Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र |
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या शेती क्षेत्राचा विकास व उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी विविध योजना राबवत असते. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून राज्यातील शेतकरी, खाजगी व शासकीय साखर कारखाने, शेतकरी संस्था यांच्यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आहे. ती योजना म्हणजे ” ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना “ होय.
आपल्या देशाच्या साखर उत्पादनापैकी जवळजवळ एक तृतीयांश साखरेचे उत्पादने हे आपल्या एकट्या महाराष्ट्र मध्ये होते. त्यामुळे शेती साठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. पण पण सध्याच्या परिस्थितीत मजूर मिळणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे.
राज्यात वाढत जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा, मजुरांना इतर क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणारी नवनवीन रोजगार तसेच सर्वसामान्यांच्या जीवन शैलीमध्ये होणारे बदल, त्याचबरोबर त्यांचा आर्थिक सामाजिक स्तर उंचावल्यामुळे ऊस तोडणी कामगार मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे जवळपास सर्व साखर कारखान्यांना ऊस तोडणी साठी मजूर मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे. त्यातच शेतकऱ्याचा ऊस तोडणीस उशीर झाल्यास साखरेचे प्रमाणावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ऊसाला कमी भाव मिळतो.
या सर्व कारणांनी तोडणीच्या टप्प्यात ऊस तोड कामगार उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांचा आलेले पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. परंतु, ही अशी अंग मेहनतीची, कष्टाची कामे करण्यास आजकाल कामगार मिळणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे या क्षेत्रात यंत्राचा वापर करणे गरज झाली आहे.
कारण आपल्या राज्यात ऊस तोडण्याची पद्धत ही अत्यंत पारंपारिक आहे. सर्व कामे मजुरांच्या साह्याने होतात. त्यामुळे ह्या कष्टाला वेळही खूप लागतो आणि खर्च जास्त येतो. त्यातच ऊस हा वेळेवर तोडला जाणे आवश्यक असते, कारण ऊस तोडणीस उशिरा झाल्यास उसाच्या भावावर परिणाम करतो.
त्यामुळे शेतकऱ्याने कष्टाने, मेहनतीने आणलेले पीक जर वेळेवर तोडले गेले नाही, तर त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला मोठा बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात यंत्रसामग्रीचा वापर करणे गरजेचे वाटत आहे. त्यातच काही खाजगी साखर कारखाने ऊस तोडणीसाठी आधुनिक यंत्रसामग्री वापरून कमी वेळेत जास्त ऊस तोड करत आहेत.
वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, शासकीय व खाजगी साखर कारखाने यांना ऊस तोड करण्यासाठी हे यंत्र परवडण्यासारखे नाही. कारण ऊस तोडणी यंत्राची किंमत खूप जास्त आहे व आपला राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, सर्वसामान्य आहेत. तसेच काही साखर कारखान्याने ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा ऊसतोड सारख्या मोठ्या समस्येवर उपाय करण्यासाठी राज्य शासनाने ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविल्या जाणार्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतलीच आहे. त्या योजना या वैयक्तिक स्वरूपात, गट स्वरूपात किंवा मोठ्या प्रकल्पांसाठी अनुदान स्वरूपात राबवल्या जातात. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात जे कोणी प्रगतशील शेतकरी, खाजगी साखर कारखाने किंवा शेतकरी सहकारी संस्था असतील. त्यांना या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने आणि शेतकरी संस्था |
लाभ | यंत्र खरेदीसाठी 35 लाख रुपयांचे अनुदान |
उद्देश | उस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य कारणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
New | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना | PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | 300 युनिट वीज मिळणार मोफत |
Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |
Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |
Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |
Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था तसेच शासकीय व खाजगी साखर कारखाने व उद्योजक यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाची तोडणी वेळेवर व्हावी व त्यांना त्यांच्या उसाप्रमाणे भाव मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- ऊस तोडणी क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून मजुरांच्या कमतरतेवर मात करणे, हा योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करणे, तसेच इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे .
- ऊस तोडणी ही कमी खर्चात व कमी वेळेवर करणे शक्य व्हावे, या उद्देशाने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने तसेच शेतकरी संस्था या योजनेचा लाभ घ्येवू शकतात. Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
- राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ऊस क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
- या अनुदानाची आर्थिक लाभाची राशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PFMS च्या साहाय्याने जमा केली जाते.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | या योजनेचे लाभार्थी |
महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी साखर कारखाने, प्रगतिक शेतकरी, शेतकरी संस्था गट हे या योजनेचे लाभार्थी आहेत.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे अनुदान |
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या 40% अथवा 35 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल, ती अनुदान स्वरूपात देण्यात येते.
- या मंजूर झालेल्या निधी पैकी केंद्र शासनाचा हिस्सा 60 टक्के व राज्य शासनाचा हिस्सा 40% असतो.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत भरावे लागणारे अर्ज शुल्क |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना, प्रत्येक अर्जारांना 23 रुपये अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन फी भरावी लागते.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | या योजनेचे फायदे |
- राज्यातील ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी संस्था यांना ऊस तोडणी हे यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
- या यंत्रसामग्रीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना किंवा कारखान्यांना ऊस तोडणी करण्यासाठी ऊसतोड कामगारावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेमुळे ऊस या शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे शक्य होईल.
- या योजनेमुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा, तसेच शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
- या ऊस तोडणी यंत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळेल.
- तसेच या अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याच्या पिकवलेल्या ऊस पिकाची तोडणी वेळेवर न झाल्याने होणारी नासाडी थांबेल व त्यांचा आर्थिक फायदा होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या वेळेची व पैशाची बचत होईल.
- ऊस तोडणी अनुदान योजनेमुळे शेती क्षेत्रातील मनुष्य बाळाचा वापर कमी होईल.
- या योजनेमुळे ऊस तोडणी वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्य पिकाला योग्य भाव मिळेल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल. Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्याने, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत महत्वाच्या बाबी |
- या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस फक्त एकाच ऊस तोडणी यंत्राचा लाभ दिला जातो.
- तसेच शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी सहकारी संस्था यांना एकाच ऊस तोडणी यंत्राचा लाभ दिला जातो.
- परंतु राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी 3 ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान दिले जाईल.
- या ऊस तोडणी यंत्र च्या पात्र लाभार्थ्यांना यंत्र किमतीच्या 40% अथवा 40 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल, ती अनुदान म्हणून देण्यात येते.
- उर्वरित रक्कम हे कर्ज स्वरूपत उभे करण्याची जबाबदारी संपूर्ण या अनुदान योजनेच्या लाभार्थ्याची असेल.
- या ऊस तोडणी यंत्राची नोंदणी ही परिवहन विभागाकडे करावी लागते व त्याबाबतची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी ही विक्रेता, लाभार्थी तसेच संबंधित उत्पादक संस्थांची असेल.
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थी असल्यास त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्रणावर कायमस्वरूपपात नोंद राहील, अशा तपशीलात योजनेचे नाव, लाभार्थ्याचे नाव, अनुदान वर्ष आणि अनुदान रक्कम इत्यादी नोंदवणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या लाभार्थ्याने MAHADBT पोर्टलवर अपलोड केलेले कोटेशन व टेस्ट रिपोर्ट मध्ये निश्चित केलेलेच ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे. Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
- या योजनेच्या अर्जांची नोंदणी झाल्यानंतर आलेल्या अर्जातून लाभार्थ्याची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते, त्यानंतर निवडीत लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगितले जाते.
- त्यामध्ये 7/12 व 8 अ उतारा, आधार कार्ड, आधार लिंक पासबुक झेरॉक्स या सर्व पोर्टलवर अपलोड करावे लागतात.
- प्राप्त झालेल्या अर्ज व त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी महाडीबी पोर्टलच्या माध्यमातून स्तर कक्ष निर्माण केलेला आहे.
- छाननी द्वारे पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती पत्र देण्यात येते, सदर पूर्वसंमती पत्राद्वारे महाडिबीटी पोर्टलच्या खात्यामध्ये लॉगिन होता येते.
- या योजनेच्या लाभार्थ्यांनी पूर्व संमती पत्र मिळाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्याच्या आत यंत्र खरेदी करण्याची प्रोसेस पूर्ण करावी, अन्यथा पूर्व समिती मिळाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्यात यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या लाभार्थीची निवड रद्द करण्यात येते.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा अर्ज हा शेतकरी असावा.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी आटी व नियम |
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
- राज्याबाहेरील इतर कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- राज्यातील ज्या कार्य क्षेत्रात ऊस तोडणीचे काम केले जाणारे आहे, त्या क्षेत्रातील कारखान्याचे संमती पत्र आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत खरेदी केले जाणाऱ्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार, त्या कारखान्यास किंवा लाभार्थीस आहे.
- राज्यातील च्या कारखान्याने किंवा शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राचा लाभ घेतला आहे, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत, त्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- केंद्र शासनाकडून तपासणी करून प्रमाणित केलेलेच ऊस तोडणी यंत्र खरेदी करावयाचे आहे.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त राज्यातील ऊस तोडणी करताच केला जाऊ शकतो.
- या ऊस तोडणी यंत्रणे राज्याबाहेरील ऊस तोडणी करता येणार नाही.
- कारखानदारांनी किंवा शेतकऱ्यांनी यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी केलेले असल्यास किंवा त्याचा लाभ घेतलेला असल्यास, पुन्हा त्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- एकदा ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर त्यास काम मिळेल किंवा न मिळेल, याची जबाबदारी पूर्णता लाभार्थ्याची असेल, त्यासाठी शासन कुठल्याही प्रकारचे जबाबदारी घेणार नाही.
- तसेच खरीद केलेले यंत्र चालवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याकडे प्रशिक्षित व्यक्ती असेल, तरच या यंत्राच्या लाभ घ्यावा.
- ज्या लाभार्थ्याने अनुदान योजनेमार्फत ऊस तोडणी यंत्र घेतले आहे, त्या व्यक्तीस किंवा कारखान्यास 6 वर्षापर्यंत या यंत्राची विक्री करता येणार नाही तसेच ते हस्तांतरित करता येणार नाही तसे आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल व अनुदानाची रक्कम वसूल करण्यात येते.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला जमिनीचा सातबारा आठ अ उतारा
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्याचे बिल / कोटेशन
- बंध पत्र
- बँक पासबुक
- प्रतिज्ञापत्र
- सहकारी कारखाने, शेतकरी उत्पादक संस्था व शेतकरी सहकारी संस्था यांच्या बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र
- संस्थेच्या नावाचे बँक पासबुक झेरॉक्स Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर गेल्यावर स्वतःचे नाव टाकून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर अर्जदाराला username व password टाकून login करावे लागेल.
- login झाल्यानंतर open page वरील शेतकरी योजना वर click करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक page open होईल, त्यावरील ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अर्जावर click करावे.
- नंतर एक new page open होईल, त्यातील कृषी यांत्रिकरणाच्या बाबी यावर click करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून save बटनावर click करावे.
- त्यानंतर फिरून तुमच्यासमोर मुखपृष्ठ ओपन होईल, त्यामधील अर्ज या पेजवर ओपन करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात Make पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये पैसे भरण्याची विविध पर्याय दिसतील, तो तुम्ही निवडून पैसे भरायचे आहेत व रिसिप्ट वर क्लिक करून त्याची Prient काढावी. Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
- अशाप्रकारे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी तुमची आज प्रक्रिया पूर्ण होईल.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अधिकृत website CLICK HERE
1 thought on “New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |”