आहे. वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही दुपारच्या सत्रात निर्देशित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषदेने दिलेली आहे.

यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी या परीक्षेच्या जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आलेले आहे.

पिक विमा मंजूर झाला की नाही ? असे तपासा ऑनलाईन स्टेटस | Pik Vima 2023 – 24 Status Check Online |

परीक्षेचे वेळापत्रक |

TET या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर एवढा कालावधी मिळणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडे 10.30 ते 1 दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात 2 ते 4.30 दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.

TET Exam अधिकृत वेबसाईट

शेतीमालाची हमीभावाने विक्री करायची आहे ? Apply E – Samrudhi Portal 2024 | तर ई – समृद्धीवर नोंदणी करणे गरजेचे आहे |

TET Exam Time Table 2024 | परीक्षेबद्दल परिषदेकडून देण्यात आलेला सूचना |

  • परीक्षाविषयक सर्व जसे आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयी सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट व उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक्तापासूनच अर्ज करावा.
  • अर्ज भरताना अर्जदाराने दहावी व बारावी शैक्षणिक प्रमाणपत्र, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात. इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावे.
  • स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेले स्वाक्षरी, स्वंय घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाइन आवेदन पत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावे.
  • या जाहिरातीप्रमाणे उमेदवारांना केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल, ऑफलाइन अर्ज केली स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • परीक्षेची शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
  •  अंतिम दिनांक पर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन येत्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • ऑनलाइन आवेदन पत्र सोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रति जोडण्याची आवश्यकता नाही.
  • एका पेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम आलेल्या आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल.
  • सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळ प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे.

 

Maha tet 2024 text exam 2024 maharashtra tet tet exam date

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे नोंदणी व अर्ज भरण्यासाठी च्या टप्पे |

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्गत पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन साठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची परीक्षा नोंदणी व अर्ज भरण्याच टप्पे पुढीलप्रमाणे :

  • ऑनलाइन नोंदणी
  • पोर्टल लोगिन
  • आवेदन पत्र भरणे
  • अर्जातील माहितीची पडताळणी करणे
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क करणे
  • आवेदन पत्राचे प्रिंट काढून घेणे

Leave a Comment