mukhyamntri ladki bahin yojana | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना |
mukhyamntri ladki bahin yojana |
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने तसेच महायुती सरकारने विधानसभेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवक, वारकरी तसेच अल्पसंख्यांक या सर्वांसाठी घोषणा केल्या.
याच अर्थसंकल्पामध्ये सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “होय. या योजने अंतर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ही योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. त्यानंतर अनेक त्रुटी या योजनेमध्ये आढळून आल्यानंतर नव्या बदलांसह योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपं झालेला आहे.
परंतु अद्यापही अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाही. अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही. तर काही महिलांकडे जन्माचा दाखला नसल्याने अर्ज करता आले नाहीत. पण त्यासाठी शासनाने या योजनेसाठीची मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे जमा करून झटपट या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
पण या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर या योजनेचे पहिला हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जाहीर होणार आहे. हे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या त्यांच्या ” संवाद लाडक्या बहिणीशी ” या कार्यक्रमामध्ये, भाषणामध्ये सांगितले आहे.
mukhyamntri ladki bahin yojana | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना सुरू करून बरेच दिवस झाले. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढ ही करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी राज्यातील बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी गर्दी करून आपला अर्ज भरलेला आहे.
तरीसुद्धा काही महिलांनी या योजनेसाठी अजून अर्ज भरलेला नाही. तर ज्यांनी अर्ज भरला आहे, त्या महिलांना या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार. याची आशा लागलेली आहे. तसेच ज्यांना अर्ज भारता आलेला नाही, त्यांच्यासाठी या योजनांमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत ? या सर्वांबद्दलची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेक शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसराततील जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लेख शेअर करा, ही विनंती.
शासनच्या इतर योजना –
बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र | MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | 100 % अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज |
Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |
New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?
New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |
mukhyamntri ladki bahin yojana | अर्ज करण्यासाठी मुदत वाढ कधीपर्यंत ?
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी राहिलेल्या महिलांना चिंता करण्याचे कारण नाही. कारण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुद्दत वाढ देण्यात आलेले आहे. योजनेसाठी पात्र असणार्या 21 ते 65 वर्ष वायोगटातील महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार ?
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम महिला वर्गांना एकच आशा लागून राहिले होती. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार ? तर महिलांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आज या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. काल अजित पवार यांनी संवाद लाडक्या बहिणीशी या कार्यक्रमांमध्ये या योजनेचा पहिल्या हप्ता कधी जमा होणार याची घोषणा केलेली आहे.
तर महिलांनो मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता येत्या राखी पौर्णिमेला म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. जुलै – ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 हजार जमा होणार आहेत. हे राज्य शासनाकडून, मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी राखी पौर्णिमेनिमित्त एक खास भेट म्हणून देण्यात येणार आहे.
mukhyamntri ladki bahin yojana | या योजनेच्या आटी -नियम यामध्ये झालेले बदल |
- आधिवास प्रमाणपत्र ऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी कार्ड रेशन कार्ड असेल, तर त्यांना उत्पन्न दाखला देण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेले आहे.
- या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे.
- तसेच लाभार्थी महिलेचे वय 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वायोवर्ष करण्यात आलेले आहे.
mukhyamntri ladki bahin yojana | लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता |
- लाडकी बहिण योजनेतील अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- तसेच अर्जदार महिला विवाहित, विधवा, घटस्फोटीत अथवा निराधार महिला असावी.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- योजनेचा अर्ज
- 2 फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
mukhyamntri ladki bahin yojana | लाडकी बहिण योजनेचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल द्वारे भरले जाऊ शकतात. तसेच या योजनेचा अर्ज सेतू सुविधा केंद्रामध्ये हि भरले जावू शकतात.
mukhyamntri ladki bahin yojana |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज pdf download click here
2 thoughts on “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |”