Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना मराठी |
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रानो, केंद्र व राज्य शासनामार्फत आपल्या देशात सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात असते. केंद्र व राज्य सरकार मार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना या देश हिताच्या व कल्याणकारी असतात. या योजनेच्या माध्यमातून देशातील गोरगरीब अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र रेषेखालील मागास व आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील लोकांसाठी या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाते.
योजना राबवण्यामागे सरकारचा या जनतेचा विकास करणे हाच महत्त्वाचे उद्देश असतो. देशातील प्रत्येक घटकाला या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यामध्ये कष्टकरी, कामगार वर्गापासून शेतकऱ्यापर्यंत तसेच लहान जन्मलेल्या बाळापासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना या योजनामध्ये समाविष्ट केलेले आहे.
ती योजना म्हणजे ” शौचालय अनुदान योजना “ होय. या योजने साठी केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्तपणे अनुदान शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 75% म्हणजेच 9000/- रुपये व राज्य सरकारचा वाटा 25% म्हणजेच 3000 रुपये असतो.
सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी असमर्थ ठरतात व त्यामुळे ते उघड्यावर शौचास बसतात किंवा सार्वजनिक शौचालय मध्ये शौचास जातात. त्यामुळे परिसरात घाण निर्माण होते. सर्वत्र दुर्गंधी पसरते व त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो हे सर्व टाळण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांच्या समस्यांचा विचार करून, त्यांची त्या समस्या पासून सुटका करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने व तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाला व राज्याला स्वच्छ बनवण्यासाठी तसेच नागरिकांना खुल्या जागेत शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | वाचकांना विनंती |
मित्रानो, शासनाच्या वेगवेगळ्या अनुदान योजनाची माहिती आपण रोजच घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण केंद्र व राज्य शासनाच्या शौचालय अनुदान योजना. या योजनेची माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील नागरिकांकडे जर वैयक्तिक शौचालय नसेल तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच तुम्ही हि या अनुदान योजनेच लाभ घ्या. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्यामुळे तेही या योजनेचा लाभ घेवू शकतील. हि विनंती.
योजनेचे नाव | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक ग्राम विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे |
लाभ | शौचालयासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | शौचालय बांधून गरीब कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
शासनाच्या इतर योजना –
Shabari Gharkul Yojana Maharashtra 2024 | Good News | शबरी घरकुल योजना मराठी |अर्ज सुरु |
Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | Good News | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी 2024 |
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजनेचा उद्देश |
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब व दुर्बल कुटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्याला स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्याच्या सवयींना आळा बसेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करून सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिक वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित होतील.
- आर्थिक दृष्ट्या गरीब व दुर्बल कुटुंबांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- तसेच या योजनेमुळे नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी कोणाकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासणार नाही, तसेच सावकाराकडून जास्त व्याजदरने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही, हा उद्देश ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील परिसर दुर्गंधीमुक्त व रोगराई पासून बचाव करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचे राहणीमान सुधारले.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |
- शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी तसेच अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबांना स्वतःची शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देश्याने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यात स्वच्छता ठेवून राज्य हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने शौचालय अनुदान योजनेची सुरुवात झाली.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अशा अर्जदारांना घरी बसून आपल्या मोबाईलच्या साह्याने अर्ज भरू शकणार आहेत. त्यामुळे कुठल्याच अर्जदाराला सरकारी कार्यालयाच्या हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेमुळे अर्जदाराच्या वेळ व पैसे दोघांची बचत होईल.
- शौचालय अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी अर्जदाराच्या बँक खाते डीबीटी च्या साह्याने जमा केली जाईल.
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल.
- या योजनेअंतर्गत जाती – धर्माची किंवा कोणत्याही प्रवर्गाची कोणतीच आट निर्धारित केली गेली नाही, त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजनेचे फायदे |
- महाराष्ट्र राज्यात शौचालय अनुदान योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास कुटुंबाना स्वताचे वैयक्तिक शैचालाय बांधण्यासाठी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- शौचालय अनुदान योजनेमुळे राज्यातील गावे स्वच्छ होवून रोगराई मुक्त होतील.
- या अनुदान योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना स्वताचे वैयक्तिक शैचालाय बांधण्यासाठी मदत होईल.
- या योजनेच्या लाभामुळे नागरिकांना उघड्यावर शैचास बसण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे परिसर दुर्गंधी मुक्त होईल.
- या योजनेमुळे नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिक स्वतंत्र व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होवून आजारांपासून मुक्तता होईल.
- या योजनेमुळे राज्यातील महिलांना उघड्यावर शैचास
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजनेचे लाभार्थी |
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- दारिद्रेशेखालील कुटुंबे
- अल्प भूधारक शेतकरी
- भूमिहीन असलेले घरकुल मजूर
- अपंग व दिव्यांग व्यक्ती असणारी कुटुंबे
- स्त्री प्रमुख असणारी कुटुंबे
- घरकुल योजनेचे लाभार्थी
- शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | या योजने अंतर्गत आवश्यक पात्रता |
- शौचालय अनुदान योजनेसाठी लाभार्थी असणारे कुटुंबे हि महाराष्ट्र राज्याचे मूळ राहिवाशी असावा.
- ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेसाठ पत्र असावे.
- सर्व जाती धर्माचे लोक या योजनेसाठी पात्र असतील.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय योजनेच्या नियम व आटी |
- शौचालय अनुदान योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- या योजनेचा लाभ फक्त राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील लाभार्थ्यांनाच दिला जाईल.
- ज्या कुटुंबामध्ये अगोदर शौचालय बांधले आहे अशा कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- केंद्र व राज्य शासनाच्या योजने अंतर्गत पूर्वी शौचालयाचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजने अंतर्गत त्या कुटुंबांनाच लाभ दिला जाईल, जे शौचालय बांधण्यासाठी इच्छुक आहेत.
- शौचालय अनुदान योजनेचा लाभ एका कुटुंबाला फक्त एकदाच दिला जाईल.
- सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शौचालय बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या देखभालीची जबाबदारी पूर्ण लाभार्थी कुटुंबाची असेल.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- शौचालय अनुदान योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- या योजनेतील अर्जदार व्यक्ती हि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
- या अर्जदार व्यक्तीने अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेतील लाभार्थ्याने या पूर्वी शौचालयाचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज रद्द होतो.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवाशी दाखला
- उत्पनाचा दाखला
- पूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
- mobail नंबर
- इमेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- आपणास प्रथम शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- नंतर आपणास स्वताचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल, त्यासाठी अर्जदाराला संपूर्ण माहिती टाकून submit वर click करावे लागेल.
- रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला login id व password टाकून sing in करावे.
- नंतर तुमचा जुना password बदलून नवीन password टाकावा.
- नंतर new application वर click करावे.
- आता तुमच्यापुढे अर्ज open होईल, त्यामध्ये सर्व माहिती भरून apply वर click करावे.
- अशाप्रकारे तुमचे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
1 thought on “NEW | Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना ऑनलाईन अर्ज | नोंदणी सुरु |”