शेतीमाल तारण कर्ज योजना |
Shetimal Taran karj Yojana 2024
Taran karj Yojana Maharashtra shasan
Krushi karj Yojana
Krushi loan scheme
Farmer loan scheme for government
नमस्कार, Shetimal Taran karj Yojana 2024 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विषयक योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखाच्या माध्यमातून दररोज घेतच असतो. त्याचप्रमाणे आज आपण राज्य व केंद्रीय शासनाच्या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती पाहणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांचे हंगामाच्या काळात मोठ्या प्रमाणावर पीक येते. त्यामुळे साहजिकच शेतमालाचे बाजारभाव कोसळतात व सदर शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात नफा मिळत नाही. परंतु जर तोच माल शेतकर्यांनी साठवणूक करून ठेवला व काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणला, तर त्या मालाला नक्कीच चांगला भाव मिळतो व त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळवून, त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. याचा अनुषंगाने विचार करून कृषी पणान महामंडळाने 1990 – 91 पासून राज्यात तारण कर्ज योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आला असून, हा शेतमाल शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाचे एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने म्हणजे 180 दिवस कालावधीसाठी 6 % व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते.
तसेच या योजनेअंतर्गत राज्याने केंद्रीय वखार महामंडळ कडून गोदाम पावतीवर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्याचबरोबर बाजार समिती मार्फत राबवली जात असून ही योजना सहा महिन्याच्या तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या समित्यांना 3 % व्याज सवलत देण्यात येते.
अन्नप्रक्रिया उद्योगातून केले जाणार रोजगार निर्मिती, मिळणार 75 % अनुदान | वाचा सविस्तर माहिती |
तारण कर्ज योजनेची प्रक्रिया |
- शेतकरी प्रथम आपला माल ए पी एम सी च्या गोदामात सुरक्षित ठेवतो.
- शेतकऱ्याला बाजार जगातील मूल्याच्या 75 टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते.
- येथील कर्जाचा व्याजदर हा 6% आहे आणि तो सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतो.
- शेतकऱ्याला आपला माल विक्री करता ठेवण्यासाठी कोणतेही साठवणूक शुल्क आकारले जात नाही.
- जर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड. जर सहा महिन्याच्या आत केली, तर त्याला व्याज सवलत म्हणून तीन टक्के प्रोत्साहन दिले जाते.
कर्ज कालावधी आणि व्याजदर |
शेतकऱ्यांनी घेतलेल्या तारण कर्ज साठी सहा महिन्यांचा कालावधी दिलेला असतो. म्हणजेच 180 दिवस या कालावधीत व्याजदर सहा टक्के असतो, 180 दिवसानंतर हा व्याजदर 8 टक्के होतो आणि 365 दिवसानंतर 12 टक्के होतो. Shetimal Taran karj Yojana 2024
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भारायचा आहे काय ? त्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम | वाचा सविस्तर |
तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये |
पात्रता :
- तारण कर्ज योजनेसाठी फक्त शेतकऱ्यांचा शेतमाल स्वीकारला जातो, व्यापाऱ्यांचा नाही.
- प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाच्या बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेला खरेदी किंमत यापैकी जी किंमत असेल ती त्यावर ठरवली जाते.
- तारण कर्जाची मुदत 6 महिने म्हणजेच 180 दिवस असून, तारण कर्ज 6 टक्के व्याजदर आहे. Shetimal Taran karj Yojana 2024
शेतमालाची किंमत :
शेतमालाचा बाजारभाव किंवा सरकारद्वारे जाहीर हमीभाव जो कमी असेल, त्यावरून कर्जाची रक्कम ठरते. त्यामुळे बाजारातील कमी – जास्त किमतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते.
प्रोत्साहन सवलत :
बाजार समितीचे 180 दिवसाच्या आत कर्जाची परतफेड केली, तर त्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जाते. ही सवलत शेतकऱ्यांना आणि बाजार समित्यांना प्रोत्साहन देते.
आता तुमच्या पॅन कार्ड मध्ये होणार बदल ? सध्याचे कार्ड इनऍक्टिव्ह होणार | जाणून घ्या सरकारच्या नवीन निर्णय |
साठवणूक आणि सुरक्षा :
बाजार समिती त्या शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक, देखरेखाने सुरक्षा मोफत करतात. त्याचबरोबर संबंधित बाजार समिती मालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी घेतात.
गोदाम पावत्यांवर कर्ज :
राज्य गोदाम महामंडळ किंवा केंद्रीय गोदाम महामंडळाच्या पावत्यांवरही शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. तारण ठेवलेल्या शेतमालाचे साठवणूक, देखरेख व बाजार समिती करतील, ते पण तिला विनामूल्य असतील. तारणातील शेतमालाचे विमा उतरण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीकडे राहते.
Shetimal Taran Karj Yojana 2024 | या योजनेचे फायदे |
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास नफा मिळण्याची खात्री मिळते.
- बाजारीतील शेतमालाचे बाजार भाव वाढल्यास, त्यांना आपला माल बाजारात विक्रीस आणता येतो.
- त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त होते.
- आपल्या मालावर चांगल्या किमती मिळवण्याची संधी मिळते. Shetimal Taran karj Yojana 2024
- तारण कर्ज सवलती मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजन सुधारते आणि नुकसान कमी होते.