Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |

Table of Contents

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना |

Kadbakutti Mashin Anudan Yojana Maharashtra
Mofat Kadbakutti Yojana Marathi
Kadbakutti mashin Yojana
Maharashtra Shasan Yojana
Shetkari Yojana Maharashtra

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत विशेषता ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकांसाठी तसेच कष्टकरी कामगार वर्गासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. बांधकाम कामगार ते शेतकरी अशा सगळ्यांचा योजनांमध्ये समावेश केलेला असतो. या प्रत्येक घटकाला विचारात घेऊन या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
या योजनेची निर्मिती करताना हा प्रत्येक घटक केंद्रस्थानी मानून त्याचा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास करणे. तसेच सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याला पायाभूत सुविधा पुरवणे, हा या योजनांमधील मुख्य उद्देश असतो. तसेच राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली प्रत्येक योजना ही कल्याणकारी असते.
आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. त्यामुळे आपल्या देशात शेतकरी वर्ग जास्त राहतो. या शेतकरी वर्गाला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणीटंचाई, अवकाळी, अवर्षण, दुष्काळ अशा अनेक समस्या भेडसावत असतात. त्यामुळे शेतकरी हा कायमचा आर्थिक संकटात सापडलेला असतो.
हा शेतकरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करीत असतो. काही शेतकऱ्याचं पशुपालन हा मुख्य व्यवसाय झाला आहे. या व्यवसायावर या शेतकऱ्यांचे जीवन चालत असते
शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जनावरांना चारा कट करून द्यावा लागतो. तो कट करण्यासाठी भरपूर कष्ट पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कडबाकुट्टी ची आवश्यकता पडते. परंतु आर्थिक कारणामुळे तो ती खरेदी करू शकत नाही. आणि जर चारा बिना कापणी करता जनावरांना टाकला, तर चाऱ्याची खूप नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्याचे दुप्पट नुकसान होते.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांनासाठी, विशेषता पशुपालक वर्गासाठी ” कडबा कुटी अनुदान योजना “ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्राप्त झाल्याने शेतकरी कडबा कुटी खरेदी करू शकणार आहेत. तसेच त्यांच्या चाऱ्याचे नुकसानी होणार नाही व त्यांचा जोडधंदा चांगला चालेल.

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, रोज आपण शासनाच्या निरनिराळ्या योजनांची माहिती घेतच असतो. त्या योजनांचा लाभ तुम्ही ही घेत असाल, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या कडबा कुटी अनुदान योजनेची माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या योजनेचा लाभ घ्या. तसेच तुमच्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती सांगा व आमचा हा लेख शेतकरी व  पशुपालक वर्गापर्यंत जास्तीत – जास्त शेअर करा व त्यांनाही या योजनेचा लाभ घ्यायला सांगा, ही विनंती.

  योजनेचे नाव   कडबाकुट्टी अनुदान योजना महाराष्ट्र 
 योजनेची सुरुवातकेंद्र व राज्य शासन
 विभागमहाडीबीटी
योजनेचा उद्देशपशुपालकांना कडबाकुट्टी मशीन देणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील सर्व पशुपालक व शेतकरी
लाभ50 % अनुदान
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन व ऑनलाईन

 

हे पण वाचा –

                              Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | Good News | रोजगार हमी योजना माहिती मराठी |ऑनलाईन नोंदणी |

              निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | Good News | निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | ऑनलाईन नोंदणी सुरु |

               Free Flour Mill Scheme 2024 |Good News | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र | असा करा अर्ज | 100% मिळणार लाभ |

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी अनुदान योजनेचे उद्देश |

  • राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक लोकांना त्यांच्या जनावरांसाठी मोफत कडबा कुट्टी योजनेचा लाभ देणे हा उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पशुपालन हा जोडधंदा करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकरी वर्गाला पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सहकार्य करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालक वर्गाला पशुपालन क्षेत्रात तेजी निर्माण करण्यास मदत करणे.

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी मशीन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |

  • कडबा कुट्टी अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारी आर्थिक रक्कम ही थेट DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
  • कडबाकुट्टी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आली असल्याने, शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडणार नाही.
  • या योजनेमुळे शेतकऱ्याच्या वेळ व पैशाची दोन्हीची बचत होणार आहे.
  • शेतकरी तसेच पशुपालक हे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी मशीन अनुदान योजनेचे फायदे |

  1. मशीनच्या सहाय्याने चारा कट केल्याने चारा बारीक कट होतो व त्यामुळे चाऱ्याची नासाडी होत नाही.
  2. कडबाकुट्टी मशीन मुळे चारा कापण्यास कमी वेळ लागतो व शेतकऱ्याला जास्त कष्ट पडत नाहीत.
  3. कडबा कुट्टी मशीनने कापलेला चारा जनावरांना खाण्यास सोपा जातो.
  4. या मशीनमुळे चाऱ्याची नासाडी होत नाही, त्यामुळे जनावरांना वर्षभर चारा पुरवटी पडतो.
  5. कडबा कुट्टी मशीन मुळे चारा लवकर कापला गेल्याने शेतकऱ्याच्या वेळेची बचत होते.
  6. कडबाकुट्टी मशीन अनुदान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50 % अनुदानावर कडबा कुटी मिळेल किंवा दहा हजार रुपये दिले जातील.
  7. योजनेमुळे इतर पशुपालक पशुपालन क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  8. कडबा कुट्टी अनुदान योजनेमुळे तरुणाई पशुपालनाकडे आकर्षित होऊन, हा व्यवसाय सुरू करतील. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी योजनेंतर्गत मिळणारा लाभ |

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी तसेच पशुपालकांना 2 HP चे विद्युत चलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 50 % अनुदान दिले जाते किंवा दहा हजार रुपये दिले जातात.

कडबाकुट्टी मशीन अनुदान योजने अंतर्गत होणारी लाभार्थ्याची निवड |

कडबा कुटी मशीन अनुदान योजनेमध्ये लाभार्थ्याची निवड करताना 30 % महिला लाभार्थी व 3 % अपंग लाभार्थी यांचा समावेश केला जातो.

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी योजनेचे पात्रता, नियम व आटी |

  • कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी या महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • कडबाकुट्टी योजनेत अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे कमीत कमी दोन जनावरे असावेत.
  • या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना दिला जाईल.
  • कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ मिळवणाऱ्या अर्जदार व्यक्तीच्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असू नये.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकते.
  • या योजनेअंतर्गत मिळालेले कडबाकुट्टी यंत्र हे या शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला विकता येणार नाही.
  • कडबाकुट्टी मशीन अनुदान या योजनेतून मिळणारी कडबाकुट्टी यंत्र हे भारतीय मानक संस्था प्रमाणित केलेली असावी.
  • या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराचे बकन पासबुक आधार कार्डशी लिंक असावे.
  • या पशुपालक शेतकऱ्याने या अगोदर केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्र मिळवलेले नसावे.

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. बँकेचा तपशील
  8. जनावराचे विमा केल्याचे प्रमाणपत्र
  9. कडबा कुट्टी यंत्र खरेदी केल्याचे बिल

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra |

कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना पोर्टल – Click Here

कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना शासन GR – Click Here

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | कडबाकुट्टी योजनेत अर्ज रद्द होण्याची करणे |

  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार व्यक्तीकडे कमीत कमी दोन जनावरे नसल्यास त्या व्यक्तीचा अर्थ अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार व्यक्तीने यापूर्वी कोणत्याही योजनेतून कडबा कुट्टी यंत्र मिळवलेले असेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम आपणास महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • नंतर तिथे अर्जदाराला User Name आणि Password  टाकून Login करावे लागेल.
  • जर अर्जदार नवीन असेल तर त्याला New Login वर Click  करून आपला युजरनेम व पासवर्ड तयार करावा लागेल.
  • नंतर एक Page open होईल त्यातील शेती योजना वर Click करावे लागेल.
  • शेती योजना मध्ये कडबाकुट्टी यंत्रवर click करावे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज open होईल.
  • या अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरावयाची आहे.
  • नंतर अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत Upload  करायच्या आहेत.
  • त्यानंतर आपणाला Submit  क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपले ऑनलाइन एप्लीकेशन पूर्ण होईल.

 

Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  1. अर्जदाराला प्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायती कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयातील पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
  2. तिथून आपल्याला कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. या अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ते सर्व माहिती योग्य भरावी.
  4. नंतर या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात व तो अर्ज जमा करावा.
  5. जमा केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
  6. अशा पद्धतीने आपली ऑफलाइन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

 

1 thought on “Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |”

Leave a Comment