प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना |
Mulching paper anudan Yojana
Mulching anudan scheme
Mulching 50% anudan
Krushi Yojana
Anudan scheme for government
नमस्कार, Mulching paper anudan Yojana शेती हा ग्रामीण महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे शेती पद्धतीमध्ये आता मोठमोठे बदल होत आहेत. आधुनिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आता उत्पादन वाढीसह शेती फायद्याची होत आहे.
कमी पाऊसमान, पाण्याची कमतरता आणि नैसर्गिक अडचणी त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर मात करून शेती करणे, हे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान ठरते. अशावेळी शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर हा एक अतिशय उत्तम पर्याय शेतीसाठी मानला जातो.
राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक पेपर साठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. अनुदान योजनेच्या माध्यमातून फळझाडांना, पालेभाज्या यांना मल्चिंग पेपर वापरण्यात येते. त्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
मल्चिंगचा वापर केल्याने जमिनीमधील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊन, पिकांमध्ये तणाची वाढ कमी होण्यास मदत होते. अशा या मल्चिंग पेपरच्या अनुदान प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Mulching paper anudan Yojana
नवीन आधार कार्ड सेंटर सुरू करायचे आहे ? काय आहे आवश्यक पात्रता ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
मल्चिंग पेपर वापराचे फायदे |
- भाजीपाला, फळ बाग तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी आच्छादन म्हणून मल्चिंग पेपरचा वापर केला जातो.
- मल्चिंग पेपरच्या वापराने शेतात तणांची वाढ होत नाही, त्यामुळे कीटकनाशकांचा प्रभाव कमी होतो.
- तसेच तन काढण्याच्या खर्चा हे कमी होतो.
- शिवाय मल्चिंग पेपरच्या वापराने पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे जमीन जास्त दिवस ओलावा टिकवून ठेवते.
Mulching Paper Anudan Yojana | अनुदान प्रमाण |
- अनुदान हे सर्वसाधारण प्रती हेक्टर 32 हजार रुपये असून, या खर्चाच्या 50% म्हणजे जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते. Mulching paper anudan Yojana
- जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रती हेक्टरी 36 हजार रुपये खर्च असून त्याच्या 50 टक्के म्हणजे 18 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेसाठी अनुदान देणे बंधनकारक आहे.
Apaar ID card 2024 | आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड | कसे काढावे अपार कार्ड ? वाचा सविस्तर |
मल्चिंग पेपरचे लाभार्थी |
- शेतकरी
- बचत गट
- शेतकरी समूह
- शेतकरी उत्पादक कंपनी
- सहकारी संस्था
हे सर्व अनुदानास पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- आधार संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
Mulching Paper Anudan Yojana | अर्ज करण्याची पद्धत |
- सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
- त्यानंतर नोंदणी करताना तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर ‘ फलोत्पादन ‘ या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करून, त्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर हा पर्याय शोधून त्याचे निवड करा.
- त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावरती मल्चिंग हवा आहे, तो क्षेत्र टाकून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल, तर त्यामध्ये प्राधान्य निवडा. प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा.
- तुम्ही जर या घटकाअंतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल, तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतकी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल.