Mahabhunakasha Maharashtra 2024 | जमिनीचा नकाशा |
MAHAbhunakasha Maharashtra 2024
Mahabhunakasha Marathi
Bhunakasha Online
How to apply for MAHAbhunakasha Maharashtra
Online Mahabhu nakasha Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेजारील शेत जमिनीचा गट नंबर कोणता आहे ? हे माहीत नसते. तसेच आपल्या नकाशा कसा असेल ? हे त्यांना माहित नसते. पण जर आपल्याकडे नकाशा असेल, तर काही मिनिटांमध्ये आपण आपल्याला सर्व माहिती मिळेल.
खूप थोड्या वेळामध्ये आपल्याला जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी मिळतो. जमिनीचा नकाशा मोबाईल वरून कसा काढायचा ? download कसा करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
भू नकाशा महाराष्ट्र |
आपल्या जमिनीचा नकाशा, भु नकाशा महाराष्ट्र आपल्या मोबाईल वरून काढू शकतो. यासाठी नकाशा काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही. तसेच तहसील कार्यालयांमध्ये रांगाही लावलं लावावे लागणार नाहीत.
घरबसल्या मोबाईल वरून अगदी काही मिनिटांमध्ये आपण पीडीएफ मध्ये हा नकाशा काढू शकता. शासनाचे नकाशा पाहण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध आहे.
त्या संकेतस्थळावरून आपण घरबसल्या कोणत्याही गावातील जमिनीचा नकाशा काही मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल वरती पाहू शकता. MAHAbhunakasha Maharashtra 2024
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जमिनी संबंधित सर्व सेवा ऑनलाईन केलेले आहेत. ज्यामध्ये जमिनीचा फेरफार, उतारा, भूमी अभिलेख, फेरफार ,जुने फेरफार, नवे सातबारा, ई – पिक पाहणी चावडी, जमीन महसूल भरणा अशा अनेक सुविधा ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरीक या सुविधांचा लाभ आपल्या मोबाईलवरून घेऊ शकतो.
Nuksan Bharpai 2024 | 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार | शासनाकडून निधी मंजूर | पात्र शेतकऱ्यांची यादी आली |
जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ?
जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आपल्याला गट नंबर माहित असणे आवश्यक आहे. आपण खाली स्टेप फॉलो करून आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईल वरती पाहू शकता :
- सर्वप्रथम मोबाईल मध्ये आपल्याला क्रोम ओपन करून, त्यामध्ये mahabhunakasha\mahabhumi.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- किंवा पण गुगल सर्च मध्ये महाभूनाकाषा असे टाईप करून सर्च करू शकता.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर पुढील माहिती दिसेल.
- महाभूनाकाशा दिसते, त्यावर क्लिक करावे. नंतर तुम्हाला आपले राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडावे.
- त्यानंतर सर्च प्लॉट नंबर खाली बॉक्समध्ये आपल्याला गट नंबर टाकावा. त्या समोरील सर्च बटनावर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर आपल्या गटाचा नकाशा आपल्याला मोबाईल वरती पाहायला मिळेल.
- नकाशा पाहण्यासाठी पुन्हा होम समोरील तीन देशावरती क्लिक करावे, आपल्या गटाचा नकाशा पाहायला.
- नकाशा मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी मॅप रिपोर्ट वरती क्लिक करावे लागेल.
- आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर आपला नकाशा मोबाईल मध्ये सेव होईल. MAHAbhunakasha Maharashtra 2024
Free Gas Cylinder Scheme | 3 मोफत गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी अशी करा, या तारखेपूर्वी ई – केवायसी | नाहीतर मिळणार नाही अन्नपूर्णा योजनेचा लाभ |
आपल्या जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?
मित्रांनो, आपण आपला गटाचा नकाशा मोबाईल वरती काही मिनिटांमध्ये पाहू शकतो. आता शेतकऱ्यांना घरबसल्या सातबारा येणार आहेत, शासनाने शेतकऱ्यांसाठी हक्क प्रणाली तयार केलेली आहे.
या हक्क प्रणाली द्वारे नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा मधील बदल करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी तलाठी कार्यालय जाण्याची गरज नाही. MAHAbhunakasha Maharashtra 2024
आता शासनाने महसूल खात्याची सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी नवीन पोर्टल विकसित केले आहे. नवीन संकेतस्थळा द्वारे विविध सेवांचा लाभ मिळणार आहे. उदाहरणार्थ शेतीचा नकाशा पाहणे, सातबारा, आठ अ, फेरफार, मिळकत प्रमाणपत्र, ई रेकॉर्ड, ई जमीन मोजणी अशा विविध योजना या पोर्टल वरती उपलब्ध आहेत.
1 thought on “आपल्या मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहू शकता | Mahabhunakasha Maharashtra 2024 | अगदी थोड्या कालावधीत |”