Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र |
Free Flour Mill Scheme 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या जातात. समाजातील प्रत्येक घटक योजनांमध्ये समाविष्ट केलेला असतो. या योजना लोक हिताच्या असतात.
राज्यातील अनुसूचित जाती – जमातीतील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांनी स्वतःचा एखादा घरगुती व्यवसाय सुरू करावा. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत महिलांसाठी ” मोफत पिठाची गिरणी योजना “ राबवली जात आहे. ही योजना 100% अनुदान तत्वावर राबवली जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेला स्वतःजवळ एकही रुपया भरण्याची आवश्यकता नाही.
ग्रामीण भागात बाराच्या स्त्रिया सुशिक्षित असून बेरोजगार असतात. कारण त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा असूनही, त्यांना रोजगाराचे कोणती हि स्थायशी साधन उपलब्ध नसल्याने, त्यांच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची असते. तसेच त्यांची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असते. घरातील वृद्धांची व लहान मुलांची जबाबदारी या महिलांवर असल्याने त्या घर सोडून बाहेर गावी कामालाही जावू शकत नाहीत.
या सर्वांचा विचार करून ग्रामीण भागातील अशा महिलांसाठी घरगुती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने मोफत पिठाची योजनेची सुरुवात केली. त्यामुळे महिलांच्या हातात काही पैसे आल्याने त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मदत करू शकतील व त्या आत्मनिर्भर बनतील.
मोफत पिठाची गिरणी हि योजना 100% अनुदान तत्त्वावर असल्याने या महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी एकही रुपया घालावा लागणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ समाजातील जास्तीत जास्त महिला अधिक उत्सुकतेने घेतील. कारण त्यांना उद्योग धंदा करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे त्या उद्योग सुरू करीत नाहीत.
Free Flour Mill Scheme 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, रोजच आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेत असतो. त्यामध्ये कधी आपण शेतकऱ्यांच्या योजना पाहिल्यात, तर कधी विद्यार्थ्यांच्या. त्याचप्रमाणे आज आपण शासनामार्फत सुरू केलेल्या महिलांसाठीच्या मोफत पिठाची गिरणी योजना. या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात कुणी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला असतील व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर त्यांना ही माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | मोफत पिठाची गिरणी योजना |
योजनेची सुरुवात | महिला व बाल कल्याण विकास विभाग, महाराष्ट्र |
उद्देश | महिला व्यवसाय करण्यासाठी मदत करणे |
लाभ | पीठ गिरणीसाठी 100% अनुदान |
लाभार्थी | अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
NEW | Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना ऑनलाईन अर्ज | नोंदणी सुरु |
Shabari Gharkul Yojana Maharashtra 2024 | Good News | शबरी घरकुल योजना मराठी |अर्ज सुरु |
Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | Good News | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी 2024 |
Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पिठाची गिरणी योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी 100% अनुदान तत्वावर या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- स्वताच्या पायावर उभ्या राहिल्याने या महिलांकडे थोडेफार पैसे येतील त्यातून त्या स्वताचा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मोफत पिठाची गिरणी योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी बनणार आहेत.
- या योजनेमुळे बेरोजगार महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.
- महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने त्यांचे जीवनमान सुधारणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास सक्षम होतील.
Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पिठाची गिरणी योजनेची वैशिष्ट्ये |
- मोफत पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागा मार्फत सुरू करण्यात आली आहे.
- ही योजना शासनामार्फत 100% अनुदान तत्वावर राबवल्यामुळे लाभार्थी महिलांना स्वतःजवळील रक्कम भरावी लागत नाही.
- पिठाची गिरणी योजना मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे महिलांना विनाकारण सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होणार आहे.
- मोफत पिठाची गिरणी योजना विशेषता ग्रामीण भागातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील महिलांसाठी शासनाने सुरू केली आहे.
Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे |
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
- या योजनेअंतर्गत महिलांना अनुदानावर मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे.
- पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून महिला स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करू शकतील व त्यांच्या हाताला काम मिळेल.
- आर्थिक दृष्ट्या मागास ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात या योजनेमुळे वाढ होईल.
- मोफत पिठाची गिरणी योजनेमुळे महिला स्वतंत्र व स्वावलंबी बनतील.
- महिलांना इतरत्र ठिकाणी नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही.
- अशा योजनांमुळे ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास होईल.
- या योजनेअंतर्गत घरगुती उद्योग सुरू झाल्यामुळे कामासाठी महिलांना परगावी जाण्याची गरज पडणार नाही.
Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पीठ गिरणी योजनेचे नियम व आटी |
- या योजने अंतर्गत अर्ज करणारी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- महाराष्ट्र राज्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ शहरी भागातील महिलांना दिला जाणार नाही.
- तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा जास्त असू नये.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलाच मोफत पिठाची गिरणी या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 60 वर्ष या वयोगटा दरम्यान असावे.
- मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत अर्ज करणारी अर्जदार महिला कोणत्याही शासकीय नोकरीत असू नये.
- अर्जदार महिलेने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत पिठाच्या गिरणीचा लाभ या अगोदर मिळवलेला असू नये, त्यामुळे अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जर एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत असेल, तर त्यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
Free Flour Mill Scheme 2024 | या योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- महिला जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
- अर्ज करणारी महिला जर महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी नसल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1.2 लाखापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार महिलेने जर अर्जात खोटी माहिती भरली असेल तर अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार महिलेचे वय 18 पेक्षा कमी किंवा 60 पेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द केला जातो.
Free Flour Mill Scheme 2024 | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- पिठ गिरणी कोटेशन
- बँक पासबुक
- ईमेल आयडी
- विज बिल
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याचा नमुना 8/12 घराचा उतारा
Free Flour Mill Scheme 2024 | अर्ज करण्याची ऑफलाईन पध्दत |
- प्रथम आपल्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालविकास विभागाचा मोफत पिठाचे गिरणी या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य ती भरावी लागेल.
- तसेच अर्जासोबत अवश्य कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
- नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करून अर्जाची पोच पावती घ्यावी.
- अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
Free Flour Mill Scheme 2024 |
- मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज PDF click hare
- pithachi girani yojana onlien form click here
1 thought on “Free Flour Mill Scheme 2024 |Good News | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र | असा करा अर्ज | 100% मिळणार लाभ |”