New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |

Table of Contents

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी |

Kukut Palan Yojana Maharashtra 2024
Kukut Palan Yojana Marathi
maharashtra shasan yojana
pashusanvardhan vibhag maharashtra
krushi yojana 2024
kukut palan anudan yojana

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रांनो,  देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास करून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकर्य पासून शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
या योजनांसाठी शासनामार्फत निधी पुरविला जातो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर निधीचे वितरण करून शेतकरी, बांधकाम कामगार, घर कामगार, महिला, मुली, विधवा, जेष्ठ नागरिक व लहान बालके तसेच अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांचा समावेश वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासाठी हातभार लावला जातो.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनी साठी रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून व्यवसाय करता यावा, या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” कुक्कुट पालन अनुदान योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून कुक्कुट पालनासाठी राज्यातील नागरिकांना 75 टक्के अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन, कुकुट पालन तसेच पशुपालन यासारख्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असते. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांची सुरुवात करत असते. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना होईल.
बेरोजगार युवकांच्या हातांना काम देण्यासाठी कुक्कुटपालन योजना एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. राज्यातील बेकारीचे प्रमाण कमी करून लोकांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी पशुपालना बरोबरच कुकुट पालन व्यवसाय लाभाचा आहे. तसेच राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा, या उद्देशाने शासनाकडून राज्यात कुक्कुटपालन योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाकडून मांस व्यवसायासाठी बॉयलर कोंबड्या आणि अंडी उत्पादनासाठी लेअर्स कोंबड्या अशा दोन्ही प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी, या कुकूटपालन योजनेची सुरुवात करण्यात आली. यातून आपण आपल्या स्वतःचा कुकुट पालन व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवू शकतो.
या योजनेअंतर्गत बँक कर्ज व अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य नागरिकांना देते. त्यातून स्वतंत्र कामासाठी साधने उपलब्ध करून देणे, ही मदत राज्यातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी तसेच नोकरी नसलेले बेरोजगार तरुण, ग्रामीण भागातील महिला या लोकांना स्वतःचा कुक्कुटपालन फार्म सुरू करण्यास प्रोत्साहन देते. कुकुट पालन योजना मांस व अंडी उत्पादन वाढवते. त्यामुळे राज्याची अन्नसुरक्षा मजबूत होऊ शकते, तसेच काही क्षेत्रांमध्ये रोजगार वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळते.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, केंद्र व राज्य शासनांमार्फत ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण पाहत असतो. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे आज आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी शासनाच्या सुरू करण्यात आलेल्या एका योजनेची माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना होय

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, बेरोजगार तरुण व महिला असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे या नागरिकांना या योजनेचा फायदा घेता येईल, ही विनंती.

योजेनेचे नाव कुक्कुट पालन  अनुदान योजना 
योजनेची सुरुवातपशुसावर्धन विभाग , महाराष्ट्र
उद्देशकुक्कुट पालणासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे
लाभार्थीराज्यातील सर्व नागरिक
लाभ1 लाख 60 हजार रुपये अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

 

हे देखील वाचा –

Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |

New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |

New | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना | PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | 300 युनिट वीज मिळणार मोफत |

Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |

Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |

कुक्कुट पालन अनुदान योजनेची उद्दिष्ट्ये |

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, बचत गटातील महिला तसेच बेरोजगार युवक यांना स्वतःचा कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या कुकूटपालन योजनेसाठी 75 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम देऊन बेकारीचे प्रमाण कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकरी यांना शेती करताना जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता यावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या या जोडधंदाला चालना देऊन त्याचा विकास करणे.
  • राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून अन्नसुरक्षा मजबूत करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य होऊ शकतात.
  • लोकसंख्येला आवश्यक प्रथिनांचा साठ उपलब्ध करून दिल्याने या योजनेच्या माध्यमातून अन्नसुरक्षा मजबूत बनवली जाते.

कुक्कुट पालन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात कुक्कुटपालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तसेच जिल्हा परिषद अधिकारी कुक्कुटपालन योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतात.
  • कुकुट पालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारी अनुदानाची राशी लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा केली जाते.
  • शेती सोबत जोडधंदा सुरू करण्यासाठी तसेच बेरोजगारांना आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक उत्तम योजनेचा पर्याय आहे.
  • शासनाकडून या योजनेसाठी 75 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

कुक्कुट पालन अनुदान योजने अंतर्गत होणार्या खर्चाचा तपशील |

कुक्कुटपालन योजने अंतर्गत दिल्या जाणार्या 1000 मांसल कोंबड्यांचा खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे :

    तपशील लाभार्थी / शासन सहभाग एकूण अंदाजित रक्कम 
जमीनलाभार्थीस्वताची / भाडेतत्वावर घेतलेली
पक्षिगृह (1000 चौ.फूट)
स्टोअर रूम, पाण्याची टाकी,
निवासाची सोय,
विद्युतीकरण
लाभार्थी / शासन2 लाख
उपकरणे, खाद्याची / पाण्याची भांडी,
बुडणार इत्यादी
लाभार्थी25 हजार रुपये
एकूण2 लाख 25 हजार रुपये

 

  1.  वर दिलेल्या ताक्त्यामधील पक्शिगृह व इतर मुलभूत सुविधा उभारणी करता खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना प्रती युनिट 2,25,000/- रुपये प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के म्हणजे 1,12,500/- रुपये दिले जातात.
  2. अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 75% म्हणजेच 1,68,750/- रुपये अनुदान मंजूर केले जाते.
  3. या कुकुट पालन योजनेच्या प्रकल्पासाठी शासकीय अनुदान व्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना बाकी उर्वरित रक्कम 1,12,500/- रुपये व अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्याने 25% रक्कम म्हणजेच 56,250/- रुपये स्वत किंवा बँकेकडून कर्ज घेवून भरायची आहे.
  4. या लाभार्थ्याने बँकेकडून कर्ज घेतल्यास खुल्या प्रवर्गासाठी स्व हिस्सा 10 % व ४० % बँकेचे कर्ज तसेच अनुसूचित जाती – जमातीच्या लाभार्थ्यासाठी स्व हिस्सा 5 % व २० % बँकेचे कर्ज उभा करायचे असते.

 

कुक्कुट पालन अनुदान योजने अंतर्गत दिल्या जाणार्या पक्षांच्या जाती |

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात सुरु करण्यात आलेल्या कुक्कुटपालन योजने अंतर्गत 75% अनुदान दिले जाते. त्याच बरोबर शासनाकडून वेगवेगळ्या पक्षांच्या जाती सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे :

  1. आय आय आर
  2. ब्लॅक ऑस्ट्रेलिया
  3. गिरीराज
  4. वनराज
  5. कडकनाथ जातीचे पक्षी

कुक्कुट पालन अनुदान योजनेअंतर्गत दिला जाणारा प्राधान्यक्रम |

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • भूमी शेतकरी
  • मागासवर्गीय
  • अल्प व अत्यल्प भूधारक
  • बेरोजगार तरुण
  • बचत गटातील महिला

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुट पालन अनुदान योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या कुक्कुटपालन योजनेसाठी राज्यातील सर्व कुक्कुटपालन इच्छुक नागरिक लाभार्थी आहेत.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुट पालन अनुदान योजनेचे फायदे |

  • शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून राज्यात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • या योजनेच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने रोजगार उपलब्ध होईल, त्यातून बेकारीची, बेरोजगारीची समस्या कमी होईल.
  • नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत मिळेल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
  • ज्या नागरिकांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
  • शेतकरी आपला जोडधंदा असणार्या कुक्कुटपालन योजनेतून मांस व अंडी विक्री करून आर्थिक नफा कमवू शकतात.
  • जे लोक दारिद्र रेषेखालील आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  • राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल.
  • कुक्कुटपालन योजनेमुळे अन्नसुरक्षा  जोपासली जाण्यास मदत होईल.
  • दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मांस व अंड्यांच्या किमती आवाक्यात येतील.
  • कुकुट पालन योजनेमुळे राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळेल.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुट पालन योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड |

महाराष्ट्र शासनाच्या कुक्कुटपालन योजनेसाठी सर्वसामान्य प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांची निवड ही पुढील प्रमाणे करण्यात येते:

  • अत्यल्प भूधारक शेतकरी ( एक हेक्टर पर्यंत शेती असणारे )
  • अल्पभूधारक शेतकरी ( एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असणारे )
  • सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी ( स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी केली आहे ते.)
  • बचत गटातील महिला किंवा वैयक्तिक लाभार्थी महिला

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुट पालन योजनेअंतर्गत पात्रता |

महाराष्ट्र राज्यातील कुक्कुटपालन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे आटी व नियम |

  • कुकुट पालन योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशांना दिला जाईल.
  • राज्यबाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • कुकुट पालन योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच सदस्य व्यक्तीला दिला जाईल.
  • या योजनेच्या अर्जदार व्यक्तीने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत कुक्कुटपालनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतला असल्यास, त्या लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  • या योजनेअंतर्गत आलेल्या अर्जाची मर्यादा ही चालू आर्थिक वर्षाच्या तरतुदी पुरती मर्यादित राहील, पुढील वर्षासाठी हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • या योजनेअंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर 30 ते 45 दिवसाच्या कालावधी मध्ये जे अर्ज येतील, त्यांचा विचार केला जाईल. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम झाल्यास ती लाभार्थ्याला स्वतः भरावयाचे आहे.
  • एक दिवसांच्या तलंगा व पिल्ल्यांचा गट वाटप करताना राणीखेत, मरेक्स, आरडी व देवीवरील रोगांचे लसीकरण स्वतः लाभार्थ्यांनी करून घ्यावयाचे आहे.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पिल्लांच्या कोंबड्यांच्या वाहतुकीचा खर्च, औषध पाण्याचा, खाण्यापिण्याचा, भांडी उपकरणांचा खर्च स्वतः लाभार्थ्यास करावयाचा आहे.
  • या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास पुढील पाच वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | कुक्कुटपालनाचा अनुदान योजन आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • शपथपत्र.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम अर्जदाराला आपला जिल्हा कार्यालयातील पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
  • या विभागातून अर्जदारस कुक्कुटपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • हा अर्ज व्यवस्थित वाचून योग्य व अचूक भरावा.
  • भरलेल्या अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज पशुसंवर्धन कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जमा करावा.
  • जमा केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
  • अशाप्रकारे तुमची कुकूटपालन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 |

कुक्कुट पालन अनुदान योजना शासन GR CLICK HERE

1 thought on “New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |”

Leave a Comment