सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |
Savitribai Phule scholarship
Savitribai Phule scholarship scheme
Savitribai Phule schedule casts girls scheme
Savitribai Phule education scheme
Savitribai Phule scholarship Yojana
नमस्कार, Savitribai Phule scholarship शिक्षणा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो त्याला पाहिजे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये अगदी प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक योजना आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हे महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी सुरू केलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व प्रत्येक मुलगी उच्च पदावर शिकली पाहिजे. त्यासाठी प्राथमिक शाळेतील तिची गळतीचे प्रमाण कमी करून तिच्या शिक्षणातील अडसर दूर करणे हा आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हे फक्त मुलींसाठी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीं ज्या पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकत आहेत. त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. Savitribai Phule scholarship
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय ? कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटचा पर्यंत वाचा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | मिळणार 100 % अनुदान | संपूर्ण माहिती |
आवश्यक पात्रता काय ?
- विद्यार्थीनी हि महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फक्त मुलीच पात्र असतील, मुले नाहीत.
- अर्ज करणारी विद्यार्थिनी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा देण्यात आलेली नाही. Savitribai Phule scholarship
- अर्जदार विद्यार्थिनी सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणारी असावी.
- वर्षभर उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनींनाच लाभ दिला जाईल. 60 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
Savitribai Phule Scholarship | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
- बँक पासबुक ( आधार कार्डला लिंक असावे )
- मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- प्रवेश पावती
- दोन पासपोर्ट साईज
- फोटो मोबाईल
- नंबर ईमेल आयडी
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी मिळणार 10 लाख रु. कर्ज | कोणाला मिळणार लाभ ? अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |
अर्ज करण्याची पद्धत |
- सर्वप्रथम आपणाला https://mahadbtmahait.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे एक नवीन पेज ओपन होईल, त्यावर ‘ नवीन अर्जदार नोंदणी ‘ यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.
- त्यानंतर वापर करताना वर पासवर्ड तयार करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल, तो त्यामध्ये प्रविष्ट करा.
- त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल, त्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ दिसेल.
- त्यावर तुमच्या बँक खात्याचा आधार लिंक असलेल्या ‘ आधार बँक लिंक ‘ वर क्लिक करा.
- प्रोफाईलवर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा, तसेच आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर ‘ सर्व योजना ‘ वर क्लिक करा. त्यामध्ये ‘ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ‘ वर क्लिक करा.
- सर्व अतिरिक्त माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शेवटी तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. Savitribai Phule scholarship