Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |

           Aaple Sarkar Seva Kendr 2024 | सेतू सुविधा केंद्र |

Aaple Sarkar seva Kendra 2024
Document list for aaple Sarkar seva Kendra
Apply for Aaple Sarkar seva Kendra in Marathi
Aapale Sarkar seva Kendra vacancy for Solapur
Aapale Sarkar seva Kendra information for Solapur

Aaple Sarkar seva Kendr 2024
Document list for aaple Sarkar seva Kendra
Apply for Aaple Sarkar seva Kendra in Marathi
Aapale Sarkar seva Kendra vacancy for Solapur
Aapale Sarkar seva Kendra information for Solapur

नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र ची स्थापना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार झाले. त्यानंतर आपल्या राज्यात आपले सरकार केंद्र अथवा सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.
हे सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहे ? कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? अर्ज कसा करावा ? या सर्वांची माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक रोजगाराची नवी संधीने मिळाली आहे. याद्वारे तुम्ही लोकांची सेवा करून चांगले पैसे कमवू शकता. या माध्यमातून तुम्ही शासकीय कामे, शासकीय प्रमाणपत्रे, दाखले व  उताऱ्यांची बरीच काही कामे करू शकता. त्यासाठी आपले स्वतःचे सेवा केंद्र कसे करावे. याविषयी संपूर्ण माहिती पाहूया. Aaple Sarkar Seva Kendr 2024 |

आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सोलापूर |

सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांसाठीच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्यामार्फत जाहीरनामा काढलेला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

आपले सेवा केंद्र जिल्हा – सोलापूर

आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागा – 330

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याकरिता पत्ता – सेतू संकलन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेरी जवळ, सात रस्ता परिसर सोलापूर

मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Aaple Sarkar Seva Kendr 2024 |

100 % अनुदानावर मिळणार फवारणी यंत्र | असा करा ऑनलाईन अर्ज | |MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 |

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | आवश्यक कागदपत्रे |

मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत :

  •  दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा CCC प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • CSC प्रमाणपत्र किंवा इतर नागरी सुविधा केंद्र प्रमाणपत्र ( असल्यास )
  • स्वंय घोषणापत्र
  • रहिवासी पुरावा 1
  • रहिवासी पुरावा 2
  • सोलापूर महानगरपालिका झोन दाखला Aaple Sarkar Seva Kendr 2024 |

High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात भरती सुरु | पदवीधरांना संधी | त्वरित करा ऑनलाईन अर्ज |

आपले सरकार सेवा केंद्र | आटी व नियम |

  • 10 रु स्टम्प पेपर वर कार्यालयातील विहीत नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
  • अर्ज स्वच्छ व योग्य लिहिलेला असावा, अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्राच्या क्षेत्रामध्ये स्थानिक रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवारांनी रहिवासी पत्त्याचा पुरावा किमान दोन देणे आवश्यक आहे.
  • आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असणारे सीएससी केंद्र धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • तसेच नागरी सुविधा केंद्र धारकांनाही प्राधान्य देण्यात येईल.
  • उमेदवाराने आपले आधार कार्ड व पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार व्यक्तीन अर्जामध्ये पत्ता, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
  • केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय नोकरीत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी अर्ज करू नयेत.
  • उमेदवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. Aaple Sarkar Seva Kendr 2024 |
  • ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणच्या गावाच्या यादीनुसारच अर्ज सादर करावा, इतर अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
  • उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले जाते व काही ठिकाणी मुलाखत घेतली जाते . ( CSC चालक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर प्राधान्य दिले जाते . )
  • जे उमेदवार पात्र आहेत त्यांची शिक्षणा नुसार यादी प्रसिद्ध केली जाते.
  • पात्र उमेदवारांना सेतू किंवा आपले सरकार केंद्र दिले जाते .
  • सेतू भेटणे म्हणजेच Maha Online ID दिला जातो त्याला VLE ID सुधा म्हणतात .

Online Marriage Certificate 2024 | विवाह प्रमाणपत्र नोंदणी | असे काढा ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट |

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी आवश्याक साहित्य |

जो उमेदवार आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज दाखल करणार आहेत. त्या उमेदवाराकडे पुढील प्रमाणे साहित्य आवश्यक आहे.

  • कॉम्प्युटर / लॅपटॉप
  • बायोमेट्रिक डिव्हायसेस
  • प्रिंटर
  • स्कॅनर
  • कॅमेरा

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत कोणकोणती कामे करू शकता ?

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत आपण पुढील सर्व ऑनलाईन प्रकारची कामे करू शकतो :

  1. रहिवासी दाखला
  2. उत्पन्न प्रमाणपत्र
  3. जातीचे प्रमाणपत्र
  4. वय / आदिवास प्रमाणपत्र
  5. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  6. भूमिहीन प्रमाणपत्र
  7. अल्पभूधारक प्रमाणपत्र
  8. शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  9. सातबारा उतारा
  10. लायसन्स Aaple Sarkar Seva Kendr 2024 |
  11. जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  12. रेशन कार्ड
  13. पद दाखल प्रमाणपत्र
Aaple Sarkar Seva Kendr Solapur 2024 | PDF CLICK HERE |

1 thought on “Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |”

Leave a Comment