स्वाधार शिष्यवृत्ती योजना |
Swadhar Yojana 2024
Swadhar scholarship scheme
Education scheme for Maharashtra government
Swadhar scheme Maharashtra
Swadhar scholarship Yojana Maharashtra
नमस्कार, Swadhar Yojana 2024 राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा त्यांनी अर्धवट शिक्षण सोडू नये, यासाठी शासनाकडून अनेक योजना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या आहेत, राज्य शासनाने सुद्धा गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना अवलंबल्या आहेत.
त्यामुळे राज्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होऊन आर्थिक दृष्ट्या अशा महत्त्वपूर्ण योजनांमुळे मदत होत असते.Swadhar Yojana 2024
राज्यातील मागासावर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली अशीच एक महत्वपूर्ण योजना आहे. त्या योजनेचे नावे स्वाधार योजना होय. सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवते.
राज्यातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च या योजनेच्या माध्यमातून सरकार करत असते. अशा विद्यार्थ्यांच्या राहण्याचा जीवनाचा शालेय साहित्याचा तसेच इतर जीवनातील आवश्यक वस्तूंसाठी लागणारा खर्च स्वाधार योजनेच्या माध्यमातून शासन उचलत असते, हे आर्थिक सहाय्य dbt मार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
स्वाधार योजनेची उद्दिष्टे |
- राज्यातील वंचित व मागासवर्गीय घटकातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- शासकीय वस्तीगृहात जागेवर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे.
स्वाधार योजना अंतर्गत मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती चा तपशील |
लाभार्थी विद्यार्थ्यांना बाहेर राहणे, शालेय खर्च तसेच इतर गरजांसाठी शासनाकडून 51 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते, ती पुढील प्रमाणे :
- बोर्डिंग सुविधा – 28 हजार रुपये
- लॉजिंग सुविधा – 15000 रुपये
- मेडिकल आणि इंजीनियरिंग अभ्यासक्रमासाठी – 5 हजार रुपये ( अतिरिक्त )
- विविध खर्च – 8 हजार रुपये
- इतर शाखांकरिता – 2 हजार रुपये ( अतिरिक्त )
- एकूण रक्कम 51 हजार रुपये
घरबसल्या 1 मिनिटात डाऊनलोड करा जन्माचा दाखला |
Swadhar Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- महसुलाधिकारीच्या उत्पन्न दाखला
- राहत असलेल्या रूमचा फोटो
- महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- शेवटी शिकलेल्या वर्गासाठी टी सी
- स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र
- मेस / भोजनालय / खानावळ यांचे बिल / पावती
- मागील वर्षीचे परीक्षेचा निकाल प्रत
- शपथपत्र
- भाडे करारनामा Swadhar Yojana 2024
अर्ज नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे |
- मागील वर्षाचा स्वाधार योजनेचा अर्ज
- शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मधील प्रवेश संबंधी माहिती
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
राज्यातील गोशाळांना मिळणार प्रतिदिन 50 रुपये अनुदान | तसेच गाईंना मिळणारा ‘ राजमाता ‘ चा दर्जा |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक |
- विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज पूर्ण करावा.
- ऑनलाइन अर्ज ची प्रिंट, आवश्यक कागदपत्रे आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावी.
अर्ज करण्याची पद्धत |
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024 – 25 मधील नवीन अर्जाचे https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
- नूतनीकरण अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी एक सेटिंग या टॅब वर क्लिक करून स्वाध्याय सर्विस हा पर्याय निवडा व इयत्ता अकरावी प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज वर क्लिक करून स्वाधार पर्यावरण निवडून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नवीन आधार कार्ड सेंटर सुरू करायचे आहे ? काय आहे आवश्यक पात्रता ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
असा मिळेल लाभ |
- स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
- स्वाधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना उपरोक्त समाजातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. Swadhar Yojana 2024
- या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51 हजार रुपये दिले जातात.