एसटी प्रवास महागला | महिलांना 50 % सवलत मिळणार की नाही ? Mahila Sanman Yojana | स्पष्टच बोलले परिवहन मंत्री …..|

                                 महिला सन्मान योजना |

Mahila Sanman Yojana
ST Bus scheme Maharashtra
Mahila Sanman Yojana Maharashtra government
MSRTC
ST bus scheme for ladies

Mahila Sanman Yojana
ST Bus scheme Maharashtra
Mahila Sanman Yojana Maharashtra government
MSRTC
ST bus scheme for ladies

 

नमस्कार, Mahila Sanman Yojana राज्य शासनाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर सुरू केलेला लाडके बहिण योजनेत अंतर्गत आलेले अर्जांची छाननी सुरू केली आहे व त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता राज्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना एसटी प्रवासात महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 50 टक्के सवलती बाबत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात 24 जानेवारीपासून जवळपास 15 टक्क्यांनी एसटी प्रवास हा महागलेला आहे. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांची देताना उत्तरे देताना त्यांनी 50% सवलती बाबत काय म्हटले आहे ? ही योजना सुरू राहणार की नाही ? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान | ” या ” जिल्ह्यात अर्ज करण्यास झाली सुरुवात | पहा अंतिम तारीख |

राज्य परिवहन मंत्री म्हणाले….|

गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि ए डी जी यांच्यात प्राधानीकरणाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या रखडलेल्या भाडेवाढी बाबत निर्णय घेतला. त्यानुसार बैठकीत 14.95 टक्क्याने एसटी तिकीट दरात भाडेवाढ केली.

त्याचबरोबर 1 फेब्रुवारी पासून रिक्षावर टॅक्सीची भाडे वाढ होणार आहे. मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतरित्या याबाबतची फाईल आलेली नाही, मात्र ती येईल असे वाटते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. Mahila Sanman Yojana

एसटीची भाडेवाढ दरवर्षी करण गरजेचे आहे. प्रवाशांना सुखसुई देत असताना डिझेल, सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एसटी महामंडळाची परिस्थिती बघितली, तर दरवर्षी सुमारे 3 तर दर महिन्याला 90 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे भाडेवाढी शिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे, असे परिवहन मंत्री म्हणाले.

रेल्वे ग्रुप ‘ डी ‘ पदांसाठी मेगा भरती | 32,000/- हाजार पदांची होणार भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |

महिला सन्मान योजनेबाबत |

माध्यमांशी संवाद साधताना महिला सन्मान योजनेबाबत परिवहन मंत्री म्हणाले, ” आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरू केले आहेत, त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50% सूट ही कायम राहील. या सवलतीमुळेच एसटीचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे कोणतीही योजनेत कटोती होणार नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.” Mahila Sanman Yojana

प्रवाशांकडून नाराजी |

एसटी तिकीट दर वाढ झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या भाडेवाडीमुळे प्रवाशांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे. एका बाजूला दरवाढ केली जात आहे, मात्र सुविधांच्या नावाने बोंबा असल्याचे प्रवाशांकडून म्हटले जात आहे. भाडेवाडीनुसार प्रवाशांना सुविधा द्या, तसेच सुस्थितीत असलेल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

एक रुपयात पिक विमा बंद ?  योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी ” या ” निर्णयावर कृषिमंत्री स्पष्टच म्हणाले |

Leave a Comment