Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजना 2024 |
Atal Pension yojana ( APY ) In Marathi |
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो देशातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजना राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जात असतात.
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती – जमाती, कष्टकरी बांधव, शेतकरी, बांधकाम कामगार व आरोग्य सेविका, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते. त्यातून त्यांचा विकास करून, त्यांना एक परिपूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न होत असतो.
शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना नेहमीच राबवल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे साह्य दिले जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर कष्ट करून, त्यांना त्यांच्या वृद्धा काळातही मेहनत, कष्ट घ्यावे लागत असते. पण ते त्यांना शारीरिक व्याधीमुळे त्या प्रमाणात शक्य होत नाही. तेव्हा त्यांना त्यांचे जीवन अवघड होऊन बसते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने एका योजनेची सुरुवात केली आहे. ती योजना म्हणजे ” अटल पेन्शन योजना ( APY ) “ होय. ज्याच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षापासून त्यांना प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन मिळणार आहे.
सर्वसामान्य जीवन जगताना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत असतात. ते कष्ट करून काही नागरिक यशस्वी होतात. पण प्रत्येकाची अवस्था तशी नसते. त्याने कितीही कष्ट केले तरी, त्यांना उतारा वयात कोणाचाही आधार राहत नाही. तर काही वेळा अनेक लोकांना उतरवयात अनेक रोग जडलेले असतात.
काही लोकांचे तर अतोनात हाल होतात. अशावेळी त्यांचे जीवन जगणे मारण्यापेक्षा कमी होत नाही. आत्ताच्या समाजात ज्येष्ठ नागरिकांची काळजी करणे किंवा त्यांचा सांभाळ करणे, लोकांना जमत नाही. आणि ते करत नाहीत. त्यामुळे शासनामार्फत जेष्टांना थोडेफार आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
अटल पेन्शन योजनेची सुरुवात 1 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेअंतर्गत वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील युवकाला फायदा मिळणार आहे. या वयोगटातील जे नागरिक या योजना अंतर्गत गुंतवणूक करू शकतात. त्या सर्व नागरिकांना या पेन्शन योजनेअंतर्गत 1000 ते 5000 पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
प्रत्येक जण लहानाचा मोठा होतो. त्याचबरोबर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्याच्याकडे उत्पन्नाचा एक स्त्रोत असणे आवश्यक असते. त्यासाठी दरमहा गुंतवणूक केल्यास पेन्शन योजना फायद्याची ठरते, जेणेकरून उत्तर्वायात निवृत्तीनंतर मासिक पेन्शन रूपाने ती रक्कम परत मिळू शकते.
जेव्हा आपण पेन्शन विषयी बोलतो, तेव्हा आपल्यासमोर सरकारी किंवा खाजगी कर्मचारी येतात. ते दरमहा केंद्र व राज्य शासनाकडून पेन्शनचा लाभ घेत असतात. परंतु केंद्र शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिक पेन्शन घेवू शकतो. त्यामुळे असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना आपल्या उतारवयात दैनंदिन गरजांसाठी कोणावर हि अवलंबून राहावे लागणार नाही.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण आपल्या लेखांच्या माध्यमातून घेत आहोत. या योजना समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जातात. अगदी तळागाळातील जनतेचा विकास करणे, हे या योजनाचे उद्दिष्ट असते.
त्याचप्रमाणे आज आपण केंद्र शासनामार्फत देशात सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी 18 ते 40 वयोगटातील युवक व युवती आहेत. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा पुढे जाऊन लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | अटल पेन्शन योजना |
लाभार्थी | 60 वर्ष पूर्ण केलेले नागरिक |
लाभ | दरमहा पेन्शन देणे |
उद्देश | उतर्त्यावायात आर्थिक मदत देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन / ऑनलाईन |
हे देखील वाचा –
New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |
New | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना | PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | 300 युनिट वीज मिळणार मोफत |
Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |
Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |
Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेची उद्दिष्ट्ये |
- ज्येष्ठ नागरिकांचे उतार वयातील जीवन सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेचे सुरुवात केले.
- या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनमुळे नागरिकांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.
- अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते. त्यातून ज्येष्ठ नागरिक आपला दैनंदिन खर्च करू शकतात.
- आयुष्याच्या उतार वयात अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना एक चांगला आधार मिळतो.
- जेष्ठ नागरिकांना आपल्या तरुण वयात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा त्यांना त्यांच्या उतार वयात मिळतो.
- या योजनेमुळे सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना आपल्या उतार वयात स्वावलंबित राहता येते.
- अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना लहान वयातच बचतीची सवय लावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान सुधारणे व त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणे.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये |
- ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन स्वरूपात लाभ देण्यासाठी केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेच्या माध्यमातून वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील युवक – युवती यांना गुंतवणूक करता येते.
- या योजने अंतर्गत केल्या जाणार्या गुंतवणुकीतून उत्तर वयानंतर पेन्शन स्वरूपात एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ दरमहा दिला जातो.
- अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज नागरिक करू शकतो.
- अटल पेन्शन योजनेची अर्ज पद्धती अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही समस्या येणार नाही.
- त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची पद्धती मासिक हप्त्यांमध्ये निश्चित केलेली आहे, त्या प्रमाणात पेन्शनचा लाभ दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी व आत्मनिर्भरती बनतील.
- या योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन हि गुंतवणूक केलेल्या प्रीमियम वर आधारित असते.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेचे फायदे |
- अटल पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या युवकांनी वयाची 40 पर्यंत गुंतवणूक केली असेल व त्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला जमा रक्कम दिली जाते.
- या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे प्रत्येक महिन्याला निश्चित अशी रक्कम गुंतवू शकता.
- अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना वयाच्या 60 नंतर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन दिली जाते.
- वयाच्या 18 पासून ते 40 पर्यंत दरमहा एक ठराविक रक्कम जमा करून, त्याचा उतार वयात लाभ घेऊ शकतात.
- देशातील अपंग, दिव्यांग नागरिकांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाते.
- नागरिकांना आपल्या उतार वयात कोणतेही कष्ट करावे लागणार नाही, कारण मिळणाऱ्या पेन्शन मधून ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतात.
- ज्या पट्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल, त्या पटीमध्ये तुम्हाला उतारव्यात पेन्शन मिळू शकते.
- आपल्या देशातील असंघटीत कामगार वर्ग व मजूर वर्गाला या योजनेंतर्गत सर्वात जास्त फायदा होईल.
- 60 वर्ष वायाच्या आत एखद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, जमा रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.
अटल पेन्शन योजनेतील गुंतवणुकीदाराचा 60 च्या आत मृत्यू झाल्यास |
- अटल पेन्शन योजना अंतर्गत गुंतवणूकदाराचा वयाच्या 60 वर्षाच्या आत आकस्मित मृत्यू झाल्यास, जमा झालेली रक्कम त्याच्या वारसदाराला परत केली जाते.
- अटल पेन्शन योजनेतील गुंतवणूकदाराचा जोडीदार जिवंत असेल, तर त्याला ही गुंतवणुकीची प्रोसेस पुढे चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
- जर त्याच्या जोडीदाराची इच्छा नसेल, तर त्याच्या इच्छेनुसार ते खाते बंद करण्यात येते.
- अटल पेन्शन योजनेतील गुंतवणूकदाराच्या जोडीदाराने, त्या खात्याचे प्रीमियम पूर्ण भरल्यास, त्याला त्या योजनेअंतर्गत अजीवन पेन्शनचा लाभ दिला जाऊ शकतो.
- हि केंद्रशासना मार्फत सुरु करण्यात आलेली योजना गुंतवणूकदाराच्या वरसासाठी सुद्धा फायद्याची आहे.
अटल पेन्शन योजने अंतर्गत पैसे भरण्याची पद्धत |
- केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजना अंतर्गत तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल, तर तुमचे पैसे बँकेमार्फत भरले जातात.
- त्यासाठी तुमचे बँकेत खाते असावे लागते.
- परंतु बँकेमार्फत ऑटो डेबिट सूचना सेट करून रक्कम वजा केली जाते. त्यासाठी तुमच्या खात्यात ऑटो डेबिट साठी रक्कम शिल्लक असावी लागते.
- जर ती रक्कम शिल्लक नसल्यास दंड आकारण्यात येतो, तसेच पैसे जर वेळेवर नसल्यास दंड आकारण्यात येतो.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता |
केंद्र शासनामार्फत देशात राबविण्यात येणाऱ्या अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना पाळावयाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
- देशातील अटल पेन्शन योजनेमध्ये प्रत्येक नागरिकांनी कमीत कमी वीस वर्षासाठी गुंतवणूक केली पाहिजे.
- त्या व्यक्तीचे बँक खाते असावे तसेच ते आधार कार्ड सोबत लिंक केलेली असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या युवकाचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असावे.
- या योजनेचा अर्जदार भारत देशाचा मूळ नागरिक असावा.
- या योजेतील गुंतवणूकदराने कोणत्याही समाज कल्याण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेच्या गुंतवणूक दाराचे वय 18 पेक्षा अधिक असावे.
अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पनाचा दाखला
- रहिवाशी दाखला
- पॅन कार्ड
- जन्माचा दाखला
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेंतर्गत आकारण्यात येणाऱ्या दंडाचे स्वरूप |
- अटल पेन्शन योजनेअंतर्गत दर महिना प्रीमियम 100 असेल, तर एक रुपया दंड आकारण्यात येतो.
- दर महिन्याचा प्रीमियम जर 101 ते 500 रुपये असेल, तर रुपये दोन दंड आकारण्यात येतो.
- दर महा प्रीमियम 501 ते 1000 असल्यास, रुपये पाच दंड आकारण्यात येईल.
- दर महिन्याचा प्रीमियम 1000 पेक्षा जास्त असल्यास, दहा रुपये दंड आकारला जाईल.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | या योजनेतील गुंतवणूकदार प्रीमियम भरू नाही शकला तर…|
- अटल पेन्शन योजनेअंतर्गत चा एखादा गुंतवणूकदार जर सहा महिन्यापर्यंत प्रीमियम भरू शकला नाही, तर त्याचे खाते ब्लॉक करण्यात येते.
- जर एखाद्या गुंतवणूकदाराने बारा महिन्यांपर्यंत प्रीमियम भरला नसेल, तर त्याचे खाते निष्क्रिय करण्यात येईल.
- जर एखाद्या गुंतवणूकदाराने 24 महिन्यापर्यंत प्रीमियम भरला नसेल, तर त्याचे खाते आपोआप बंद होईल.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत लिंक वरती click करावे.
- नेट बँकिंग क्रेडिशियल किंवा डेबिट कार्ड प्लस पिन वापरून login करा.
- त्यानंतर नॉमिनीचे तपशील अपडेट करा.
- हे सर्व झाल्यानंतर पेन्शनची रक्कम आणि वारंवारता निवडा.
- योजनेच्या मुखपृष्ठावर भरलेली माहिती तपासा आणि नंतर प्राप्त झालेला ओटीपी अर्जामध्ये इनपुट करा.
Atal Pension yojana ( APY ) In Marathi | अटल पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- तुमच्या नजीकच्या बँकेतून तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो.
- बँकेमध्ये जाऊन कर्मचाऱ्याकडून या योजनेसाठीचा अर्ज घ्या.
- त्या अर्जावरील सर्व आवश्यक माहिती योग्य व अचूक भरा.
- तुमचे बँकेत खाते असल्यास तुमचा केवायसी तपशील अपडेट करा.
- त्यानंतर तुमची पेन्शनची रक्कम व गुंतवल्या जाणाऱ्या हप्त्यांची रक्कम निश्चित करा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- त्यानंतर तो अर्ज बँकेत जमा करा.
- अशाप्रकारे तुमची या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
1 thought on “Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |”