Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजना मराठी |
s
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 |
नमस्कार मित्रानो, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, कष्टकरी, कामगार वर्गासाठी विविध योजना सतत राबवल्या जात असतात. या योजनेच्या माध्यमातून या मागास दिनदुबळ्या गरिबांना आर्थिक व सामाजिक विकास करणे हाच उद्देश असतो. त्यासाठी या योजनाची अंमलबजावणी शहरांपासून खेड्यांपर्यंत केली जाते.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास समाजात उत्पन्नाचे कोणतेही कायमस्वरूपी साधन उपलब्ध नसते. त्यामध्ये ग्रामीण भागात तर ही समस्या आणखीनच बिकट असते. ग्रामीण भागात विशेषतः रोजगाराच्या संधी कमीच उपलब्ध असतात. तसेच काम मिळाले तर फक्त पुरुष वर्गालाच असते आणि महिला या घर सांभाळण्यासाठी घरातच असतात. या महिलांवर घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तींची जबाबदारी असते.
शेतकरी वर्गाकडे मोलमजुरी करून हा कामगार वर्ग आपले जीवन जगत असतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. तसेच ते काम कायमस्वरूपी मिळत नाही, हंगामी स्वरूपाची असते. त्यामुळे इतर काळात त्यांची कामासाठी वणवण होत असते. पावसाळ्याच्या दिवसात तर या लोकांना काम नसल्यामुळे या कामगार वर्गांवर उपासमारीची वेळ येते. तसेच त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन जाते.
राज्यातील कामगारांच्या या समस्यांचा विचार करून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तपणे ” महात्मा गांधी रोजगार हमी योजना “हि योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार पुरविला जातो.
यामध्ये केंद्र शासनामार्फत 100 दिवसाच्या रोजगाराच्या हमी दिली जाते. त्यानंतर उरलेल्या दिवसांच्या रोजगाराची हमी ही राज्य शासनामार्फत व कुशल कामगारांना दिली जाते.या योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील दिली जातात. या योजनेतील कामाचा मोबदला कामगारांना थेट DBT मार्फत बँक खात्यात दिला जातो. त्यामुळे या योजनेत पूर्णपणे पारदर्शकता आहे.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | वाचकांना विनंती |
मित्रांनो, रोजच आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्हाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या योजनेचा लाभ मिळवा. त्याचबरोबर तुमच्या परिसरात जे कोणी लोक रोजगाराच्या शोधात असतील, त्यांनाही या योजनेची माहिती सांगा. तसेच हा आमचा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल ही विनंती.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 |
योजनेचे नाव | महात्मा गांधी रोजगार हमी योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
योजनेचा विभाग | नियोजन विभाग |
उद्देश | ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | खेड्यातील नागरिक |
लाभ | कायमस्वरूपी रोजगाराची हमी |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | Good News | निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | ऑनलाईन नोंदणी सुरु |
Free Flour Mill Scheme 2024 |Good News | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र | असा करा अर्ज | 100% मिळणार लाभ |
NEW | Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना ऑनलाईन अर्ज | नोंदणी सुरु |
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजनेचा उद्देश |
- राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देणे. हा या रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
- रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळवून देणे.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास कामगारांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात असणारी बेकारी कमी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
- खेड्यात रोजगाराचे नवीन स्त्रोत या योजनेअंतर्गत सुरू करणे.
- खेड्यातील गरीब लोकांना रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळवून देऊन त्यांना सशक्त आत्मनिर्भर करणे.
- खेड्यातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये |
- महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही केंद्र शासनामार्फत राज्यात सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत 100 दिवसापर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली जाते. त्यानंतर उरलेल्या दिवसात रोजगार उपलब्ध करण्याची हमी ही राज्य शासनामार्फत केली जाते.
- रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना काम दिले जाते.
- रोजगार हमी योजनेची सर्व कामे आता ऑनलाईन केले केल्याने ही सर्व कामे अतिशय जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होतात.
- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार बरोबरच नागरिकांना अन्य सुविधांचाही लाभ दिला जातो.
Rojgar Hami Yojana | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे फायदे |
- ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार मिळवून दिला जातो.
- खेड्यातील नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कोणती अडचणी येऊ नये म्हणून त्यांना या योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास साधला जातो.
- रोजगार हमी योजनेमुळे खेड्यातील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
- या योजनेतून बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत नागरिकांना कामाच्या ठिकाणी अन्य सुविधांचाही लाभ दिला जातो.
- रोजगार हमी योजनेमध्ये नागरिकांनी मागितल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत काम उपलब्ध झाले नाही तर त्यांना या योजनेअंतर्गत रोजगार भत्ता दिला जातो. Rojgar Hami Yojana maharashtra 2024 |
- रोजगार हमी योजनेमुळे खेड्यातील लोक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- रोजगार हमी योजनेमुळे खेड्यातील लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही, तसेच कामासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगाराच्या कामाची यादी |
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामाचे स्वरूप हे वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन प्रकारचे असते. त्यातील कामांचे काही प्रकार ते पुढीलप्रमाणे :
- वैयक्तिक कामे :
- सिंचन विहिरीचे कामे
- लहान पाझर तलाव बांधण्याचे काम
- सिल्विपॅचर ग्रासस्लँड्सचा विकास करण्याचे काम
- वैयक्तिक लाभासाठी गटारे बांधण्याचे काम
- बार्कले कॉम्पोस्ट खड्डा बांधणे
- पडिक जमिनीतील वृक्ष लागवड करण्याचे काम
- किनारपट्टीच्या लगत वृक्षारोपण वैयक्तिक करण्याचे काम
- निवाऱ्यासाठी वृक्षालागवड करण्याचे काम
- किनाऱ्या लगतच्या वृक्षालागवडीचे काम
- शेतात वेगवेगळ्या झाडाची लागवड करण्याचे काम
- पडिक जमिनीतील शेती विषयक उपयोगी झाडाची लागवड करणे
- जंगली झाडाची लागवड करून वाद करणे
- पडिक जमिनीवरील जंगली झाडाची लागवड करणे
- शेतावरती एकत्रित भांडवली तुतीची लागवड करणे
- वैयक्तिक लाभार्थ्यांच्या पडिक शेतावरती एकत्रित तुतीची लागवड
- शेतावरती एकत्रित बायोड्रेनेज झाडाची लागवड करणे
- लाभार्थ्यांच्या शेतावरती एकत्रित पडीक जमिनीवरती बायोड्रेनेज झाडाची लागवड करणे
- शेतावरती निवाऱ्याकरिता झाडाची लागवड करणे
- लाभार्थ्यांच्या शेताच्या सीमा भागावरती निवाऱ्याकरिता झाडाची लागवड करणे
- वैयक्तिक स्वरुपाच्या एकत्रित फळबाग लागवड Rojgar Hami Yojana maharashtra 2024 |
सामुदायिक कामे :
- कालव्याच्या कडेला फळबाग लागवड करणे
- मत्स्यपालनाचे तलाव बांधणे
- वनीकरण वृक्षांची सीमा रेषेत वृक्षारोपण करणे
- मत्स्यपालनाचे तलाव नूतनीकरण करणे
- बंधाऱ्याच्या कडेला वनीकरण वृक्षांची सीमा रेषेत वृक्षारोपण करणे
- समुदायासाठी वनीकरण वृक्षांची सीमा रेषेत वृक्षारोपण करून वाद करणे
- किरकोळ कालवा बांधणे
- वनीकरण वृक्षांच्या रस्तेच्या कडेला वृक्षारोपण करणे
- छोट्या कालव्याच्या अस्तरीकरण
- वन वृक्षांची किनारपट्टीच्या कडेला वृक्षारोपण करणे
- पाणी पुरवठा नूतनीकरण
- निवाराकरीता वृक्षांची सीमा रेषेत लागवड करणे
- निवाराकरीता वृक्षांचे रस्तेच्या कडेला वृक्षारोपण करणे
वरीलप्रमाणे अशाप्रकारची अनेक कामे हि रोजगार हमी योजने अंतर्गत केली जातात.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | या योजने अंतर्गत मजुरी देण्याची पध्दत |
- मजुराने जॉब कार्ड काढताना किंवा रोजगार हमी योजनेत नाव नोंदविताना च्या बँक पासबुकची झेरॉक्स आधार लिंक असेल त्यामध्ये आधार पेस्ट पेमेंटद्वारे डीबीटी मार्फत बँक खात्यात मजुराचे कामाचे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर पेमेंट जमा केले जाते.
- वैयक्तिक कामाबद्दलचे पेमेंटही थेट बँक खात्यात जमा केले जाते. मात्र सार्वजनिक कामाचे पेमेंट हे संबंधित यंत्रणे च्या खात्यामध्ये प्रथम जमा केले जाते, नंतर त्यातून मजुरांच्या खात्यात जमा केली जाते.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरीचा दर |
वर्ष | मजुरीचा दर ( प्रती दिवस ) |
2023 | 273/- रुपये |
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजना |
- रोजगार हमी योजना फॉर्म Click Here
- रोजगार हमी योजना जॉब कार्ड Click Here
- रोजगार हमी योजना शासन निर्णय Click Here
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | मजुरांना कामाच्या ठिकाणी दिल्या जाणार्या अन्य सुविधा |
- कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय तसेच प्रथमोपचार पेटी, मजुरांना विश्रांतीसाठी शेड याशिवाय पाच पेक्षा अधिक लहान बालके असल्यास त्यांच्या संभाळ करण्यास दाई.
- या योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी मजूर किंवा त्यांच्या लहान मुलांना काही दुखापत झाल्यास संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, तसेच 50% वेतन मजुरास दिले जाईल.
- रोजगार हमी योजने अंतर्गत एखाद्या मजुराला कामाच्या ठिकाणी अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
- या योजनेअंतर्गत मजुरांना वेतन चिट्ठी चे वाटप करण्यात येईल.
- या योजनेतील कामगारांना कामासाठी 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जावे लागत असेल तर संपूर्ण भाडे दिले जाईल किंवा प्रवासी भत्ता दिला जातो.
- काही वेळेस या मंजुरांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध झाला नाही तर या मजुरांना दैनंदिन मजुरीच्या 25 % हिस्सा बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | वैयक्तिक कामे देताना या कुटुंबाना प्राधान्य देण्यात येते |
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जाती
- भटक्या विमुक्त जाती
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे
- स्त्री करता असलेले कुटुंबे
- अपंग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
- घरकुल योजनेतील लाभार्थी कुटुंबे
- वनवासी व डोंगराळ भागातील कुटुंबे
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता |
- जॉब कार्ड काढणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- या अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- जॉब कार्ड काढणारा अर्जदार हा ग्रामीण भागातील मूळ रहिवासी असावा.
- या अर्जदाराची आंगमेहनतीची कामे करण्याची तयारी असावी.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजनेच्या आटी व नियम |
- रोजगार हमी योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील कामगारांना दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीने 14 दिवस काम करणे आवश्यक आहे. जर ती व्यक्ती 14 दिवसाच्या आत काम सोडून गेली तर तिला कामाचा मोबदला मिळत नाही.
- रोजगार हमी योजनेत नोंदणी केल्याशिवाय इतर व्यक्तींना काम मिळत नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणारी अर्जदार व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावी.
- या व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जॉब कार्ड ची माहिती
- रहिवासी दाखला
- ग्रामसभेची मान्यता
- विहित नमुन्यातील अर्ज
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | जॉब कार्ड काढण्याची पध्दत |
- प्रथम अर्जदार व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन, ग्रामसेवक किंवा रोजगार हमी योजनेत मित्र यांना सर्व कागदपत्रांसह भेटावे लागेल.
- तिथे ते ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक हे तुम्हाला या योजनेचा अर्ज देतील.
- या अर्जामध्ये सर्व आवश्यक ती माहिती भरून आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडून तो जमा करावा.
- नंतर ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक तो अर्ज रोजगार हमी योजनेच्या वेबसाईटवर भरतील.
- त्यानंतर मग ते तुम्हाला जॉब कार्ड देते.
Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | रोजगार हमी योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपल्याला आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
- नंतर तिथून ग्रामसेवकाकडून रोजगार हमी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- नंतर अर्जात विचारलेली आवश्यक सर्व माहिती तसेच जॉब कार्डची माहिती भरून, तो अर्ज ग्रामसेवकाकडे जमा करावा लागेल.
- ग्रामसेवक अर्जाची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत website वर भरेल.
- सर्व माहिती ऑनलाईन भरून झाल्यावर लाभार्थ्यास 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
2 thoughts on “Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | Good News | रोजगार हमी योजना माहिती मराठी |ऑनलाईन नोंदणी |”