Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | Good News | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी 2024 |

Table of Contents

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी |

Rajmata Jijavu Cycle Yojana Maharashtra
Maha Govt Scheme
Mukhyamantri Yojana
Mofat saykal yojana marathi
Mulinsathi Yojana

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रानो, माहाराष्ट्र राज्यामध्ये महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. त्यामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले जाते. आपल्या राज्यामध्ये स्त्री शिक्षणाला पूर्वीपासूनच लक्ष दिले गेले नाही. मुलीना शिक्षणा पासून कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न समाजात झालेला दिसून आला आहे. तर काही वेळा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शाळेत घालण्यासाठी असमर्थ ठरतात.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी केंद्र व राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. विध्यार्थ्याने शिक्षण घ्यावे त्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये. यासाठी शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. त्यामध्ये शिशिवृती योजना, अनुदान योजना तसेच भत्ता योजना आशा योजनाचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शासनाकडून मुलींचे शिक्षण बंद पडू नये म्हणून ” मोफत सायकल वाटप योजना “ या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत मुलीना घरातून शाळेपर्यंत जाण्यासाठी व शाळेतून घरापर्यंत येण्यासाठी मोफत सायकल दिली जाते. मुलगी शिकली तर प्रगती होईल. या प्रमाणे मुलींचे शिक्षण बंद पडू नये. त्या शिकून त्यांचे भविष्य उज्जवल करावे या उद्देश्याने या मोफत सायकल योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजेने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीना सायकल घेण्यासाठी महा शासनाकडून 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवले जाते.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील पालक पर्स्थितिअभवि मुलीना शिक्षण देण्याचे टाळतात. त्यासाठी या योजने ची सुरुवात झाली. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही. त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच त्यांचे जीवनमान सुधारेल. समाजात मुलींच्या शिक्षणाप्रती आवड निर्माण होईल. मुलीना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हे या योजनेचे महत्त्व आहे.

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | वाचकांना विनंती |

मित्रानो, दररोज आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती पाहत असतो. त्या योजनाचा लाभ हि तुम्ही घेत असाल. त्याचप्रमाणे आजही आपण या शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना  हि होय. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या घरात एखादी मुलगी असेल किंवा परिसरात कुणी इतर मुली असतील ज्या शिक्षणासाठी दूरवर पायी चालत जात असतील त्यांना या योजनेची माहिती द्या. त्यामुळे त्यानाही या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. हि विनंती.

योजनेचे नाव राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
योजनेचा विभागजिल्हा नियोजन कार्यालय, महाराष्ट्र शासन
उद्देशमुलींची शिक्षणाप्रती आवड निर्माण करणे
लाभार्थीग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुली
लाभ5,000/- रुपये
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

 

हे पण वाचा –

                        Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | Good News | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी | पहा सर्व माहिती |

                          NEW | Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | राजीव गांधी विध्यार्थी अपघात विमा योजना 2024 |

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  सायकल वाटप योजनेअंतर्गत मुलींना शाळेतून घरी जाण्यासाठी व घरून शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • सायकल वाटप योजना चा मुलींचा पायी चालत जाण्याचा, पायपिट करण्याचा त्रास कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • मुलींचे शिक्षण प्रती आवड निर्माण करणे या योजनेमुळे शक्य होणार आहे.
  • मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे या योजनेमुळे शक्य होणार आहे.
  • या योजनेमुळे पालकांमध्ये स्त्री शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे.
  • या योजनेमुळे समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.
  • मुलींचा शैक्षणिक दृष्ट्या विकास करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली.
  •  सायकल वाटप योजनेमुळे मुलींचे जीवनमान उंचावणे हा उद्देश आहे.
  • या योजनेमुळे मुलींची शाळेप्रती आवड निर्माण होईल.
  • या योजनेमुळे कुटुंबातील पालकांना मुलींना सायकली घेण्यासाठी कोण पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
  • या योजनेमुळे ग्रामीण भागात शिक्षणासाठी होणारी मुलींची त्रासदायक पायपीट बंद होईल.

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये |

  •  सायकल वाटप योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाते.
  • राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य कुटुंबातील मुलींना मोफत सायकल दिली जाते.
  • मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शालेय शिक्षण घेणाऱ्या मुली याचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी सायकल घेण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही तसेच त्यांना कोणाकडून कर्जही घ्यावे लागणार नाही.
  • त्यामुळे पालकांचा आर्थिक बोजा कमी होणार आहे.
  • राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजनेअंतर्गत सायकल मिळाल्याने यामुळे शिक्षण घेण्यासाठी सक्षम बनतील.
  • मोटरसायकल योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही गरीब कुटुंबातील पालकाना, मुलींना सरकारी कार्यालयाची हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळालेली आर्थिक लाभाची रक्कम ही डीबीटी मार्फत थेट मुलींच्या बँक खाते जमा करण्यात येईल हे या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहे.
  • या योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळाल्याने मुलींना शिक्षणासाठी होणारा त्रास कमी झाल्याने त्या आपले गुणवत्ता सिद्ध करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
  • तसेच समाजात खंबीरपणे नेतृत्व सिद्ध करतील व इतर मुलींपुढे आदर्श निर्माण करतील.
  •  या योजनेमुळे मुलींना गुणवत्ता पूर्ण व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळाल्याने त्या स्वतःचा विशेष असा ठसा उमटवतील.

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजनेचे फायदे |

  1. सायकल वाटप योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र सरकारकडून सायकल खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  2. या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी, सायकल खरेदी करण्यासाठी कोणाचे हे कर्ज काढण्याची गरज पडणार नाही.
  3. या योजनेतील सायकलीमुळे मुलींची येण्या जाण्यासाठी लागणारे वेळ कमी झाल्याने वेळेची बचत होईल.
  4. या योजनेमुळे मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  5. मोफत सायकल वाटप योजनेमुळे मुलींचे शिक्षण घेण्याचे समाजातील प्रमाण वाढेल.
  6. या योजनेमुळे मुलींचे जीवनमान उंचावेल.
  7. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्वल होण्यास मदत मिळेल.
  8. या योजनेमुळे मुलींचे शिक्षणाप्रती आवड निर्माण होऊन समाजातील मुलींचे शिक्षण घेण्याचा टक्का वाढेल.
  9. या योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाल्याने त्या आपल्या शिक्षण योग्य रीतीने पूर्ण करतील.

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजनेची पात्रता |

  1. मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
  2. मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेणारी असावी.

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजनेच्या आटी व नियम |

  •  या योजनेअंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत सायकल योजनेचा लाभ दिला जाईल.
  • मोफत सायकल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या शाळेचे घरापासूनचे अंतर पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ इयत्ता आठवी ते बारावी या चार वर्षांमध्ये फक्त एकदाच दिला जाईल.
  • या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत 5,000/- रुपयाची आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे सायकली खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम द्यावी लागली तर ती लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल.
  • या मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ फक्त दुर्गम, डोंगराळ भागातील गरीब कुटुंबातील मुलींना दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ मुलांना दिला जाणार नाही.
  • मोफत सायकल योजनेचा लाभ मुलींना फक्त एकदाच दिला जाईल.
  • या अगोदर या लाभार्थी मुलींनी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून सायकल खरेदी केली असेल तर या योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत सायकल खरेदी केल्यानंतर या सायकलीसाठी लागणारा देखभालीचा खर्च हा लाभार्थी मुलींना स्वतः करावा लागणार आहे.

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | या मोफत सायकल योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या शाळा |

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेमध्ये सामाविष्ट असणाऱ्या शाळांची यादी पुढीलप्रमाणे दिलेली आहे :

  1. शासकीय शाळा
  2. जिल्हा परिषद शाळा
  3.  शासकीय अनुदानित शाळा
  4. तसेच च्या अनुदानित व आश्रम शाळेत मुलींना डेस्क स्कॉलर वर प्रवेश दिला जातो त्यांना शाळेत जा करण्यासाठी सायकल दिली जाते.

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | अनुदानित रक्कमेचे टप्प्ये |

पहिला टप्पा 1 –  या अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत डीबीटी मार्फत मुलींच्या बँक खात्यामध्ये 3,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

दुसरा टप्पा- यामध्ये मुलीने सायकल खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित रक्कम म्हणजे 1,500/- रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातील.

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra |

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना शासनाचा GR CLICK HERE

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra |  आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. विद्यार्थिनी शाळेत शिकत असल्याचा दाखला
  5. बँक पासबुक
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. ईमेल आयडी
  9. उत्पन्नाचा दाखला
  10. विद्यार्थी दरवर्षी उत्तीर्ण असल्याचे मार्कशीट
  11. सायकल खरेदी केल्याची पावती

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | अर्ज रद्द होण्याची करणे |

  • या योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी ही जर महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेत अर्ज करणारी विद्यार्थिनी ही इयत्ता आठवी च्या खालील वर्गात किंवा इयत्ता बारावीच्या वरील वर्गात शिकत असेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • इयत्ता आठवी ते बारावीच्या शैक्षणिक वर्षात जर विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल तर या योजनेचा अर्थ अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी विद्यार्थिनीचे शाळेचे घरापासूनचे अंतर पाच किलोमीटरच्या कमी असेल तरी या योजनेचा अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेअंतर्गत अर्ज केलेली विद्यार्थ्यांनी जर दुर्गम डोंगराळ भागातील नसेल तर अंतर्गत अर्ज रद्द होऊ शकतो.

 

Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | अर्ज करण्याची पध्दत |

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेमध्ये ऑफलाईन पद्दतीने दोन प्रकारे अर्ज केला जातो, त्या पध्दती पुढीलप्रमाणे :

एक म्हणजे-1  ज्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी शाळेच्या ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा.

2. तसेच अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.

3. नंतर तो अर्ज शाळेच्या कार्यालयात/ऑफिसमध्ये जमा करावा..

दुसरी म्हणजे- 1. ज्या विद्यार्थिनींना लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालया त जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा.

2. त्या अर्जामध्ये योग्य ती माहिती भरावी व सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.

3. त्यानंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.

4.  अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
अशाप्रकारे तुमचे अर्ज करण्याची पद्धत पूर्ण होईल यानंतर सर्व अधिकारी याची छाननी करून तुम्हाला या योजनेचा लाभ अवश्य देतील.

 

 

1 thought on “Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | Good News | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी 2024 |”

Leave a Comment