महाडीबीटी फवारणी पंप योजना
Maha DBT Favarni Pump Yojana
Favarni Pump Yojana Maharashtra
Favarni Pump subsidy scheme
Krushi Favarni Pump
Favarni Yantr subsidy scheme for government
नमस्कार, Maha DBT Favarni Pump Yojana राज्यातील शेतकऱ्याची शेती उत्पादनत वाढ व्हावी व त्यांच्या उत्पादन क्षमता वाढून आर्थिक नफा मिळावा, या साठी शासनामार्फत महाडीबीटी अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात, या कृषी योजना साठी आर्थिक अनुदान पुरवले जाते.
महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योजना, मोफत बी- बियाणे योजना, फवारणी पंप योजना अशा अनेक कृषी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ला राबवली जाणार आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मनुष्य चलित फवारणी पंप अनुदान योजना.
राज्यातील कृषी विभागाच्या महा डीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कामासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप देण्यात येणार आहे, तसेच मनुष्चालीत फवारणी पंप, सोलार वर चालणारा फवारणी पंप देण्यात येणार आहे.
याबद्दल पण महाडीबीटी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूप अशा योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजनेचा शेतकऱ्याने फायदा घेटलेला आहे. या फवारणी पंपाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय असणार आहे ? आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
प्लास्टिक मल्चिंग साठी मिळणार 50 % अनुदान | अर्ज कोठे करायचा | पात्रता, कागदपत्रे ,संपूर्ण माहिती |
फवारणी पंप योजनेची उद्दिष्ट्ये |
- शेतकऱ्यांना शेतीसाठी सहाय्यभूत असणारी यांत्रिक साधने अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- अनुदान देऊन शेतकऱ्याच्या वर असणारा आर्थिक भर कमी करून त्याचे उत्पन्न वाढत हातभार लावणे.
फवारणी यंत्राचे फायदे |
- महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणीसाठी पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा पंप खरेदी करता येणार आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांना इतरांकडून पंप भाड्याने किंवा तात्पुरता घ्यावा लागणार नाही.
- फवारणी पंपाच्या वापराने शेतकऱ्याचे काम अतिशय जलद गतीने व कमी वेळेत होणार आहे.
- फवारणी पाम्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतात योग्य वेळी फवारणी झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीत वाढ होणार आहे.
- शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर या सारख्या विविध पिकावर सहज फवारणी करता येणार आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती | अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याच्या पिकाची माहिती
- सातबारा उतारा
- आठ अ उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- अपंग प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- हामीपत्र Maha DBT Favarni Pump Yojana
Maha DBT Favarni Pump Yojana | अर्ज करण्याची प्रक्रिया |
- सर्वात प्रथम अर्जदाराला महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- महाडीबीटी पोर्टल वर युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य पेज ओपन होईल, त्यावरील कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करा.
- कृषी विभाग पर्याय केल्यानंतर योजनेच्या पर्यायांमध्ये कृषी यांत्रिकरण हा पर्याय निवडून घ्या.
- त्यानंतर ‘ मनुष्यचलित अवजारे ‘ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यातील फवारणी पंप अनुदान हा पर्याय निवडा.
- नंतर सर्व माहिती भरून आपला अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत अपलोड करा.
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज जतन करा. Maha DBT Favarni Pump Yojana