मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना |
Mini tractor subsidy scheme
Tractor subsidy scheme for government
Mini tractor Yojana Maharashtra
Mini tractor
Tractor anudan Yojana
नमस्कार, Mini tractor subsidy scheme महाराष्ट्र शासनाकडून समाजातील विविध घटकांसाठी विशेषता, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून विशेष ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जात आहे.
महाराष्ट्र शासनाकडून या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने दिली जातात.
या योजनेच्या माध्यमातून स्वंय सहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील नांदेड या जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यात चे आव्हान करण्यात आले आहे. अर्ज कसा करायचा ? आवश्यक कागदपत्रे कोण – कोणती लागणार आहेत ? अटी, नियम काय असणार आहेत ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एक रुपयात पिक विमा बंद ? योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी ” या ” निर्णयावर कृषिमंत्री स्पष्टच म्हणाले |
मिनी ट्रॅक्टर योजनेची उद्दिष्टे |
महाराष्ट्र शासन निर्णय 2017 नुसार राज्यात असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयं सहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही 90 टक्के अनुदानावर दिली जातात. यामध्ये प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये मान्य करून ती 3 लाख 15 हजार रुपये अनुदान मिळते, हे तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान बचत गटांना दिले जाते.
उर्वरित 10 टक्के रक्कम हे संबंधित बचत गटांना भरावी लागणार आहे. त्यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवहान नांदेड जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. Mini tractor subsidy scheme
Mini Tractor Subsidy Scheme | अटी आणि शर्ती |
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
- ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर रुपये 3 लाख 15 हजार शासकीय अनुदान अनुदान राहील.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटाची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
- बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना | कोणाला मिळणार लाभ ? सविस्तर माहिती |
अर्ज कसा करावा ?
- मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या बचत गटांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी समाज कल्याण च्या वेबसाईटवर आपला अर्ज सादर करायचा आहे.
- नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांना फक्त 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येईल याची नोंद घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सदर अर्जाची एक झेरॉक्स प्रत आणि अर्ज सादर करताना जोडलेल्या आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. Mini tractor subsidy scheme