Ladki Bahin Yojana 3rd Installment |
Ladki bahin Yojana 3rd installment
Ladki bahin Yojana Maharashtra
Bank Seeding process for ladki bahin Yojana
Apply online for Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana 3ra Hapta
नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचे अर्ज प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू झाली.
त्यामुळे राज्यातील अनेक महिलांनी जुलै महिन्यातच फॉर्म भरून सबमिट केल्यामुळे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले. हा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये ही अर्ज केलेला आहे. त्या महिलांना ना ही दुसरा हप्ता जमा झाला.
परंतु ज्या महिला ऑगस्टमध्ये अर्ज करूनही काही कारणास्तव, काही त्रुटींमुळे ज्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही. त्या महिलांना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्यांची साडेचार हजार रुपये कधी जमा होणार ? हा प्रश्न पडलेला आहे. Ladki bahin Yojana 3rd installment
ज्यांनी फॉर्म भरलेला आहे व ज्यांचे फॉर्म मंजुरी झालेले आहेत. अशा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, सरकारने तिसऱ्या हप्त्याचे तारीख जाहीर केलेली आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
योजना दूत भरतीचा अर्ज करण्यासाठी झाली ‘ मुदतवाढ ‘ | असा करा ऑनलाईन अर्ज | Mukhymantri Yojana Doot New Update | संपूर्ण माहिती जाणून घ्या |
खात्यात नक्की किती पैसे जमा होणार ?
ज्या महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्यात 3000/- हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यांच्या बँक खात्यात आता 1500/- रुपये जमा होणार आहेत. हे आपणास सर्वांनाच माहित आहे. परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्या महिलांच्या खात्यात आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे मिळून 4500/- हजार रुपये जमा होणार आहेत.
तसेच ज्या महिलांनी 1 सप्टेंबर पासून अर्ज भरले असतील आणि जर त्यांचा अर्ज मंजूर झाला असेल, तर त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचेच दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही.
Mahamesh Scheme 2024 | महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात | शेळ्या, मेंढ्या व कुकुट पालन आणि जागा खरेदीसाठी ही अनुदान | वाचा सविस्तर माहिती |
खात्यात पैसे कधी जमा होणार ?
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मिळणार आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सिलिंग आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार ? हा प्रश्न सर्वच महिलांना पडलेला आहे.
तर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला. त्यानंतर सर्व महिलांना प्रतीक्षा आहे, तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची आता तीही महिलांची प्रतीक्षा संपणार आहे.
तिसऱ्या हप्त्याची तारीख व वेळ समोर आली. ती म्हणजे 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर च्या दरम्यान महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये तिसऱ्या हप्त्याचे जमा करण्यात येणार आहेत.
1 thought on “आनंदाची बातमी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होणार | तारीख झाली फिक्स | Ladki Bahin Yojana 3rd Installment |”