मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अपडेट |
Ladki bahin Yojana Letest Update
Ladki bahin Yojana band
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana 6th installment
नमस्कार, Ladki bahin Yojana Letest Update राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरू आहे. 15 ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या आहेत. या आचारसंहितेमुळे राज्यातील सरकारी कामांवर अंकुश लागतो.
तसेच आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या आहेत.
त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून माझी बहीण लाडकी योजनेसाठी लागणाऱ्या निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत.
दरम्यान राज्य सरकारने या योजनेअंतर्गत देण्यात येणारा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच दिले आहेत. मात्र सध्या राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार ? अशी चर्चा सुरू झालेली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर 19 ऑक्टोबर पासून ही योजना बंद झाल्याची अफवा पसरली आहे. Ladki bahin Yojana Letest Update
मात्र त्यानंतर या अफवेवर महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
बांधकाम कामगार नवीन नोंदणी, लाभ मिळणे बंद ? कारण काय ? जाणून घ्या, संपूर्ण माहिती |
लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज |
राज्यात लाडकी बहीण योजना बंद ? Ladki bahin Yojana Letest Update या अफवेला उत्तर देताना नुकतेच सोशल मीडिया प्लॉट फॉर्म X वर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अपडेट शेअर केले आहे. त्यामध्ये आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ? ते जाणून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावनि जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दर महिन्याला 1500 हजार रुपये, त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी चा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केलेला आहे.
चार ते सहा ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ राज्यातील दोन कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आलेला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता – भगिनींनी बळी पडू नये. ही नम्र विनंती अदिती तटकरे यांनी केली.
मतदान ओळखपत्र वरील फोटो आवडला नाही ? तर तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या करू शकता नवीन फोटो अपडेट |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माता भगिनींना आवाहन |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य तटकरे यांची पोस्ट शेअर करत, या योजनेबद्दल मोठे विधान केले आहे. राज्यातील महिलांनी भुलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. Ladki bahin Yojana Letest Update
या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, माय माऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या बोलण्याला बळी पडू नये. अशी पोस्ट अजित पवार यांनी सोशल मीडिया पोर्टल X वर केली आहे.