इलेक्ट्रिक दुचाकी वाहन अनुदान |
PM E Drive subsidy scheme
PM E Drive scheme
E drive scheme
How to apply e drive scheme
Electric vehicle scheme
नमस्कार, PM E Drive subsidy scheme शासनाकडून देशात विविध कल्याणकारी योजना साठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातून जनतेच्या विकास करणे व निसर्गाचा समतोल राखणे प्राथमिक हा एकमेव उद्देश असतो.
भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पीम ई ड्राईव्ह योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते. देशातील विद्युत प्रतिशतला प्रोत्साहन देणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करणे, हा उद्देश या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे.
शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत आहे. आता सरकारने अलीकडेच या योजना अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अनुदान मिळवण्यासाठी 40 दिवसांच्या कालावधी लागत होता, परंतु आता हा कालावधी फक्त पाच दिवसांचा लागणार आहे, तात्काळ अनुदान उपलब्ध होणार आहे.
नक्की काय आहे ? हि प्रक्रिया, कोणत्या वाहनांना किती अनुदान मिळणार ? त्यासाठी पात्रता काय असणार ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूयात. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. PM E Drive subsidy scheme
यंदाच्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री ‘ साथी ‘ पोर्टलवरून होणार | संपूर्ण माहिती |
पी एम ई ड्राईव्ह योजना नक्की काय आहे ?
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोहत्सान देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 सप्टेंबर 2024 रोजी ही योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती, तर ऑक्टोबर 2024 पासून योजना लागू झाली. या योजनेचा कार्यकाला 31 मार्च 2026 असणार आहे. दहा हजार नऊशे कोटी रुपयांच्या बजेटची योजना हि प्रामुख्याने इलेक्ट्रिक चार्ज असणारी तीन चाकी वाहने, दुचाकी, बस, ट्रक, रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 24.79 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3. 16 लाख तीन चाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान |
पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक पहिल्या वर्षी 10 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये ओला, एथर, टीव्हीएस आणि बजाज चेतक यासारखे लोकप्रिय ब्रान्ड योजना अंतर्गत येतात. PM E Drive subsidy scheme
कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ अनुदान आणि ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली | वाचा सविस्तर |
पी एम ई ड्राईव्ह योजनेचा असा घ्या लाभ |
- पीएम ई ड्राईव्ह योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम नागरिकांना पीएम पोर्टल वर जावे लागेल.
- त्यानंतर ई व्हाउचर साठी अर्ज करा.
- आता पात्र ईव्ही खरेदी करा.
- त्यानंतर ई व्हाउचर वर सही करा.
- यासोबतच डीलर सोबत पोर्टल अपलोड करा.
- या सर्व गोष्टींसाठी कठीण वाटत असल्यास, तुमचा दुचाकी डीलर ही सर्व काम करून देईल, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.