Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद | नवीन होस्टेल, 3 कोटीच्या योजना आणि बरेच काही …..|

Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद |

union budget 2024-25 union budget india for women kendriya arthsankalp marathi union budget : tarunansathi moti ghoshna

Union Budget 2024-25 |

23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला. 1 तास 23 मिनिटांच्या भाषणात त्यांचा रोख शिक्षण, रोजगार, शेतकरी, महिला आणि तरुणांवर होता. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री यांनी सर्वसमावेश असा सदर केला आहे. या अर्थसंकल्पावर एक नजर टाकूया.

महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजना साठी 3  लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जाणार आहेत. त्याच सोबत खाजगी कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य ती पावले टाकली जाणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Union Budget 2024-25 for Women | महिलांसाठी मोठी घोषणा |

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या आर्थिक वर्षाचा २०२४-25 चा अर्थसंकल्प सदर केला या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी महिलांसाठी विशेष अशा तरतुदी केल्या आहेत.  budget 2024 highlights
  • नोकरदार महिलांसाठी होस्टेल उभारण्यात येतील. या निर्णयामुळे नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल को ऑपरेशन पॉलिसी राबवली जाईल. हे हि या वेळी घोषित करण्यात आले.
  • या अर्थसंकल्पामुळे देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मुलींना केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक कर्जामध्ये मुलींसाठी तीन टक्के व्याजदरही शैक्षणिक कर्जावर कमी करण्यात आला आहे.
  • नोकरदार लोकांच्या मुलांसाठी NPS वात्सल्य सुरू केले आहे. पालकांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
  • विविध कार्यक्षेत्रात महिलांचा भाग वाढविण्याच्या योजनेचा उल्लेख केला. निर्मला सीतारमण म्हणाले, विविध कार्यक्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नोकरदार महिला वर्गासाठी वसतिगृहाची स्थापना करणार. Union Budget 2024-25 |
  • निर्मला सीतारमण यांनी महिलांनी प्रॉपर्टी खरेदी केल्यास रजिस्ट्रीवर स्टँप ड्यूटीमध्ये सूट देण्याचं राज्याला आवाहन केलं आहे. 
  • सरकार महिलांनी खरेदी केलेल्या संपत्तीचं शुल्क कमी करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन देतील. 

Union Budget 2024-25 | सीमा शुल्कात कपात |

या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सीमा शुल्क कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्के कमी करण्यात आली. यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा चैतन्य दिसून येईल. तसेच सोन्या चांदीचे भाव ही कमी होतील. या योजनेमुळे महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयामुळे सोने बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसली. सोने जवळपास चार हजार रुपये प्रति तोळा स्वस्त झाले या निर्णयामुळे सोने 70 हजार रुपये प्रति तोळा आले. Union Budget 2024-25 |

शासनाच्या इतर योजना –

Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जाहीर | काय स्वस्त ? काय महाग ? महाराष्ट्रासाठी विशेष काय ? पहा सविस्तर माहिती |

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |

New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?

Good News | दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र | Don Mulinsathi Yojana Maharashtra 2024 | केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती |

केंद्रीय अर्थसंकल्प अंतर्गत तरुणांसाठी विशेष योजना |

Union Budget 2024 मध्ये देशातील तरुण वर्गासाठी तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली. तरुणांच्या हाताला काम देण्या बरोबर त्यांना आर्थिक सहाय्य हि दिले जाणार आहे.

त्याच बरोबर  कंपन्यांमधील इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6000 रुपयांची वेगळी रक्कम ही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेचा पाच वर्षात एक कोटी तरुणांना फायदा होणार आहे. Union Budget 2024-25 |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2024 25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महिला व तरुण यांच्यासाठी मोठी घोषणा केली. तरुणांना इंटर्नशिप साठी प्रवृत्त करणे व इंटरनशीपच्या संधी वाढवणे ,यासाठी नवीन घोषणा करण्यात आली.

तरुणांना मोठ्या कंपन्यान मध्ये इंटर्नशिपची संधी |

मोदी सरकारच्या पाच व्या नवीन योजनेअंतर्गत 500 मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना इंटरनशिप ला संधी मिळणार आहे. सरकारच्या‌ इंटरशिप योजनेचा एक कोटी तरुणांना फायदा होणार आहे. या योजनेतून तरुणांना आता 5 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची संधी मिळणार आहे. शिवाय दर महिन्याला 5000 रुपये इंटर्नशिप भत्ताही दिला जाणार आहे.

budget 2024 : महिलांसाठी विशेष तरतुदी वाचा 

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना मिळणार 6000 रुपये ?

मोडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट काळ सादर करण्यात आले. त्यामध्ये महिला, तरुण वर्ग तसेच नवीन कर प्रणाली या वर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामध्ये हे घोषित करण्यात आले कि, कंपनीमध्ये इंटरनशीप पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींना 6000 रुपयांची वेगळी रक्कम ही दिली जाणार आहे. याचा फायदा देशातील एक कोटी तरुण तरुणींना होणार आहे.

1 thought on “Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद | नवीन होस्टेल, 3 कोटीच्या योजना आणि बरेच काही …..|”

Leave a Comment