Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
नमस्कार मित्रानो, केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या योजना या देशवासीयांच्या कल्याणासाठी येत असतात. शासन स्थारावरून नेहमीच जनकल्याणाचा विचार होत असतो. देशातील गरजू व गरीब लोकांना आर्थिक स्वरुपात मदत करून, त्यांचे जीवनमान उंचावणे. हा या योजना सुरु करण्यामागे उद्देश असतो. कष्टकरी, कामकरी लोकांना थोडाफार हाथभार लावला तर ते आणखीन जोमाने प्रयत्न करू लागतात. त्यांच्या कष्टाला आर्थिक भांडवलाची जोड देण्याचे काम या योजना करत असतात.
त्याचप्रमाणे ” प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना “ या योजनेची सुरवात आपल्या देशातील लघुउद्योग व व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने झाली आहे. हि एक नाविन्यपूर्ण योजना आहे.या योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या योजने अंतर्गत देशातील लघु उद्योगांना 10 लाख पर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येतो.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | मुद्रा लोन योजनेबाबत थोडक्यात……|
मित्रानो, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याकरता सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. या योजने अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध होते. तेही 10 लाख रुपया पर्यंतचे कर्ज घेवू शकतात.तसेच या योजने अंतर्गत घेतलेल्या कर्जावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क द्यावे लागत नाही.
तसेच मुद्रा कर्जावरील व्याजदर हा एम सी एल आर ( MCLR ) द्वारे व आर बी आय ( RBI ) च्या मार्गदर्शक सूचनानुसार निर्धारित केला जातो. या योजनेसाठी केंद्र शासना कडून 3 कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. त्यातील 1.75 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.तसेच या योजनेच्या कर्ज परत फेधीचा कालावधी हि 5 वर्षांनी वाढविण्यात आला आहे.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज हे शिशु, किशोर आणि तरुण आशा विभागात विभागले आहे. त्यामुळे तुम्ही त्यातील कोणतीही एक श्रेणी निवडून कर्ज घेवू शकता. तसेच आपल्या उद्योग व व्यवसायाला बळकटी अणू शकता. कारण हि कर्जे सुलभ आटी वर लघु व्यावसायिकांना दिली जातात.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | वाचकांना विनंती |
मित्रानो, आज आपण प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेचा उद्देश काय आहे? वर्गवारी कशी करण्यात आली आहे? लाभ कोणाला मिळणार ? या सर्वांची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तुम्ही जर व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल किंवा तुमच्या परिसरातील कोणी या योजनेचा लाभ घेवू इच्छित असतील, तर त्यांच्या पर्यंत हि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. हि विनंती.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी |
योजना सुरुवात | 8 एप्रिल 2015 |
लाभार्थी | देशातील लघु / सूक्ष्म व्यावसायिक |
उद्देश्य | व्यायसायासाठी कर्ज पुरवठा करणे |
कर्जाची रक्कम | 50 हजार ते 10 लाख रुपये |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे पण वाचा –
Shasan Aplay Dari Scheme 2024 | Good News | शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |
Enter- Caste Marriage Scheme 2024 | NEW | अंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | मुद्रा लोन योजनेचा उद्देश |
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत लघु उद्योग सुरु करण्यासाठी तसेच असणारा व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज पुरवठा करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
- या योजने अंतर्गत नवीन तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
- प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे देशातील बेरोजगारी कमी करून, तरुणांना उद्योग – व्यवसायाकडे वळवणे.
- तसेच कुशल कारागिरांना भांडवलाचा पुरवठा करून त्याच्या व्यवसायाला मजबुती देणे.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
- कोणताही तरुण भांडवला अभावी नोकरीच्या शोधात बेरोजगार राहू नये, हा महत्त्वाचा उद्देश आहे.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजनेतील कर्जाची वर्गवारी |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत लघु / सूक्षम व्यवसायांसाठी दिले जाणारे कर्ज हे वेगवेगळ्या म्हणजे 3 श्रेणीमध्ये विभागले गेले आहे. त्या श्रेणी कोणत्या आहेत व त्याचे निकष कोणते ? ते पुढीलप्रमाणे :
- शिशु श्रेणी कर्ज :
या प्रकारच्या श्रेणी माध्ये 50 हजाराचे मुद्रा लोन कर्ज लघु / सूक्ष्म व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले जाते. या अंतर्गत दिल्या जाणार्या कर्जावर प्रती महिना 9% व वर्षाला 12% व्याज दिले जाते.
तसेच या प्रकारामध्ये दिल्याजानार्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षाचा ठेवण्यात आला आहे.
- किशोर श्रेणी कर्ज :
या प्रकारच्या श्रेणी मध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु केलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 50 हजार पासून 5 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजने अंतर्गत कर्जाच्या व्याजाचा दर बँक निश्चित करते. ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहे, त्यावर तो अवलंबून असते.
- तरुण श्रेणी कर्ज :
या अंतर्गत दिल्या जानार्या कर्जावरील व्याजाचा दर हि बँक निश्चित करते. व्यवसायाच्या प्रकार नुसार व बँकेच्या धोरणानुसार या श्रेणीतील कर्ज पुरवठा अवलंबून असतो.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | मुद्रा लोन योजनेची वैशिष्ट्ये |
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही लघु व सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी वरदान आहे, हे एक वौशिष्ट्ये आहे.
- या योजने अंतर्गत उद्योग सुरु करणार्यांसाठी 50 हजारापासून ते 10 लाख पर्यंतचा कर्ज पुरवठा केला जातो.
- या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी बँकेकडे कोणतीही वस्तू तारण म्हणून ठेवावी लागत नाही.
- प्रधानमंत्री कर्ज योजना हि केवळ सरकारी बँकांमध्ये आहे.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
- प्रधानमंत्री कर्ज योजनेत कर्ज घेताना कर्जदाराला बँकेत कोणताही जमीन द्यावा लागत नाही.
- या योजनेसाठी केंद्र सरकारने 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- या योजने अंतर्गत कर्ज घेणार्यांमध्ये महिला कर्जदाराचे प्रमाण जास्त आहे.
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्ती या योजने अंतर्गत लाभ घेवू शकते.
- या योजने मध्ये कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला स्वताकडील 10 % हि भांडवल नसेल, तरी हि लाभ घेता येतो.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | मुद्रा लोन योजने चे फायदे |
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमुळे जे नवीन व्यवसाय सुरु करायचा विचार करत आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य मिळते.
- मुद्रा लोन योजनेमुळे देशातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल.
- या योजनेमुळे व्यवसायासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध झाल्याने व्यावसायिकाना कोणाकडून कर्ज घावे लागणार नाही.
- या योजनेमुळे उद्योग निर्माण होतील आणि त्यामुळे नागरिकांच्या हाताला काम मिळेल.
- या योजने अंतर्गत भांडवल उपलब्ध होत असल्याने महिला व्यावसायिकांचे प्रमाण हि वाढले आहे.
- मुद्रा लोन योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसिसिंग फी आकारली जात नाही.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
- तसेच या योजनेतील कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हि 5 वर्षाचा असल्याने, अर्जदारास आपला व्यवसायाचा विस्तार करण्यास वाव मिळतो.
- या योजने अंतर्गत एक मुद्रा कार्ड दिले जाते, ज्याच्या मदतीने लाभार्थी आपल्या गरजेनुसार पैसे कडू शकतो.
- या योजनेमुळे देशातील तरुण हा नौकरी मागणारा नाही तर नौकरी देणारा ठरेल.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- जो व्यवसाय करणार आहात त्याचा परवाना व पत्ता
- व्यवसायासाठी घाव्याच्या मशनरी /वस्तू यांचे बिले
- बँकेच्या कडील अर्जदाराचे मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट.
- आयकर / विक्रीकर युनिटची मागील दोन वर्षाची ताळेबंद
- चालू आर्थिक वर्षात साधलेल्या विक्रीचा तपशील
- अर्जदार हा ज्या प्रवर्गातील आहे त्याचे प्रमाणपत्र Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | मुद्रा कार्ड |
प्रधानमंत्री मुद्रा लोन घेणाऱ्या लाभार्थ्याला एक मुद्रा कार्ड दिले जाते, जे डेबिट कार्डसारखे असते. या कार्डच्या सहाय्याने लाभार्थी जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे काढू शकतो. या कार्डवरून पैसे काढण्यासाठी पासवर्ड चा वापर करायचा असतो.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | आवश्यक पात्रता |
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावीत.
- अर्जदार हा इतर कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
- ज्यांच्याकडे व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य आहेत व त्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजने अंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत खालील श्रेणीतील व्यवसायांना कर्ज मिळू शकते :
- लघु उद्योग व्यवसाय मालक
- पार्टनरशिप
- सेवा क्षेत्रातील कंपन्या
- अन्न संबंधित व्यवसाय
- फळे आणि भाजीपाला विक्रेता
- ट्रक/कार मालक
- दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय कर्ज
- कापड उत्पादने क्षेत्र
- दुरुस्तीचे दुकान
- हॉटेल मालक
- शेती आणि संबंधित क्रियाकलाप
- सूक्ष्म उत्पादन फॉर्म
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | अंतर्गत समाविष्ट क्षेत्रे |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठराविक क्षेत्रे निश्चित केली आहेत. त्या क्षेत्रा अंतर्गत समाविष्ट असणारे उपक्रम सुरु करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी कर्ज दिले जाते. ती क्षेत्रे पुढीलप्रमाणे :
- सामाजिक सेवा क्षेत्र
- जमीन वाहतूक क्षेत्र
- अन्न उत्पादन क्षेत्र
- वास्त्रौद्योग क्षेत्र
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजने अंतर्गत समाविष्ट बँकांची यादी |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत समाविष्ट असणार्या बँकांची यादी पुढीलप्रमाणे :
- सरकारी बँक – 21
- खाजगी बँक – 17
- सहकारी बँक – 4
- प्रादेशिक ग्रामीण बँक – 31
- सूक्ष्म वित्त संस्था – 36
- नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या – 25
तसेच, प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत सार्वजनिक शेत्रातील बँकांची यादी पुढीलप्रमाणे :
- अलाहाबाद बँक
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- आंध्र बँक
- देना बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- कॉर्पोरेशन बँक
- आयडीबीआय बँक लिमिटेड
- इंडियन बँक
- UCO बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- पंजाब आणि सिंध बँक
- पंजाब नॅशनल बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- सिंडिकेट बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- युनायटेड बँक ऑफ इंडिया
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रधानमंत्री कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम जवळच्या बँकेत जावून या योजनेच्या कर्ज चा अर्ज घ्यावा.
- ज्या व्यवसायासाठी कर्ज घायचे आहे, त्याची पूर्ण खात्री करावी.
- अर्जत विचारलेली सर्व माहिती योग्य ती भरावी.Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 |
- अर्ज सोबत हव्या त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा.
- बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून 1 महिन्यानंतर लोन पास करेल.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत website ला भेट द्यावी लागेल.
- आता मुखपृष्ठ open होईल, त्यातील login बटनावर click करावे लागेल.
- नंतर तुमच्या समोर मुद्रा लोन योजनेचे मुख पृष्ठ open होईल.
- त्यामध्ये शिशु, किशोर. तरुण असे दिसेल.
- तुम्हाला या अर्ज ची प्रिंट घावी लागेल.
- त्यामध्ये सर्व अचूक माहिती भरून कागदपत्रे जोडावी लागतील.
- त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला जवळच्या बँकेत जमा करावा लागेल.
- अर्जाची पडताळणी केल्यानंतर 1 महिन्याने कर्ज तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | या योजनेचे टोल फ्री नंबर |
- महाराष्ट्रासाठी टोल फ्री क्रमांक : 1800-102-2636
- राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : 1800 – 180 -1111 – 1800 – 11 – 0001