Online Ration Card | घरबसल्या काढा तुमचे नवीन रेशन कार्ड |
Online Ration Card |
मित्रांनो, शासनाकडून विविध कल्याणकारी योजना गोर-गरीब नागरिकांसाठी राबविल्या जातात. त्यामध्ये विविध योजनांचा समावेश होतो. त्यामध्ये मोफत अन्नधान्य योजना होय. त्यामुळे शासनाने प्रत्येक कुटुंबासाठी रेशन कार्ड दिलेले आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची अर्ज भरण्याची प्रोसेस सुरु आहे. त्यासाठी पात्र महिलेला अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड झेरोक्स आवश्यक आहे. ते एक महत्वाचे कागदपत्र आहे.
त्यामुळे प्रत्येक गरजू आणि गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रात याच रेशन कार्ड मार्फत गरीब व्यक्तींना अन्नधान्य तसेच विविध शासनाच्या योजनांचा पंतप्रधान गरीब कल्याण योजनांच्या अंतर्गत धान्य मिळवता येते. तसेच विविध शासकीय योजनांमध्ये अधिवास पुरावा म्हणून रेशन कार्ड मागितले जाते. त्यासाठी आज आपण रेशन कार्ड काढण्याची सोपी पद्धत जाणून घेऊ.
Online Ration Card | घरबसल्या मिळवा रेशन कार्ड |
अनेकदा शैक्षणिक कामासाठी तसेच सरकारी कामासाठी आपणाला उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. उत्पन्नाचा दाखला काढताना रेशन कार्ड विचारले जाते .तसेच महाविद्यालयात स्कॉलरशिप किंवा अन्य काही योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड विचारले जाते.
पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील ऑफिसच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या व एजंट लोकांना नाहक पैसे द्यावे लागत होते. मात्र आता या दोन्ही समस्यांपासून सुटका मिळणार असून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून नागरिकांना आता ऑनलाईन रेशन कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या मिळवू शकता.
Online Ration Card | रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता |
- Online Ration Card काढण्यासाठी अर्जदार व्यक्ती भारताची मूळ नागरिक असणे आवश्यक आहे.
- रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नावे टाकता येतात. जसे की, आई, वडील, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे यांची नावे समाविष्ट करता येतात. Online Ration Card |
- 18 वर्षानंतर प्रत्येक व्यक्ती वेगळ्या रेशन कार्ड साठी अर्ज करू शकते.
शासनाच्या इतर योजना –
Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद | नवीन होस्टेल, 3 कोटीच्या योजना आणि बरेच काही …..|
Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जाहीर | काय स्वस्त ? काय महाग ? महाराष्ट्रासाठी विशेष काय ? पहा सविस्तर माहिती |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |
Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |
घरबसल्या रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |
- विहित नमुन्यातील अर्ज
- रहिवासी बाबतचा पुरावा
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड चे झेरॉक्स
- मतदान कार्ड झेरॉक्स
- राहत्या घराची वीज बिलाची छायांकित प्रत
- स्वतःच्या घराचा उतारा किंवा कर पावती
- त्पन्नाचा दाखला Online Ration Card |
- अर्जदार भाड्याच्या घरात राहत असल्यास घर मालकाचे संमती पत्र
- तलाठी किंवा मंडळ अधिकारी चौकशी अहवाल
- राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक
- गॅस एजन्सीचा दाखला जर गॅस असेल
Online Ration Card | रेशन कार्ड काढण्यासाठी कसा करता येईल अर्ज ?
रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
Online Ration Card काढण्यासाठी लागणारे शुल्क |
शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करणाऱ्या व्यक्तीकडे रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठीचा शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत ठेवण्यात आला आहे. Online Ration Card |
Online Ration Card For Apply | रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत |
- www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.
- यासाठी जे काही कागदपत्रे लागतील ते तुम्हाला अर्जासोबत अपलोड करणे गरजेचे आहे.
- या कागदपत्रांमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, तसेच रहिवासी दाखला म्हणून ( सातबारा उतारा किंवा लाईट बिल),
- आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे), तुमच्या शेजारचे रेशन कार्ड झेरॉक्स द्यावे लागणार आहे.
- नंतर शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत.
- विचारलेली सर्व माहिती आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल.
- फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य ठरल्यास तुमचे रेशन कार्ड तयार होईल.
3 thoughts on “Online Ration Card | घरबसल्या काढा तुमचे नवीन रेशन कार्ड | आवश्यक कागदपत्रे, पात्रता व आटी | पहा सविस्तर माहिती |”