पीएम आवास योजना |
PM Awas Yojana news
PM Awas Yojana rural
नमस्कार, PM Awas Yojana news पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला केंद्र सरकारकडून राज्याला मोठे गिफ्ट देण्यात आलेले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाख 66 हजार घरी यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषिमंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले.
” किसान सन्मान दिवस 2024 ” निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
‘ नो डिटेन्शन पॉलिसी ‘ रद्द | आता इयत्ता 5 वी ते 8 वी तील विध्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर वरच्या वर्गात ढकल बंद |
महाराष्ट्रातील गरिबांसाठी 637089 घरे बांधली जाणार |
या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पीएम आवास योजनेच्या उद्देश पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्के गरे बांधण्यासाठी मदत करणे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आणखी पाच वर्षे म्हणजे मार्च 2019 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारने अंतिम मंजूर अर्थसंकल्पातून 2024 – 25 आर्थिक वर्षात महाराष्ट्रासाठी 6 लाख 37 हजार 79 घरांची तरतूद केली आहे. देशातील ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या वचनबध्तेच्या दिशेने एक पाऊल आहे. PM Awas Yojana news
लाडक्या बहिणींसाठी ” गुड न्यूज ” | डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू |
योजनेतील महत्वाचे बदल |
- पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पहिलं प्राधान्य दिले जात आहे. त्यासोबत कच्चे घर असणाऱ्यांना घर दिले जाते, पण त्यामध्ये जर अडीच एकरापेक्षा म्हणजे 2 हेक्टर पेक्षा जास्त शेती सिंचनाखाली असलेले शेतकरी या योजनेला अपात्र ठरत आहेत.
- त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार 2 एकर पेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तरी, या योजनेस संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहेत. तसेच 5 एकर म्हणजे दोन हेक्टर कोरवाड कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर ज्या लाभार्थ्याकडे फ्रिज, लँडलाईन फोन आणि दुचाकी आहे. अशा बेघर कुटुंबांना या योजनेतून लाभ दिला जात नव्हता, परंतु अशा लाभार्थ्यांना म्हणजे फ्रिज आहे, लँडलाईन फोन आणि दुचाकी अशा कुटुंबांनाही लाभ दिला जाणार आहे. PM Awas Yojana news
Pm Awas Yojana News | नवीन मार्गदर्शक तत्वे |
- जुन्या मार्गदर्शक तत्वानुसार फिशिंग बोट असणाऱ्यांना लाभ दिला जात नव्हता, आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार बोट असणाऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
- त्याचबरोबर महिलांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये दहा हजार रुपयावरती कमाई असणाऱ्या महिलांना ला पात्र होत्या, परंतु आत्ता दरमहा 15 हजार रुपये पगार असणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजनेसाठी एकूण 13 अटी आणि निकष होते, परंतु त्यातील तीन अटी शीतील करण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारने घरकुल बांधण्यासाठी साधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार नक्षलग्रस्त व डोंगराळ भागात 1 लाख 30 हजार प्रती लाभार्थी अर्थसहाय्यक देण्यात आलेल्या घेतला, त्याचवेळी या योजनेतील निकष बदल करण्यात येतील.
1 thought on “पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार | Pm Awas Yojana News | योजनेतील जाचक आटी कमी करण्यात आल्या |”