लाडकी बहीण योजना |
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana April installment
Ladki Bahin Yojana installment date
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana benefactory status
नमस्कार, Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महा दीड हजार रुपये दिले जात आहेत. लाडकी बहिण हि योजना महायुती सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रतिमाह दीड हजार रुपये शासनाकडून दिले जातात. ही सर्वसमावेशक अशी योजना असल्याने या योजनेला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाला व याच योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवकवीत यश मिळाले.
याच लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात, परंतु महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये प्रतिमाह देणार असल्याचे निवडणुका दरम्यान जाहीर केले होते. परंतु त्याबाबत अध्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महिलांना अजूनही दीड हजार रुपये एवढाच लाभ दिला जातो. परंतु यामध्ये आता एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये 3000 रुपयांची वाटप केले जाणार आहे ? तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार ? याबाबतचे सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 लाख रु. पर्यंतचे कर्ज | जाणून घ्या, सविस्तर माहिती |
लाडक्या बहिणीची यशस्वी वाटचाल |
राज्यशासना कडून सुरू करण्यात आलेल्या राज्यातील महत्त्वपूर्ण अशा लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. dbt च्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत थेट तेरा हजार 500 रुपये प्रति महिला या प्रमाणात निधी वाटप केला गेलेला आहे. परंतु अनेक महिलांना मागील काही हफ्ते तांत्रिक अडचणीमुळे मिळालेले नाहीत. मार्च महिन्याचा हप्ता वितरित करताना अनेक महिलांना हा हप्ता वितरित झाला पाहिजे. यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्या महिलांना एप्रिल आणि मार्चचा महिना सोबत दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. Ladki Bahin Yojana
‘ या ‘ महिलांना मिळणार 3000 हजार रुपये |
राज्यातील लाडकि बहिण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना राज्य शासन 1500 रुपये महिना या प्रमाणात निधी देते. या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वाटप करण्यात आले आहेत. मार्चचा हप्ता वितरित करताना काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच महिलांना मार्च चा हप्ता मिळालेला नाही.
या महिलांना मार्चचा हप्ता एप्रिल महिन्याच्या हप्ता सोबतच वितरित केला जाणार आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे तसेच एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये चा लाभ एप्रिल महिन्यात दिला जाणार आहे. ज्या महिलांना तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा झालेला नव्हता, अशाच महिलांना 3000 हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे.
अर्ज रद्द झाला असेल तर….|
राज्यातील लाडक्या बहिण्नीच्या अर्जाची तपासणी करताना राज्य शासनाने अपात्र असणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द केले आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने तपासणी पूर्ण करून महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन अर्ज केले होते व लाभ घेतलेल्या होता, अशा महिलांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Ladki Bahin Yojana
त्यामुळे ज्या महिलांना मार्च महिन्याचा अर्ज रिक्त यादीमध्ये गेला असेल, तर त्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही. त्यासोबतच मार्च महिन्याचा मिळणारा लाभ देखील त्यांना दिला जाणार नाही. त्यामुळे जर आपला अर्ज बाद झाला नसेल, तरच एप्रिल महिन्याचा व मार्च महिन्याचा हप्ता मिळून तीन हजार रुपये दिले जातील.
घर नोंदणीची सुविधा ऑनलाईन होणार | आता पासुन कुठूनही करता येणार घराची नोंदणी | पहा संपूर्ण माहिती |
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?
एप्रिल महिन्याच्या तारखेबाबत अनेक महिलांच्या मनात उत्सुकता लागून राहिलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना कधी वितरीत केला जाणार ? याची प्रतीक्षा आत्ता महिलांकडून सुरू आहे. एप्रिल महिना जवळजवळ संपत आलेला असून अद्याप पर्यंत महिलांना हप्ता वितरीत करण्यात आलेले नाही.
याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीया च्या या शुभ मुहर्तावर दिला जाणार आहे. म्हणजेच महिलांना 30 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता वितरीत केला जाईल. एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 पूर्वीच महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. साधारणपणे आज 26 एप्रिल पासून हप्ता वितरणास सुरुवात केली जाईल.