Milk Subsidy 2024 | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | दूध अनुदानात झाली मोठी वाढ | पहा सविस्तर माहिती |

                  Milk Subsidy 2024 | दुध अनुदानात वाढ |

Milk Subsidy 2024
Milk subsidy scheme
Dudh anudan Yojana Maharashtra
Farmers scheme in Maharashtra
Today's milk rate in Marathi

Milk Subsidy 2024
Milk subsidy scheme
Dudh anudan Yojana Maharashtra
Farmers scheme in Maharashtra
Today’s milk rate in Marathi

नमस्कार शेतकरी बांधवांनो, Milk Subsidy 2024 राज्यातील शेतकरी तसेच दूध उत्पादकांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधाकरता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानात 1  ऑक्टोबर पासून 2 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातला शासन निर्णय झालेला आहे.

त्यामुळे राज्यातील लाखो दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जे बरेच दिवसापासून दूध दरवाढीच्या प्रतीक्षेत होते, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दूध भुकटी आणि बटरचे दर कोसळल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव देण्याच्या हेतूने सरकार मार्फत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. Milk Subsidy 2024

त्यानुसार सरकारने निर्णय घेतलेला असून, आत्ता सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 fat आणि ८.५ SNF असणार्या दुधास प्रति लिटर किमान 28 रुपये प्रति लिटर दर 1 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ? 

दूध अनुदानामध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय |

Milk Subsidy 2024  राज्यांमध्ये काही महिन्या अगोदर सर्व खाजगी व सहकारी दूध संघांना तसेच शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. सदर दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येत होते. परंतु आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना दूध अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या दूध उत्पादकांना शासनामार्फत प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या दूध उत्पादकांना अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. Milk Subsidy 2024

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव इथून पुढे दिल्या जाणार आहे. ही योजना एक ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात येईल. पण या योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल, या योजनेसाठी शासनाकडून 965 कोटी 24 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |

शेतकऱ्याऐवजी दूध संघांनाच होणार फायदा |

राज्य सरकारच्या दोन जुलै च्या शासन निर्णयानुसार सरकारी व खाजगी दुध संघाने दूध उत्पादकांना 30 रुपये प्रतिलिटर दर दिला, तर त्यावर राज्य सरकार दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देत होतो.

त्यामुळे 35 रुपये प्रतिलिटर दुध दर उत्पादक शेतकर्यांना मिळू शकत होता. परंतु आता मात्र दूध संघाने 28 रुपये दर दिला, तर त्यावर 7  रुपये अनुदान राज्य सरकार देणार आहे, म्हणजेच 28 +7  रुपये असे एकूण 35 रुपये प्रति लिटर दराने दूध उत्पादकांना दर मिळणार असल्याचे शासन निर्णय स्पष्ट झालेले आहे.

26 सप्टेंबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार वाढ केली जात असल्याचे बोलले जात आहे. सरकार दूध उत्पादका सोबत नसून दूध संघांच्या भल्यासाठी असल्याचे टीका दुध उत्पादकांकडून केली जात आहे. Milk Subsidy 2024

महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवी योजना सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment