महालक्ष्मी योजना महाराष्ट्र |
Mahavikas aghadi jahirnama 2024
Mahalaxmi Yojana Maharashtra
Mahalaxmi scheme for women
Jahirnama for mahavikas aghadi
New scheme for ladies
नमस्कार, Mahavikas aghadi jahirnama 2024 सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अनेक पक्षाकडून अनेक आश्वासने दिली जात आहेत. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर प्रत्येक पक्षाकडून महिलांसाठी विविध योजनांचे घोषणा होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने आपला जाहीरनामा नुकताच घोषित केला, त्या जाहीरनाम्यात एक महत्त्वकांक्षी योजना आणणार असल्याची घोषणा केली. या महाविकास आघाडीच्या घोषणेनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
महाराष्ट्रातील सरसकट महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत दर महिना 3000 रुपये दिले जातील. त्यासोबतच महाविकास आघाडीने महिलांसाठी अनेक फायदेशीर ठरणाऱ्या योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत.
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला पाहून त्याच धर्तीवर महाविकास आघाडी सरकारने महिलांना केंद्रबिंदू मानून अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. त्या योजना कोण – कोणत्या असणार आहेत ? ते आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Mahavikas aghadi jahirnama 2024
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना मिळणार लाभ |
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या 5 घोषणा |
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी सरकारने म्हणजेच राहुल गांधी यांनी स्वतः जाहीरनाम्यातील महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. त्यांनी ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर या जाहीरनाम्यामध्ये महिलांना उद्देशून अनेक महत्वपूर्ण अशा फायदेशीर योजनांची घोषणा केलेली आहे. त्या घोषणा पुढील प्रमाणे : Mahavikas aghadi jahirnama 2024
- महाराष्ट्रात जन्माला आलेला प्रत्येक मुलीला त्या मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर एक लाख रुपये देणार.
- राज्यातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार.
- राज्यातील महिलांना घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वर्षाला सहा, ते पण फक्त पाचशे रुपयात देणार.
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा मंजूर केली जाणार. Mahavikas aghadi jahirnama 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | मिळणार 100 % अनुदान | संपूर्ण माहिती |
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचलेली आहे. यातच महाविकास आघाडी सरकारकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, शेतकरी, तरुण वर्ग, आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे हि आश्वासन दिले आहे. याचबरोबर अनेक अशा महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा महाविकास आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात केलेली आहे.