राज्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू | Jivant Satbara Campaign | नक्की काय आहे ही प्रक्रिया ? संपूर्ण माहिती |

                                   जिवंत सातबारा मोहीम |

jivant satbara campaign
jivant satbara mohim
satbara uttara mohin
bhumiabhilekh
maha e seva kendr

jivant satbara campaign
jivant satbara mohim
satbara uttara mohin
bhumiabhilekh
maha e seva kendr

नमस्कार, jivant satbara campaign शेतकऱ्यांना सातबारा बद्दल खरेदी विक्री करताना बऱ्याचशा अडचणी येत असतात. बरेचसे जमीन खरेदी विक्री व्यवहार रखडले जातात. सातबारा वरील त्याच्या नावे असलेली जमीन खरेदी – विक्री करताना या जिवंत सातबारा म्हणून याचा उपयोग होणार आहे. मृत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीशी संबंधित अधिकार सहज व वेगाने मिळाले पाहिजे. यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नक्की काय आहे ? जिवंत सातबारा मोहीम.  याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जिवंत सातबारा मोहीम |

वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे तिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना माहिती हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. ही प्रक्रिया वेळ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात. jivant satbara campaign

महिलांना मिळत आहे, मोफत पिठाची गिरणी | अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

जिवंत सातबारा मोहीम महसूल विभागाचे पारदर्शकता वाढवणारी ही लोककल्याणकारी योजना ठरणार आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीतच राहून त्वरित निर्णय घेता येतील. वेळ व पैशाची बचत होईल आणि वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन पटकन मिळेल, ही मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणेल. असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

असे असेल महसूल यंत्रणाचे काम |

महसूल विभागाकडून स्वतःहून वारसाची नोंद करण्यात येणार आहे. अर्जदाराला स्वतः अर्ज करण्याची गरज भासणार नाही, तर महसुली यंत्रणा त्यासाठी पुढाकार घेणार आहे. मृत व्यक्तीची नावे सात बारा वरून कमी करून वारसांच्या नवे जमिनी केल्या जाणार आहेत. ती संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदीचे अद्यावतीकरण केले जाईल. तहसील स्तरावरच वारसा हक्क निश्चित केला जाणार आहे. 10 मे पर्यंत राज्यभरातील सातबारा अद्यावत करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले आहे.

शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी | नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रु आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा |

जिवंत सात बारा मोहीम कार्यवाही |

1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मृत खातेदारांची यादी तयार करणार आहे. 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा सबंधी आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, वारसा बाबत सत्यप्रत, न्यायालय, स्वंय घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसाचे नावे, वय, पत्ता व दूरध्वनी क्रमांक, रहिवासी बाबतचा पुरावा, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यामार्फत वारस ठराविक फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणारा आहे. 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफार प्रणाली मधील वारस फेरफार तयार करणार आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या विहित  कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारावर निर्णय घेऊन, त्यानुसार सातबारा दुरुस्त करणार आहे. यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. jivant satbara campaign

Jivant Satbara Campaign | योजनेचे फायदे |

शेतकऱ्यांसाठी सुलभता म्हणजे कर्ज घेणे, जमिन व्यवहार करणे किंवा शासकीय योजनांसाठी सातबारा उतारा सहज उपलब्ध होतो. मालकी हक्काचे संरक्षण नोंदी वेळेवर अद्यावत केल्याने शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण होते. जमीन विवाद टाळले जातात, गुंतवणुकीसाठी सोपी अद्यावत सातबारा गुंतवणूकदारांना विश्वास अह्र्तेची हमी देतो. त्यामुळे जमीन व्यवहार सुलभ होतात.

बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत | अर्ज करण्याची पद्धत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Leave a Comment