गॅस अनुदान इ – केवायसी |
LPG gas cylinder E – KYC
Mukhymantri annpurna Yojana
LPG gas cylinder
E -kyc annpurna Yojana
Gas subsidy scheme
नमस्कार, LPG gas cylinder E – KYC महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी पात्र असणाऱ्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन GR नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याची अनुसार गॅस जोडणी महिलांच्या नावावर असेल, तरच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तसेच ही गॅस जोडणी पुरुषाच्या नावावर असेल, तर ती महिलांच्या नावावर करून घेण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना कुटुंबांना गॅस एजन्सी संपर्क साधून लवकरात लवकर आपली इकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. नाहीतर या योजनेअंतर्गत दिली जाणारी sabsidy रद्द करण्यात येईल. त्यासाठी ही केवायसी कशी करावी ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
गॅस सिलेंडर इ केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |
- गॅस कनेक्शन धारकाचे आधार कार्ड
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट सिईझ फोटो
- गॅस जोडणी पुस्तक
आशी करा ऑनलाईन ई के वाय सी |
- ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी प्रथम आपणाला माय भारत गॅस च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- तिथे होमपेजवर केवायसी आहे का तपासण्यासाठी एक लिंक आहे, त्यावर क्लिक करावे.
- यानंतर एक पेज ओपन होईल, त्यावर केवायसी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.
- केवायसी साठी पीडीएफ फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा आणि प्रिंट कारा.
- त्यानंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या संबंधित गॅस एजन्सीला भेट द्या. फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा.
- अशा प्रकारे तुमची ऑनलाईन गॅस सिलेंडर केवायसी पूर्ण होईल. LPG gas cylinder E – KYC
उद्योगिनी योजने अंतर्गत मिळणार 3 लाख रु. चे बिनव्याजी कर्ज | कोणाला मिळणार लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |
अशी करा ऑफलाईन गॅस सिलेंडर केवायसी |
- ऑफलाइन केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस वितरण एजन्सी मध्ये जावे लागेल.
- तिथे तुम्हाला केवायसी करायची असल्यास फॉर्म घ्यावा लागेल.
- त्यानंतर तुमची फिंगरप्रिंट स्कॅन केली जाईल, तसेच चेहरा स्कॅनिंग पूर्ण होईल.
- त्यानंतर तुम्ही सोबत नेलेली कागदपत्रे बरोबर आढळल्यास इ – केवायसी पूर्ण होईल.
- हे केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक एसएमएस प्राप्त होईल. LPG gas cylinder E – KYC